News

MIvPBKS पूर्वावलोकनः हॅटट्रिक झाली, आता मलिंगासारखं खेळायची पाळी

By Mumbai Indians

या वीकेंडला कुठे बाहेर जाताय का? नका जाऊ. सरळ वानखेडेवर चला. पंजाब किंग्सचा संघ आलाय आणि आम्ही सज्ज आहोत. एक छोटीशी गंमतसुद्धा आहे. कोणाचातरी ५० वा वाढदिवस आहे आणि एडव्हान्स बर्थ डे पार्टी तय्यार आहे.

आकडेवारीनुसार, एमआय- पीबीकेएस यांच्यातल्या सामन्यांची आकडेवारी आपल्याला चकित करणारी आहे. आपण २९ सामने खेळलो. त्यातले १५ जिंकलो आणि १४ हरलो. तुम्हाला माहित्ये का की अजून निसटती गोष्ट काय होती? हे दोन्ही संघ वानखेडेवर एकत्र येतात तेव्हा उसळणारा भावनांचा कल्लोळ. नखं कुरतडायला तयार राहा.

२०१९ आठवतंय? ‘लॉर्ड’ कायरन पोलार्डच्या ३१ चेंडूंमध्ये ८३ धावा केएल राहुलच्या नाबाद १०० धावांवर भारी पडल्या आणि त्यामुळे १० ओव्हर्समध्ये प्रति ओव्हर १६ धावांच्या सरासरीने १३३ धावांचा पाठलाग करण्यासाठी त्याने पाया रचला. तो आपला महान खेळाडू आहे, तो आपला लीडर आहे आणि आता आपला फलंदाजी प्रशिक्षक आहे.

एकामागून एक तीन विजय. आता चौथ्या विजयासाठी तयारी करायला हवी आहे. पंजाबला आरसीबीविरूद्ध त्यांचा मागचा सामना हरल्याचे दुःख आहे. तयार व्हा पलटन, हे खरंच कठीण होतंय. तर मग पलटन, आमचा १२ वा खेळाडू, तुम्ही तयार आहात का?

काय: मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्स

कधी: शनिवार २२ एप्रिल २०२३

कुठे: वानखेडे स्टेडियम, मुंबई

काय अपेक्षा आहे: हो, पुन्हा एकदा सांगतो, एक सरप्राइज आहे. केक कटिंग होईल किंवा नाही हे सांगता येत नाही तर क्रिकेटचा खेळ होईल. खूप ड्रामा. रोहित विरूद्ध अर्शदीप. आणि अर्थातच एमआय विरूद्ध पीबीकेएसचा रोमांच आणि जल्लोष.

तुम्ही काय करायला हवे: तेच ते नेहमीचंच. एमआय जर्सी, एमआय फेस पेंट, प्रार्थना, पल्स मीटर्स आणि तुम्ही. हे सर्व वानखेडेवर घेऊन या (प्रत्यक्ष किंवा व्हर्चुअल) आणि आपल्या फॅ-एमआय-लीसाठी तुमचे प्रेम दर्शवा.

ते काय म्हणतात: “माझ्या मते टीमचे मनोबल सध्या खूप चांगले आहे. प्रत्येकाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात काही ना काही प्रभाव टाकलाय. त्यामुळे ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व खेळाडू चांगला खेळ करत आहेत, टीममधली सातत्यपूर्णता आणि संवाद खूप चांगला होऊ लागलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक सामन्यासोबत चांगले होत चाललोय आणि आमचे नाते घट्ट होऊ लागले आहे,” – एमआय संघातल्या उत्साहाबाबत जेसन बेहरेनडॉर्फ म्हणाला.

“माझ्या मते इम्पॅक्ट प्लेयर ही इतरांना खेळण्याची संधी देण्यासाठी एक उत्तम कल्पना आहे. हा सर्व विषय बदली खेळाडू खेळवण्याचा आहे. व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यामध्ये चांगला संवाद असला पाहिजे आणि सर्वजण एकाच पानावर असतील तर हे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते” – आयपीएलमधल्या इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत आपले मत व्यक्त करताना बेहरेनडॉर्फ म्हणाला.

आकडेवारी

संघ

खेळलेले सामने (एकूण)

जिंकले

हरले

बरोबरीत

अनिर्णित

एमआय

२९

१५

१४

पीबीकेएस

२९

१४

१५

संघ

एमआय- पीबीकेएसच्या सामन्यात सर्वाधिक धावा

एमआय- पीबीकेएस सामन्यात सर्वाधिक विकेट्स

एमआय

कायरन पोलार्ड: २४ सामन्यांमध्ये ५३९ धावा

लसिथ मलिंगा: १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स

पीबीकेएस

शॉन मार्श: १२ सामन्यांमध्ये ५२६ धावा

पियूष चावला: ११ सामन्यांमध्ये १५ धावा

पलटन, तुमचे लाडके खेळाडू शहरात परतलेत! तुमची ब्लू अँड गोल्ड जर्सी घाला, प्रार्थना करा आणि आमच्या चॅनल्सना तुमच्या मेसेजेसनी भरून टाका. आता हटायचं नाही, मागे पडायचं नाही गड्या... आता फक्त