News

MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरूद्ध ७ विकेट्सनी विजय

By Mumbai Indians

आयपीएल २०२४ सीझनच्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपली घरची खेळपट्टी असलेल्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट्सनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स देऊन १९६ धावा केल्या.

त्यानंतर आपल्या टीमने १५.३ ओव्हल्समध्ये ३ विकेट्स देऊन १९९ धावा केल्या आणि विजय नोंदवला.

आरसीबीची सुरूवातच डळमळीत झाली. मुंबईच्या तडाखेबाज गोलंदाजांसमोर आरसीबीला खूप लढावे लागले. तिसऱ्या ओव्हरमध्ये मुंबईला जसप्रीत बुमराने पहिला विजय मिळवून दिला. त्याने दिग्गज फलंदाज विराट कोहलीला (३) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

यानंतर फाफ डु प्लेसिससोबत रजत पाटीदार उतरला आणि या दोघांनी खेळ पुढे नेला. १२ व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या विकेटच्या स्वरूपात रजत बाद झाला. त्याने २६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर एकही धाव न काढता बाद झाले. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस १७ व्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारून ४० चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.

दिनेश कार्तिकने 23 चेंडूंमध्ये नाबात ५३ धावांची महत्त्वाची कामगिरी केली. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. आरसीबीने २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स देऊन मुंबईसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले.

जसप्रीत बुमराने या सामन्यात आपल्या दिमाखदार स्टाइलच्या गोलंदाजीचे प्रदर्शन करून ५ विकेट्स खिशात घातल्या.

आपल्या टीमने १९७ धावांचा पाठलाग करताना दणदणीत सुरूवात केली. सलामीला उतरलेला फलंदाज ईशान किशनने मोठमोठे फटके मारत अत्यंत वेगाने धावा केल्या. रोहित शर्मानेदेखील दणादण धावा केल्या. आकाशदीपने ईशानला बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला.

ईशानने ७ चौकार आणि ५ षटकार मारून ३४ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. त्याच्यानंतर सूर्यादादानेदेखील सटासट चौकार षटकार मारले. आपल्या टीमने १२ व्या ओव्हरमध्ये रोहितची विकेट गमावली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारून २४ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. सूर्यकुमारने तर फक्त १७ चेंडूंमध्ये अर्धशतक पार केले. तो १९ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ४ षटकार मारून ५२ धावांवर बाद झाला.

हार्दिकने षटकार मारून या सीझनच्या मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक आणि तिलक यांनी नाबाद राहून १५.३ ओव्हर्समध्ये १९९ धावा पूर्ण केल्या. हार्दिकने २१ धावा तर तिलकने १७ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १४ एप्रिल रोजी मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध असेल.

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्सकडून आरसीबीचा ७ विकेट्सनी पराभव.

मुंबई इंडियन्स: १५.३ ओव्हर्समध्ये १९९/३ (ईशान किशन ६९, विल जॅक्स १/२४)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: 20 ओव्हर्समध्ये १९७/८ (फाफ डु प्लेसिस ६१, जसप्रीत बुमरा ५/२१)