News

INDvNZ, दुसरा टी२०आय: सूर्यादादाचा राडा आणि भारताचा २-० ने विजय!

By Mumbai Indians

क्रिकेटच्या सर्वांत लहान स्वरूपात टीम इंडियाचा एक नंबर फॉर्म कायम राहिला आहे. 💥

रायपूर या फलंदाजांसाठीच्या नंदनवनात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली. न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर नियंत्रण कसे ठेवता येते हे दाखवून दिले.

आणखी एक संध्याकाळ. आणखी एक सनसनाटी विजय.

सामना कसा झाला ते पाहूया. 👇

गोलंदाजांनी एकत्र येऊन खेळ बांधून ठेवला

पाहुण्या संघाने सुरूवातीपासूनच खेळ स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण हातातून निसटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी तो सातत्याने विकेट्स घेऊन हातात ठेवला.

सुपर सांताच्या उत्तम फिनिशमुळे न्यूझीलंडचा संघ २०८ पर्यंत गेला. पण तोपर्यंत खेळ ताब्यात आला होता.

पॉकेट डायनॅमोचा रायपूरमध्ये धमाका 💥

पॉकेट डायनॅमो खेळायला उतरला. 🔥

आपला लाडका ईशान किशनने जबरदस्त फॉर्म कायम ठेवत ७६ धावा केल्या आणि चेंडू सातत्याने मैदानाबाहेर टोलवत ठेवला. ऊर्जा, ताकद आणि हार न मानण्याचा त्याचा स्वभाव यांच्यामुळे पाठलाग खूप पटकन नियंत्रणात आला.

रायपूरमध्ये उत्साहाची लाट आली होती. त्यानंतर आला आपला कर्णधार.

सूर्यादादाचा राडा 😮💨

तब्बल ४६८ दिवसांनी सूर्यादादाने टी२०आयचे अर्धशतक अगदी स्टाइलमध्ये झळकवले. 🥹

त्याने ११ चेंडूंमध्ये ११ धावांपासून पापणी लवेपर्यंत ३७ चेंडूंमध्ये ८२ धावा फटकावल्या. अत्यंत शांत, संयमी आणि गरज असताना स्फोटक कामगिरी करून आपण लीडर का आहोत हे त्याने सिद्ध केले.

कर्णधाराच्या या मॅच्युअर खेळामुळे भारताने जराही न थांबता पाठलाग पूर्ण केला आणि २-०ने आघाडी घेतली.👊

फॉर्म उत्तम?

वर्चस्व उत्तम.

सामन्याचा कल? आपल्याच बाजूने. 💙

थोडक्यात धावसंख्या: न्यूझीलंडचा २०८/६ (मिशेल संतनर ४७, कुलदीप यादव २/३५) भारताकडून ७ विकेट्सनी पराभव २०९/३ (सूर्यकुमार यादव ८२, ईश सोधी १/३४).