INDvSA, पहिला टी२०आय: हार्दिकच्या ऑरामुळे भारताची १-० ने आघाडी
खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात टीम इंडियाचा एक नंबर फॉर्म कायम राहिला असून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या टी२०आय सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला आहे.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्याने सुरुवातीच्या अडचणी दूर करत ५९* धावांची खेळी केली आणि २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्सवर १७५ धावांपर्यंत आपला संघ पोहोचवला.
त्यानंतर गोलंदाजांनी 🔥 गोलंदाजी करून सामना जिंकला. कटकमधील यशस्वी सामन्याची उजळणी करूया...
एचपी म्हणजेच b̷u̷s̷i̷n̷e̷s̷s̷ ऑरा
यजमान संघाची सुरूवात डळमळीत झाल्यानंतर तिलक वर्माने ३२ चेंडूत २६ धावा करून संघाचे तारू सावरले.
हार्दिकने सुरुवातीपासूनच टॉप गियरमध्ये फलंदाजी करताना २८ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या आणि त्याची धमाकेदार खेळी केली.
शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांनी इनिंगच्या शेवटी फिनिशिंग टचेस देऊन भारतीय क्रिकेट संघाला १७५/६ पर्यंत आणण्यास मदत केली.
वर्ल्ड चॅम्पियन्सचा बचाव
प्रोटिआजच्या एकाही फलंदाजाला हात सैल सोडता आला नाही. एकालाही नाही.
अर्शदीप सिंगने पहिल्या तीन ओव्हर्समध्ये क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सला झटपट बाद करून आपली चुणूक दाखवली.
कुंग फू पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी पार्टीत सामील होऊन पाहुण्या संघाला १० ओव्हर्समध्ये ६/६८ पर्यंत रोखले.
बुमराहच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
बूम बूम बुमराहच्या आयुष्यातला आणखी एक दिवस.
आपल्या या नॅशनल ट्रेझरने डेवाल्ड ब्रेव्हिसची विकेट घेतली आणि सर्व फॉरमॅटमध्ये 💯 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला!
त्यानंतर लवकरच भारतीय क्रिकेट टीमने विजयाची चव चाखली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला टी२०आयमधली सर्वांत कमी धावसंख्या दाखवली आणि दौऱ्याचा शेवटचा टप्पा उत्तमरित्या सुरू केला!
**********
थोडक्यात धावसंख्या: भारताकडून १७५/६ (हार्दिक पांड्या ५९*, लुंगि न्गिडी ३/३१) दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव ७४/१० (डेवाल्ड ब्रेविस २२, अक्षर पटेल २/७).