News

INDvNZ: लॅथम, विल्यमसन रॉक्स, भारत शॉक्स

By Mumbai Indians

तीन भारतीय खेळाडूंनी प्रत्येकी अर्धशतक झळकवल्यानंतर आणि स्लॉग ओव्हर्समध्ये जोरदार खेळ करूनही किवीजनी या वेळी बाजी मारली. या मैदानावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात ३०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य फक्त एकदाच पूर्ण झाले.

धवन- गिलची जोडी सुपरहिट!

कर्णधार धवनने ७७ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. त्यात १३ चौकार मारले तर तरूण तडफदार गिलने केलेल्या ५० धावांमध्ये तीन षटकार होते. ही १२ इनिंग्समधली त्यांची चौथी शतकापेक्षा अधिक धावांची भागीदारी होती आणि प्रत्येक मालिकेसोबत ती प्रतिस्पर्ध्यांसाठी जास्तीत जास्त धोकादायक ठरू लागली आहे.

अय्यरची तडाखेबाज खेळी

सलामीच्या फलंदाजांनी उत्तम सुरूवात केल्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने ७६ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. त्यात चार चौकार आणि चार षटकार होते. तो एलबीडब्ल्यूमधून थोडक्यात वाचला आणि कॅचमधूनही बालंबाल वाचला. या २७ वर्षीय तरूण खेळाडूने न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत सलग चौथी अर्धशतकी खेळी केली असून त्याने यापूर्वी २०२० च्या मालिकेतील तीन सामन्यांत १०३, ५२ आणि ६२ अशा धावा केल्या होत्या.

वॉशिंग्टनचे सुंदरपुनरागमन

संजू सॅम्सन ४६ व्या ओव्हरमध्ये ३८ चेंडूंमध्ये ३६ धावा करून बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या आतषबाजीसाठी पिच सज्ज झाले होते. मुख्य म्हणजे त्याने आपल्या चाहत्यांना अजिबात निराश केले नाही. त्याने किवीज जलदगती गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला आणि अप्रतिम फटक्यांची माळ लावून संपूर्ण मैदानभर त्यांना पळवले. त्याने पेनल्टीटाइम ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर दोन चौकार आणि एक षटकारही फटकावला.

जम्मू एक्स्प्रेसचा मैदानावर प्रभाव

जलदगती उमरान मलिकला दिवसाच्या सुरूवातीलाच खेळणाऱ्या ११ च्या संघात प्रथमच स्थान दिले गेले. त्यामुळे तो आपली पहिलीवहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दोन ओव्हर्स टाकल्यानंतर त्याने डेवॉन कॉनवेची पहिलीच विकेट घेतली. कॉनवे क्रीझवर ४२ चेंडू खेळला पण स्थिरावला नाही. त्याने एक वेगवान, वाइड चेंडू टाकला आणि तो सरळ पंतच्या हातांमध्ये जाऊन थांबला.

आपल्या पाचव्या ओव्हरमध्ये त्याने आणखी एका वाइड चेंडूने फॉर्ममध्ये असलेल्या डेरिल मिशेलला बाद केले. त्याची कॅच बदली क्षेत्ररक्षक दीपक हूडाने सीमारेषेच्या अगदी जवळ पकडली.

विल्यमसन आणि लॅथमची सामना ठरवणारी भागीदारी

यजमान संघ अटीतटीच्या धावसंख्या पाठलागात २० ओव्हर्सच्या शेवटी ८८/३ अशा काळजी वाटायला लावणाऱ्या टप्प्यावर होता. त्यामुळे टीम इंडियाला आपण सामना जिंकू शकतो अशी आशा वाटत होती. पण कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनी भारताची आशा संपुष्टात आणली.

या दोन्ही फलंदाजांनी धावांच्या पाठलागात अत्यंत धोरणीपणे खेळ केला. कर्णधार विल्यमसनने लॅथमला संधी दिली आणि त्याने हल्ले करून या संधीचे सोने केले. शेवटी त्यांनी आपल्या टीमला अविस्मरणीय असा सात विकेटनी विजय मिळवून दिला.

महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे १७ चेंडू शिल्लक असताना आणि अत्यंत जोरदार खेळ करून शक्य केले. भारताला विशेषतः आपल्या गोलंदाजीवर काम करण्याची गरज आहे आणि त्यांना हे लगेच करावे लागेल. त्यांच्याकडे रविवारी (२७ नोव्हेंबर) रोजीच्या पुढच्या सामन्यापूर्वी फक्त दोनच दिवस आहेत.

महत्त्वाचा टप्पा : न्यूझीलंडच्या भारताविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमधील टॉम लॅथमची १४५* धावसंख्या ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.

महत्त्वाचा टप्पा २: केन विल्यमसन आणि टॉम लॅथमची २२१* ची भागीदारी या दोन्ही संघांमधील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विक्रमी भागीदारी आहे.

थोडक्यात धावसंख्या: भारताचा ३०६/७ (श्रेयस अय्यर ८०, लॉकी फर्ग्युसन ३/५९) न्यूझीलंडकडून ३०९/३ ने सात विकेट्सनी पराभव (टॉम लॅथम १४५*, उमरान मलिक २/६६)