News

१२ सामन्यांनंतर एमआय: दिल्लीविरूद्ध सुरू झालेला एक आमूलाग्र बदल

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधला आतापर्यंतचा प्रवास बॉलीवूड ब्लॉकबस्टरपेक्षा कमी नाही - अडथळे, शेवटच्या ओव्हरमधील थ्रिलर, अॅक्शन आणि एक जबरदस्त पुनरागमन!📽️

१२ सामने खेळून सात विजय मिळवल्यानंतर बॉईज इन ब्लू आणि गोल्ड आता आत्मविश्वासाने भरलेले आहेत कारण ते दिल्ली कॅपिटल्सचा एका महत्त्वाच्या सामन्यात आमनासामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तो त्यांना प्लेऑफच्या जवळ नेऊ शकतो.🚀

पण रूको जरा, सब्र करो... आतापर्यंत काय काय घडले त्याची उजळणी केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

सीझनची सुरुवात टिपिकल एमआय स्टाइलने झाली नाही - पहिल्या पाच सामन्यांमधील चार पराभवांमुळे धोक्याची घंटा वाजली. पण शंका येऊ लागल्या तेव्हा संघाने फॉर्म बदलला आणि कसा ते तर आपल्याला माहीतच आहे?! 💥

आठव्या स्थानावर पिछाडीला असण्यापासून ते पहिल्या चार टीम्समध्ये धमाकेदार एंट्री मिळवेपर्यंत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीमने जिगर, चिकाटी आणि एमआयची टिपिकल फाइट करण्याची पद्धत दाखवली आहे.

१३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध १२ धावांनी विजय 12-run victory against Delhi Capitals on 13th एप्रिल – त्यांचाच सामना आपण आता करणार आहोत. तिथूनच आपली विक्रमी सहा सामन्यांची बरोबरी करणारी विजयी एक्स्प्रेस सुसाट सुटली our record-equalling six-match winning streak, त्यामुळे बि.ली.फ. परत आला. भावांनो आता हाच निकाल हवाय 🤗

जबरदस्त गोलंदाजी, तुफान खेळी आणि पलटनच्या अढळ पाठिंब्याने भरलेला हा प्रवास आम्हाला आवडला.💙

प्लेऑफची शर्यत पेटली असताना प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे. अगदी शब्दशः! मागच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्धचा एक छोटासा धक्का आमचा उत्साह कमी करू शकणार नाही. 🔥 आता थोड्या प्रतीक्षेनंतर आमच्या डोळ्यात तोच उत्साह घेऊन आम्ही पुन्हा मैदानात उतरतो आहोत!

तर सज्ज व्हा पलटन. स्पर्धेच्या या महत्त्वाच्या टप्प्यात आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आणि जल्लोषाची प्रचंड गरज आहे. येताय ना मग. 🔊

चला तर, वानखेडेला भेटूया २१ मे ला! 🤝

मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा प्रवास

तारीख

प्रतिस्पर्धी

स्थान

निकाल

२३ मार्च

सीएसके

चेन्नई

४ विकेट्सनी पराभव

२९ मार्च

जीटी

अहमदाबाद

३६ धावांनी पराभव

३१ मार्च

केकेआर

मुंबई

८ विकेट्सनी विजय

४ एप्रिल

एलएसजी

लखनो

१२ धावांनी पराभव

७ एप्रिल

आरसीबी

मुंबई

१२ धावांनी पराभव

१३ एप्रिल

डीसी

दिल्ली

१२ धावांनी विजय

१७ एप्रिल

एसआरएच

मुंबई

४ विकेट्सनी विजय

२० एप्रिल

सीएसके

मुंबई

९ विकेट्सनी विजय

२३ एप्रिल

एसआरएच

हैदराबाद

७ विकेट्सनी विजय

२७ एप्रिल

एलएसजी

मुंबई

५४ धावांनी विजय

१ मे

आरआर

जयपूर

१०० धावांनी विजय

६ मे

जीटी

मुंबई

३ विकेट्सनी पराभव