News

मी मुलांशी पुढच्या योजना आणि आपल्यात सुधारणा कसे करत जायचे याबाबत बोलत असतो- ब्रॅड हॉग

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सचा संघ याही वर्षी तरूण खेळाडूंनी सळसळता आहे. उगवत्या खेळाडूंना पुढे आणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबई इंडियन्सने नवीन खेळाडूंचा शोध घेतला आणि त्यांना संधी दिली. त्यामुळे क्रिकेट जगातील सर्वांत मोठ्या नावांशी त्यांची ओळख होत असून त्यांना ज्ञानही मिळते आहे.

या वर्षी टीममध्ये आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणांमध्ये कुमार कार्तिकेय आणि राघव गोयल यांचा समावेश आहे. कार्तिकेय आणि गोयल हे दोघेही डावखुरे मनगटी स्पिनर्स आहेत जे क्रिकेटच्या जगात अत्यंत दुर्मिळ आहे. कार्तिकेयने मागील वर्षी एमआयसाठी अत्यंत दमदार आगमन केले होते तर गोयल यंदा प्रथमच #OneFamily चा भाग झाला आहे.

हे दोघेही दोन वेळा विश्वचषक विजेत्या आणि जगातील सर्वोत्तम डावखुऱ्या मनगटी स्पिनर्सपैकी एक ब्रॅड हॉग यांच्याकडून मुंबई इंडियन्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

“हो, मी इथे काही स्पिनर्सना मदत करायला आलो आहे. इथे एक दोन मनगटी स्पिनर्स  आहेत,” हॉग म्हणाले. “मी मध्ये मध्ये मुलांशी योजना आणि पद्धतींबाबत तसेच आपण आपल्यात कशा प्रकारे सुधारणा घडवत आणायची याबाबत बोलत असतो,” ते म्हणाले.

कार्तिकेय हा देशांतर्गत क्रिकेट जगातला सर्वाधिक सातत्यपूर्ण गोलंदाजांपैकी एक आहे. तो डाव्या हाताने पारंपरिक स्पिन टाकण्यातही सक्षम आहे. तो मागील वर्षी रणजी चषक जिंकणाऱ्या मध्य प्रदेशच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता.

हॉगने कार्तिकेयचे प्रचंड कौतुक केले. “त्याच्या कामातील नैतिकता मला खूप महत्त्वाची वाटते. ही खरंच चांगली गोष्ट आहे. तो शिकण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक आहे.”

गोयलने अद्याप व्यावसायिक वरिष्ठ पातळीवरील क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्याने या तिन्ही प्रकारात एकही सामना खेळलेला नाही. हॉग्स म्हणतो की तो आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याला तयार करत आहे.

“राघव अजूनही लहान आहे. तो अजूनपर्यंत या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे फर्स्ट क्लास क्रिकेटपटू होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकतो आहे.”

हे तरूण स्पिनर्स हॉगसोबत काम करण्यासाठी तेवढेच उत्सुक आहेत. “मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वोत्तम डावखुऱ्या मनगटी स्पिनर्सपैकी तो एक आहे,” कार्तिकेय म्हणाला.

हॉग्सच्या प्रशिक्षणात आधी या तरूणांशी शांतपणे जुळवून घेणे आणि त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन देणे या गोष्टी असतात. ही गोष्ट कार्तिकेयला खूप आवडते.

“त्याला मजा करायला खूप आवडते. त्यामुळे त्याच्याकडून शिकताना मलाही खूप आवडते.”

फक्त २२ वर्षांचा असलेला गोयल म्हणतो की तो हॉगचा दीर्घकालीन चाहता आहे. “तो माझ्या अत्यंत आवडत्या गोलंदाजांपैकी एक आहे. मला तो लहानपणापासूनच खूप आवडत होता.”

या स्पिन ट्विन्सना भेटण्याच्या या छोट्या कालावधीत हॉग्सने त्यांना आपलेसे केले आहे. “तो खूप सकारात्मक आहे. त्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना कसा केला हे तो मला सांगतो. प्रत्येक वेळी सकारात्मक कसे राहायचे, कसे सज्ज व्हायचे आणि प्रयत्न करत राहायचे हे तो मला सांगतो. त्यामुळे मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे,” गोयल म्हणाला.