News

INDvNZ, पहिला टी२०आय: अभिषेकच्या उत्तम खेळामुळे भारताची १-० ने आघाडी! 

By Mumbai Indians

टी२० विश्वचषकाकडे जाण्याचा मार्ग नागपूरमध्ये सुरू झाला असून टीम इंडियाने स्वतःला सिद्ध करण्यात जराही वेळ घालवलेला नाही. 👊 

टी२० विश्वचषकापूर्वी शेवटच्या टी२०आय मालिकेत भारतीय संघाने उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. सूर्यादादासाठी हा सामना छान ठरला कारण त्याने या वेळी १०० वा टी२०आय सामना खेळला आणि तोही जिंकण्याच्या उद्देशाने.

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने २३८/७ अशी धावसंख्या रचली. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडचा संघ ४८ धावा कमी असतानाच सर्व बाद होईल याची काळजी घेतली. त्यामुळे यजमान संघाने १-० ने आघाडी घेतली.

चला तर बघूया काय झाले ते 👇

अभिषेकने कमाल केली

भारतीय इनिंगची सुरूवात नेमकी जशी हवी होती तशीच झाली.

पहिल्या क्रमांकाचा टी२०आय फलंदाज अभिषेक शर्मा याने २०२५ मध्ये जिथे थांबला होता तिथून खेळायला सुरूवात केली आणि पहिल्या फळीत उत्तम कामगिरी केली. पहिल्या चेंडूपासूनच तो निर्भय होता, कुठेही अडथळा न येता खेळ पूर्णपणे ताब्यात ठेवून खेळला.

त्यानंतर त्याला चांगली मदतही मिळाली. कर्णधार स्कायने आपली कामगिरी अचूक बजावली. त्याने ३२ धावा केल्या आणि ९००० टी२० धावा पूर्ण केल्या. त्याच्यासाठी आणि आपल्यासाठीही हा एक अविस्मरणीय क्षण होता.
त्यानंतर आला आपला एचपी. त्याने पहिल्याच चेंडूपासून गाडी सहाव्या गियरमध्ये चालवून मधल्या ओव्हर्समध्ये २५ धावा फटकावल्या आणि सामन्याचा तराजू भारताच्या बाजूने कायम राहील याची काळजी घेतली.

त्यानंतर शेवटची कामगिरी करण्यासाठी रिंकू सिंग मैदानात आला. त्याने भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्ध आतापर्यंतच्या टी२०आय मधील सर्वाधिक धावा पूर्ण करण्यास मदत केली.

गोलंदाजांनी तंबू राखला

भारतीय गोलंदाजांच्या पाठीशी भरपूर धावा असल्यामुळे हल्ला ते थेट हल्ला करण्यासाठी मैदानात उतरले.

अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी पहिल्याच ओव्हर्समध्ये विकेट्स घेतल्या. त्यांनी सामन्याच्या सुरूवातीलाच कल आपल्याकडे राहील असे पाहिले आणि न्यूझीलंडला बॅकफूटवर टाकले. त्यानंतर स्पिनर्सनी सामना नियंत्रणात घेतला आणि एकामागून एक विकेट्स घेऊन पाठलाग पूर्ण होणार नाही असे पाहिले.

नागपूरमध्ये भारतीय संघाने पहिल्यापासूनच विजयी दौड कायम ठेवल्याने निकाल आपल्या बाजूने लागणार यात काहीही शंका नव्हती.

ओडीआय मालिकेतील निराशेनंतर दिलेले हे उत्तर तगडे होते.

भारताने टी२०आय मालिकेत १-० ने आघाडी घेतली असून दिलेला संदेश स्पष्ट आहे. भारतीय संघाला अगदी योग्य वेळेत आपली लय मिळते आहे. 💙

थोडक्यात धावसंख्या: भारताकडून २३८/७ (अभिशेक शर्मा ८४, जेकब डफी २/२७) न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव १९०/७ (ग्लेन फिलिप्स ७८, शिवम दुबे २/२८).