News

MI vs CSK मॅच प्रीव्यू: एल-क्लासिको सामन्यासाठी ब्लू अँड गोल्ड आर्मी सज्ज आहे

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स रविवार, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी मुंबईच्या वानखेडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या २९ सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना करेल. आपली पलटनदेखील या एल क्लासिको सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

या सामन्यात आपल्या ब्लू अँड गोल्ड आर्मीची सुरूवात संथ झाली. परंतु, मागच्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करत टीम विजयाच्या मार्गावर परतली आहे. एमआयने या टूर्नामेंटमध्ये दोन सामने जिंकले आणि तीन हरले आहेत. त्यामुळे आपल्या टीमला आपल्या विजयाचा वेग कायम ठेवायला नक्कीच आवडेल. सीएसकेने या टूर्नामेंटमध्ये तीन सामने जिंकले आणि दोन सामने हरले आहेत. त्यामुळे सीएसकेलाही विजयाची आशा आहे.

एमआयने आपल्या मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध १९७ धावांचे लक्ष्य पूर्ण करत ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. त्यात ईशान किशनने ६९ (३४) स्फोटक खेळ केला आणि पहिल्याच चेंडूपासून आपल्या दणदणीत फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्यामुळे टीमला अत्यंत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करता आला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ५२ (१९) देखील अप्रतिम कामगिरी केली आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सला आरसीबीने समोर ठेवलेले लक्ष्य फक्त १५.३ ओव्हर्समध्येच पूर्ण करणे शक्य झाले.

गोलंदाजीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास जसप्रीत बुमराने अप्रतिम गोलंदाजी करत ५ विकेट्स मिळवल्या. श्रेयस गोपाळनेदेखील बुमराची चांगली साथ दिली. हे सर्वच खेळाडू आपला चांगला फॉर्म कायम ठेवतील अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या मागच्या सामन्याचा विचार केल्यास या टीमने एमए चिदंबरम स्टेडियमवर ७ विकेट्सनी मोठा विजय प्राप्त केला होता. कर्णधार ऋतुराज गायकवाड ६७* (५८) चा फॉर्म परत आला. त्याने अप्रतिम खेळ करत सुपर किंग्सला अत्यंत कठीण पिचवर सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य झाले.

रवींद्र जडेजा (४-०-१८-३) नेदेखील सुपरडुपर गोलंदाजी करत केकेआरला १३७ धावांवर थांबवायला मदत केली. ही धावसंख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनीदेखील जडेजाला चांगलीच मदत केली.

त्यामुळे आपल्या टीमच्या फलंदाजांना या गोलंदाजांपासून सावध राहावे लागेल.

एमआय विरूद्ध सीएसके एकास एक आकडेवारी

एमआय आणि सीएसके एकमेकांसमोर साधारण ३८ वेळा आले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने २१ वेळा तर चेन्नई सुपर किंग्सने १७ वेळा विजय मिळवला आहे. वानखेडेवर यलो ब्रिगेडला मुंबई टीमविरूद्ध फक्त चार वेळा विजय मिळाला आहे तर चेन्नईला ७ वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय.

काय: IPL २०२४ चा २९ वा सामना, मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स

कधी: रविवार, १४ एप्रिल २०२४| सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: वानखेडे स्टेडियम, मुंबई

काय अपेक्षा आहे: एमआय विरूद्ध सीएसके सामना असल्यावर प्रत्येक आयपीएल सीझनमध्ये उत्साह शिगेला पोहोचतो. या दोन्ही टीम्स प्रत्येकी ५ आयपीएल ट्रॉफींसह सर्वाधिक यशस्वी टीम्स आहेत. या दोन्ही टीम्सचे लक्ष्य आयपीएल २०२४ मध्ये सहावा किताब जिंकण्याचे आहे. रविवारी या दोन्ही टीम्समध्ये होणाऱ्या सामन्यात पलटनला आपल्या ब्लू अँड गोल्ड आर्मीकडून उत्तम खेळाची आशा असेल.

आपण काय करायचे आहे: पलटन तुम्ही स्टेडियमवर असा किंवा तुमच्या टीव्ही स्क्रीनसमोर असाल. तुम्हाला नेहमीप्रमाणेच आपल्या टीमला अत्यंत उत्साहाने प्रेरणा द्यायची आहे. आपण प्रत्येक सामन्यात हेच करत आलो आहोत.