News

PBKS vs MI मॅच प्रीव्ह्यू: सीझनच्या तिसऱ्या विजयावर मुंबई इंडियन्सची नजर

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सची टीम टीम आयपीएल २०२४ च्या ३३ व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना करण्यासाठी तयार आहे. PBKS vs MI सामना मोहालीच्या मुल्लापूरमध्ये गुरूवार दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. 

आता टीमचे लक्ष्य पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतून सीझनचा आपला तिसरा विजय नोंदवण्यावर असेल. सातत्याने दोन सामने जिंकल्यानंतर आपल्या टीमला चेन्नई सुपर किंग्सकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने नाबाद शतकी खेळ केला होता.

आतापर्यंत या सीझनमध्ये एमआयने एकूण ६ सामने खेळले आहेत. त्यातले दोन सामने आपण जिंकले आहेत. पंजाब किंग्सच्या टीमनेही ६ सामन्यांमध्ये दोन सामने जिंकले आहेत. पंजाबच्या टीमला मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून तीन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.

मुंबईसाठी आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६७.३० च्या स्ट्राइक रेटने २६१ धावा केल्या असून त्यात एक शतकी इनिंगदेखील आहे. त्याचबरोबर ईशान किशनने १७८.६४ च्या स्ट्राइक रेटने १८४ धावा केल्या आहेत.

एमआयच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास नेहमीप्रमाणेच जसप्रीत बुमरा आपल्या धारदार गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसमोर सातत्याने आव्हान ठेवत आहेत. यात ६ सामन्यांमध्ये ६.०८ च्या जबरदस्त इकॉनॉमीने त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर गेराल्ड कोत्झीने ६ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत. 

PBKS vs MI हेड टू हेड आकडेवारी

IPL मध्ये मुंबई आणि पंजाबच्या टीम्समध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ ३१ वेळा समोरासमोर आले आहेत. त्यातल्या १६ सामन्यात एमआयने शिक्कामोर्तब केले आहे तर पीबीकेएसने १५ सामने जिंकले आहेत. या दोन्ही टीम्समध्ये झालेल्या मागच्या पाच सामन्यांमध्ये पंजाबने तीन वेळा विजय मिळवलाय तर मुंबईने दोन वेळा विजय मिळवला आहे. आयपीएल २०२३ मध्ये या दोन्ही टीम्सनी एकमेकांविरूद्ध प्रत्येकी १ सामना जिंकला होता.

काय: आयपीएल २०२४ चा ३३ वा सामना. पंजाब किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: गुरूवार दिनांक १८ एप्रिल २०२४. सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: मुल्लापूर, मोहाली.

काय अपेक्षा आहे: मुंबई इंडियन्सला विजयी मार्गावर परतताना पाहण्यासाठी तयार व्हा. मुल्लापूर मैदान ईशान, रोहित आणि सूर्याच्या दणदणीत खेळाची वाट पाहते आहे. त्यांच्यासोबत टीम आपला तिसरा विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे.

आपण काय करायचे आहे: पलटन ब्लू अँड गोल्ड जर्सीवर पूर्ण उत्साह आणि वचनबद्धतेने आपला विश्वास कायम ठेवा. टीमला प्रत्येक चेंडूवर चियर अप करत राहा कारण आपल्याला तिसरा विजय नोंदवायचा आहे.