
आयपीएल २०२५ च्या उर्वरित कालावधीसाठी एमआयकडून जॉनी बेरस्टॉ, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असालांका यांना संधी
सुरू असलेल्या स्पर्धेच्या उर्वरित कालावधीसाठी मुंबई इंडियन्सच्या संघात जॉनी बेरस्टॉ, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असालांका हे तीन नवीन चेहरे समाविष्ट झाले आहेत.
हे तिघे खेळाडू विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश यांच्याऐवजी खेळतील.
रिकल्टन आणि बॉश यांची निवड ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी २०२३-२४ च्या अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंच्या दक्षिण आफ्रिका संघात झाली आहे तर विल जॅक्स वेस्ट इंडिजविरूद्ध व्हाइट बॉल मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला परतणार आहे.
या नवीन खेळाडूंच्या टी२० आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास जॉनी बेरस्टॉ आणि त्याच्याच देशातील खेळाडू रिचर्ड ग्लीसन यांनी अनुक्रमे ५०००+ धावा आणि १००+ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान श्रीलंकेच्या लिमिटेड ओव्हर्स कर्णधार चरिथ असालांका याने १००+ टी२०मध्ये २७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात स्वतःला सिद्ध केले आहे.
पलटन, या तिघांचे खुल्या दिलाने स्वागत करूया! 💙