News

INDvNZ, पाचवा टी२०आय: ईशानचे शतक आणि अर्शचा हायफाय यामुळे मालिका ४-१ ने विजयी!

By Mumbai Indians

एक नंबर भारी काम झालेलं आहे. 💥

आपण जे पाहिलं त्यावर विश्वास बसत नाही.

भारतीय संघ टी२०आयमध्ये जगात सर्वोत्तम का आहे याची आणखी एक आठवण. चॅम्पियन्ससारखा लढणारा. चॅम्पियन्ससारखा सामना संपवणारा आणि मालिका अगदी स्टाइलमध्ये खिशात टाकणारा संघ. 👊

टी२०आयचा शेवटचा सामना ब्लॉकबस्टर का झाला ते पाहा 👇

ईशानचे तूफानी शतक 🔥

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून अप्रतिम खेळ केला.

आपली योजना स्पष्ट होती. धावफलकावर उत्तुंग धावसंख्या नोंदवणे. अशी जी पार करणे जवळपास अशक्य होईल. याची जबाबदारी पॉकेट डायनॅमोने शिरावर घेतली होती.

ईशान किशनने एक अप्रतिम शतक फटकावले. त्याने आपला खेळ इतका उंचावर नेला की तिथून त्याला कोणीही खाली आणू शकले नाही. त्याने केलेल्या कामगिरीमुळे अर्ध्या टप्प्यावर असलेला भारतीय संघ शेवटपर्यंत २७१ धावांवर पोहोचला.

अप्रतिम फटके. निर्भय खेळ. युगानुयुगे लक्षात राहील अशी कामगिरी. 💯

दादा आणि एचपीचा बोनस 💙

आपल्या या मुंभाईनी खेळाचा सूर बिघडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

सूर्यादादाने आपला उत्तम खेळ सुरू ठेवत मालिकेत तिसरे अर्धशतक फटकावले आणि सोबतच ३००० टी२०आय धावांचा टप्पा पार केला. शांत, संयमी, क्लासी आणि देखणी खेळी त्याने खेळली.

त्यानंतर आला एचपी. त्याने फक्त १७ चेंडूंमध्ये ४२ धावा करून अत्यंत सुंदर फलंदाजीला चार चाँद लावले.

अटतटीची शर्थ पण अर्शने रोखली 🖐

न्यूझीलंडनेही आपण हार मानणारा संघ नाही हे दाखवले.

त्यांनी कडवी झुंज दिली. सुंदर खेळ केला आणि एका टप्प्यावर आपल्या मनात भीतीही निर्माण केली. पण वेळ आली तेव्हा भारतीय संघ उभा राहिला.

या लढ्याचे नेतृत्व केले अर्शदीप सिंगने. अत्यंत कठीण सुरुवात करून पहिल्या दोन ओव्हर्समध्ये १ बाद ४० धावा असताना त्याने तब्बल पाच विकेट्स घेऊन आपण काही कमी नाही हे दाखवले.

मालिका खिशात. ४-१. ठरलं तर मग. गाडीने वेग पकडला आहे.

पुढील स्टेशन ️ #T20WorldCup 🏆

तडाखेबाज, दुर्दम्य, सज्ज. 💙