News

INDvNZ- सूर्याची बॅट पुन्हा तळपली!

By Mumbai Indians

सूर्यादादा सध्या कोणाला ऐकत नाहीये. त्याच्या बॅटला स्प्रिंग बसवलीय की काय असे वाटू लागले आहे. या वेळी भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडला १२६ धावांमध्ये गुंडाळून ६५ धावांनी त्यांचा पराभव करण्यात आला.  

टी२०आयमध्ये एका ब्रेकनंतर ईशान किशनची पुन्हा एंट्री

सलामी फलंदाज ईशान किशन या वर्षाच्या सुरूवातीला भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरचा हा पहिला सामना खेळला आहे. मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने या वेळी चांगला खेळ करून भारतीय संघाला ३१ चेंडूंमध्ये ३६ धावा करून दिल्या. आठव्या ओव्हरमध्ये ईश सोधीच्या एलबीडब्ल्यूच्या दाव्यातून थोडक्यात बचावल्यानंतर किशनने पाच चौकार आणि एक षटकारासह आपल्या इनिंग्समध्ये चांगला खेळ केला.

सूर्याचा मंत्र: खा. आराम करा. धावांचा पाऊस पाडा. पुन्हा तसेच करा!

गोलंदाजीला खिंडार पाडणे ही एक कला असेल तर स्काय त्यातला मास्टर आहे. त्याने आपल्या करियरमधले दुसरे टी२०आयचे शतक पूर्ण केले. या वेळीही त्याने असाच खेळ केला. त्याच्या नेहमीच्या आऊट ऑफ बॉक्स हिट्ससोबत त्याने गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि प्रेक्षकांनी या खेळाचा पुरेपूर आनंद घेतला. यजमान संघ सूर्या खेळत असताना हतबल झाल्याचे चित्र दिसत होते. त्याने ५१ चेंडूंमध्ये १११ धावा केल्या. त्यात ११ चौकार आणि सात षटकार फटकावले.

आणि बघता बघता टिम साऊथीने हॅटट्रिक केली

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज टिम साऊथी हा यजमान संघाच्या अत्यंत सामान्य गोलंदाजांमधला एक तारा ठरला. त्याला त्याच्या कोट्यातील पहिल्या तीन ओव्हर्समध्ये फारसे यश मिळाले नाही. पण शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने याचा पूर्ण वचपा काढला. त्याने कर्णधार हार्दिक पंड्या, दीपक हूडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद केले. त्यातही त्याने स्कायला स्ट्राइकपासून लांब ठेवले.

गंमतीचा भाग म्हणे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन हॅटट्रिक्स करणारा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यापूर्वी एमआयचा खेळाडू लसिथ मलिंगा याने ही कामगिरी केली होती.

वॉशिंग्टनच्या सुंदर गोलंदाजीचा धमाका

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या इनिंगची सुरूवात चांगली झाली. भुवनेश्वर कुमराच्या पहिल्याच ओव्हरमधल्या दुसऱ्या चेंडूवर फिन एलेन शून्यावर बाद झाला. त्यानंतर मधल्या फळीत विल्यमसन कॉनवेसोबत खेळायला आला आणि हे दोघेही भारतीय संघासाठी धोकादायक वाटत होते.

परंतु सुंदरने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये डेव्हॉन कॉनवेची विकेट घेऊन भारतासाठी धोकादायक ठरू शकणारी ५६ धावांची भागीदारी मोडून काढली. कॉनवेचा सुंदरच्या बॉलचा अंदाज चुकला आणि त्याने अर्शदीप सिंगच्या हातात विकेट दिली.

बेओव्हलवर दीपकची आतषबाजी!

दीपक हूडाने या वेळी टी२०मधल्या आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्याने चार विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतील आपले अपयश धुवून काढले. कर्णधार केन विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले परंतु त्याला खेळ पुढे नेता आला नाही आणि त्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे फारसा टिकू शकला नाही.

थोडक्यात धावसंख्या: भारत १९१/६ (सूर्यकुमार यादव १११*, टिम साऊथी ३/३४) न्यूझीलंड १२६/१० (केन विल्यमसन ६१, दूपक हूडा ४/१०) भारताकडून न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव.