News

रो आणि हरमन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

By Mumbai Indians

काही करियर्समध्ये मोठे टप्पे पार होतात.

काहींमध्ये विजय मिळतो.

मग येतात रो आणि हरमन ज्यांनी देशासाठी सतत अभिमान कमावला आहे. 🇮🇳

हे दोन महान खेळाडू. दोन लीडर्स. ब्लू अँड गोल्डचे दोन चमकते तारे. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर या दोघांना चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार- पद्मश्री देऊन गौरवण्यात येणार आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतोय.

यादी वाढतेच आहे. 👏

आपल्या रोपासून सुरूवात करूया

🏆 २०२४ चा टी२० विश्वचषक विजेता

🏆 २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता

🏆 कर्णधार म्हणून ५ आयपीएल ट्रॉफी

२०२६ टी२० वर्ल्ड कपचा ब्रँड एम्बेसेडर.

धावा. विक्रम. ट्रॉफी. नेतृत्व. वारसा.

आणि तो अजूनही आघाडीवरच आहे.

मग आपली हरमनप्रीत कौर. तिने मैदानात ज्या ज्या वेळी प्रवेश केला त्या त्या वेळी नेतृत्वाची धुरा सांभाळली.

🏆 दोन वेळा डब्ल्यूपीएल विजेती

🏆 विमेन्स वर्ल्ड कप विजयात भारताचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार

🔥 भारताच्या अत्यंत दैदिप्यमान आणि निर्भय खेळाडूंपैकी एक

आता रो आणि हरमन या दोघांनी पद्मश्रीसोबत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

ते थांबले नाहीत.

त्यांनी हार मानली नाही.

ते आपल्याला दररोज प्रेरणा देत राहतात.

भारतीय क्रिकेटचे दोन महान खेळाडू. ब्लू अँड गोल्डचे दोन महान कलाकार. आता आकाशात चमकत आहेत.

अभिनंदन, हरमन आणि रोहित. तुम्ही एका पिढीला प्रेरणा देत आहात. 🫡💙