News

INDvSA, दुसरा टी२०आय: तिलकचा लढा. पण प्रोटिआजकडून सामना खिशात. मालिकेत १-१ ने बरोबरी

By Mumbai Indians

नवीन चंदीगढ स्टेडियमवरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका ५१ धावांनी विजयी झाली.

मुल्लनपूरमध्ये आजचा दिवस कसा गेला हे पाहूया.

वरूण, अक्षर यांनी लढ्याचे नेतृत्व केले

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच उत्तम खेळ करत चौकार- षट्कारांची बरसात केली.

परंतु वरूण चक्रवर्ती (२/२९) आणि अक्षर पटेल यांनी (१/२७) फटकेबाजीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. सलामी फलंदाज क्विंटन डे कॉकने ४६ चेंडूंमध्ये ९० धावा केल्यामुळे पाहुण्या संघाचा धावफलक २१३/४ वर पोहोचला.

गोष्टी टीम इंडियाच्या मनासारख्या झाल्या नाहीत

संपूर्ण सामन्यादरम्यान तराजू दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झुकला होता.

तिलक-हार्दिक यांनी सलग ५१ धावा केल्या आणि टीव्हीनेही अर्धशतक तर जितेशने अप्रतिम खेळ केला. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने बाजी मारली.

सूर्यकुमार यादव आणि कंपनी रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी धर्मशाळा येथे तिसऱ्या टी२०आय सामन्यासाठी सज्ज आहे.

**********

थोडक्यात धावसंख्या: दक्षिण आफ्रिकेचा २१३/४ (क्विंटन डे कॉक ९०, वरूण चक्रवर्ती २/२९) भारतावर ५१ धावांनी विजय १६२/१० (तिलक वर्मा ६२, ओटनील बर्तमान ४/२४).