News

एकच दिवस बाकी! आरसीबी विरूद्ध एमआयः चला बंगळुरूला ब्लू आणि गोल्डमध्ये रंगवूया

By Mumbai Indians

काऊंटडाऊन थांबवा. तुमचे अलार्म्स लावा. ब्लू अँड गोल्ड जर्सी घाला आणि: मुंबई...!!!! मुंबई.... ** टाळ्या, टाळ्या, टाळ्या **

आपण भारताच्या गार्डन सिटीमध्ये- बंगळुरूमध्ये पोहोचलो आहोत. हे ठिकाण जिथे आपल्याला आयपीएल क्रिकेट खेळायला मजा येते. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या १० सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये मिळालेला विजय तुम्हाला तुम्हाला आमचं म्हणणं पटवायला पुरेसा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आपल्यामध्ये झालेल्या शेवटच्या सामन्याला ३५८ दिवसस उलटले आहेत. आपल्याला सात विकेट्सनी पत्करावी लागलेली हार अजूनही आपल्या मनात ताजी आहे. आपल्याला मिळालेले धडे आणि आता आपल्या हातात सामना परत घेण्यासाठी आपण किती उत्सुक आहोत हे दाखवण्याची वेळ आली आहे. शिवाय विमेन्स टीमकडून धडा घेऊन आपला पहिल्या सामन्यातला पराभव विजयात बदलायचीही ही वेळ आहे.

नवीन धोरण टीम, नवीन फलंदाजी प्रशिक्षक आणि आपल्या टीममध्ये एक नवीन आत्मविश्वास. पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबईचा संघ आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य परत आणण्यासाठी सज्ज आहे. नवीन खेळाडू आणि जुन्या प्रतिस्पर्धींसोबत आमनेसामने. तर आता हे सगळे पुन्हा घडणार आहे.

काय: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: रविवार, १ एप्रिल

कुठे: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

काय अपेक्षा आहे: दोन्ही बाजूंनी टॅलेंटचा उत्सव, अनेक सुपरस्टार्स, इम्पॅक्ट प्लेयरचे नाट्य, सपाट खेळपट्टी, मोठ्ठे षटकार आणि अर्थातच रोहित विरूद्ध विराट.

आकडेवारी

संघ

खेळलेले सामने (एकूण)

जिंकलेले

हरलेले

बरोबरीत

अनिर्णित

एमआय

30

17

12

1

0

आरसीबी

30

12

17

1

0

संघ

एमआय- आरसीबी युद्धात सर्वाधिक धावा

एमआय आरसीबी युद्धात सर्वाधिक विकेट्स

एमआय

रोहित शर्ममा: २२ सामन्यांमध्ये ५६६ धावा

जसप्रीत बुमराः १८ सामन्यांमध्ये २४ विकेट्स

आरसीबी

विराट कोहलीः ३२ सामन्यांमध्ये ८२७ धावा

युजवेंद्र चहलः १५ सामन्यांमध्ये २२ विकेट्स

पलटन, आपला हिटमॅन रोहित, आपला दादा सूर्या, पॉकेट डायनॅमो ईशान किशन आणि बाकीचे सगळे खेळाडूंना मैदानात उतरायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. मुंबईतला क्रिकेट फीव्हर मागच्या अनेक पिढ्यांमध्ये वाढला आहे आणि आपण आता आपल्या पहिल्या आयपीएल चषकाचे दशक पूर्ण केले आहे.

तुमच्या हार्टबीट्स रोलर कोस्टर राइडवर जाण्यासाठी सज्ज आहेत का? हा रोलर कोस्टर फक्त आपल्या हातात ट्रॉफी आल्यावरच थांबेल, सो ब्रिंग इट ऑन बेबी!