News

भारताच्या ८२ धावांच्या विजयामुळे शेवटचा सामना अटीतटीचा होणार

भारताने दक्षिण आफ्रिकेला राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर ८२ धावांनी हरवले असून पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत २-२ ची बरोबरी केली आहे. 

दिनेश कार्तिकचे दिमाखदार अर्धशतक (२७ चेंडूंमध्ये ५५ धावा) भारताला १६९/ ६ धावांवर घेऊन गेले तर आवेश खानने प्रोटीआजच्या फलंदाजीला ४/१८ या कामगिरीने टिकूच दिले नाही. 

टी२०आय मालिकेत सलग चौथ्या वेळी दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

ऋषभ पंतने आपली तीच टीम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रोटीआजनी क्विंटन डे कॉक, मार्को जेन्सन आणि लुंगी निडी यांना रेझा हेंड्रिक्स, वायने पार्नेल आणि कागिसो रबाडा यांच्याऐवजी उतरवले. 

पहिल्या ओव्हरमध्ये आठ धावा केल्यानंतर भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर्समध्ये विकेट गमावल्या. लुंगी निडीने परत येऊन ऋतुराज गायकवाडला एक जलदगती चेंडू टाकला. त्याने हा चेंडू डे कॉकच्या हातात सोपवला. 

प्रथमच खेळणाऱ्या मार्को जेन्सनने श्रेयस अय्यरला बाद करून दक्षिण आफ्रिकेसाठी आपले विकेटचे खाते उघडले. अंपायरने सुरूवातीला नॉट आऊट घोषित केल्यानंतर या डावखुऱ्या गोलंदाजाने एलबीडब्ल्यूचे अपील केले. 

थर्ड अम्पायनरे त्याचे अपील मान्य केले. कारण चेंडू सरळ रेषेत जाऊन स्टंपवर आदळला. त्यामुळे अय्यर आधीच्या चेंडूवर चौकार मारून पुढच्या चेंडूवर लगेच बाद झाला.

पॉवर प्लेचा टप्पा ४०/२ वर पूर्ण केल्यावर भारताने पुढच्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनची विकेट गमावली. अन्रिच नॉर्ट्जेच्या शॉर्ट बॉलला किशनने थर्ड मॅनकडे टोलवायचा प्रयत्न केला. पण तो वरच्या कडेला लागला आणि सरळ क्विंटन डे कॉककडे गेला. ओपनर २६ चेंडूंवर २७ धावा करून बाद झाला. 

पंतच्या डीप बॅकवर्ड पॉइंटकडील बाऊंड्री शॉट्समुळे ७.४ ओव्हर्समध्ये भारताने ५० धावा पूर्ण केल्या. पण पुढच्या दोन ओव्हर्समध्ये फक्त चार धावा करून यजमान संघ पहिल्या इनिंगच्या मध्यावर फक्त ५६/ ३ ची धावसंख्या उभी करू शकला. 

हार्दिक पंड्याने बॅटसोबत भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याने १२ व्या ओव्हरमध्ये १६ पैकी १४ धावा काढल्या. त्याने तब्रेज शम्सीच्या गोलंदाजीवर एकामागून एक दोन षटकार ठोकले आणि रन रेट प्रति ओव्हर ७.०० धावांपलीकडे नेला. 

ऋषभ पंत १७ धावांवर बाद झाल्यामुळे चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची उत्तम भागीदारी संपुष्टात आली. केशव महारारजने ऑफ स्टंपच्या बाहेर वाइड बॉल टाकला आणि पंतने तो टोलवायचा प्रयत्न केला. परंतु तो सरळ शॉर्ट थर्ड मॅनच्या जागेवर ड्वायने प्रेटोरियसकडे गेला. 

भारताने १५.१ ओव्हर्समध्ये १०० धावा पूर्ण केल्या. दिनेश कार्तिकने संघासाठी धावा फटकावण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 

कार्तिकने हार्दिक पंड्यासोबत भागीदारी करताना १९ ओव्हरमध्ये आपली विकेट दिली. परंतु त्याने डेथ ओव्हर्समध्ये नऊपैकी आठ चौकार मारले आणि त्यासोबत दोन षटकारही ठोकले. आपले पहिले अर्धशतक झळकावल्यावर आणि भारताला १५० धावांपलीकडे नेल्यावर हा मधल्या फळीतला फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये ड्वायने प्रेटोरिसयकडून ५५ धावांवर बाद झाला. 

भारताने शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये ७३ धावा फटकावून आपली पहिली इनिंग १६९/६ वर संपवली. 

प्रोटीआजने १७० धावांचा पाठलाग सुरू केल्यानंतर त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज पॉवर प्लेचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच पॅव्हिलियनला परतले. चौथ्या ओव्हरच्या सुरूवातीला टेम्बा बावुमा कोपराला दुखापत झाल्यामुळे बाहेर पडला तर क्विंटन डे कॉकला ड्वायने हर्षल पटेल याने रन आऊट केले. 

प्रेटोरियस पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अवेश खानच्या चेंडूला लेग साइडला सरकवण्याच्या प्रयत्नात कडेला चेंडू लागून बाद झाला. चेंडू सरळ विकेट कीपर ऋषभ पंतच्या हातात जाऊन विसावला. प्रोटीआजचा पहिल्या सहा ओव्हर्सच्या शेवटी स्कोअर ३५/२ होता, जो पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या एकूण धावसंख्येपेक्षा पाचने कमी होता. 

दक्षिण आफ्रिकेने आपली तिसरी विकेट नवव्या ओव्हरमध्ये गमावली. युजवेंद्र चहलचा न वळणारा चेंडू हेन्रिच क्लासेनच्या बॅटखालून गेला आणि समोरील पॅडला आपटला. त्यामुळे तो एलबीडब्ल्यू होऊन बाद झाला. क्लासेनचे रिव्ह्यू अपीलदेखील त्याच्याविरूद्ध गेले. 

हर्षल पटेलने लांबच्या टप्प्यावर टाकलेला चेंडू ऑफ स्टंपवरून गेल्यामुळे त्याला डेव्हिड मिलरची महत्त्वाची विकेट मिळाली. प्रोटीआजच्या विजयाची आशा असलेला मिलर सात चेंडूंवर फक्त नऊ धावा करू शकला. 

प्रोटीआजनी भारतीय गोलंदाजांविरूद्ध सामना सुरूच ठेवला होता. पण त्यांनी १४ ओव्हरमध्ये रसी वान देर दुसेन, मार्को जेन्सन आणि केशव महाराज यांच्या विकेट्स गमावल्या. अवेश खानने क्षेत्ररक्षक ऋतुराज गायकवाडसोबत भागीदारी करून दोन विकेट्स घेतल्या तर महाराजची कॅच शून्य धावांवर श्रेयस अय्यरने घेतली. 

युजवेंद्र चहलने आजची आपली दुसरी विकेट एन्रिच नॉर्ट्जेच्या रूपात घेतली. त्याने एक गुडघ्यावरून स्वीप शॉटचा प्रयत्न केला. तो फील्डर ईशान किशनकडे गेला आणि अगदी सोपा कॅच देऊन तो बाद झाला. 

सामना १६.५ ओव्हर्समध्ये संपला. लुंगी निडीने लाँग ऑनवर एक चुकीचा शॉट मारला. ऋतुराज गायकवाडने जराही चूक न करता आपली तिसरी विकेट घेतली. प्रोटीआज ८७ धावांमध्ये ऑल आऊट झाले. ही त्यांनी टी२०आयमधील सर्वांत कमी धावसंख्या ठरली. 

पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या आणि आतापर्यंत चारही सामन्यांत टॉस हरलेल्या भारताने दिमाखात पुनरागमन केले आहे आणि आता पाचवा टी२०आय सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळून जिंकण्यासाठी ते आतुर आहेत.