News

हार्दिकमधधला बदल, वानखेडेवर गोलंदाजी आणि एमएस धोनीबद्दल प्रशिक्षक पोलार्डचा संवाद

By Mumbai Indians

आपला उत्साह शिगेला पोहोचला होता आणि आपण सलग तिसऱ्या विजयाच्या जवळही पोहोचलो होतो. परंतु रविवारी (१४ एप्रिल) शेवटच्या टप्प्यात आपला निसटता पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्सचा विजय झाला.

फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला आणि आपली मते व्यक्त केली. सुरूवातीलाच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी कोचने हार्दिक पांड्या हा आत्मविश्वासाने परिपूर्ण खेळाडू  आहे जो चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही निकालांचा वापर एक चांगला खेळाडू होण्यासाठी करतो असे सांगितले.

“त्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. तो ग्रुपमध्ये खूप चांगला खेळला आहे. क्रिकेटमध्ये बरे वाईट दिवस असतातच. मला तो आपली कौशल्ये वापरून जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेला वाटतो,” पोलार्ड म्हणाला.

“आपल्याकडे बरे वाईट दिवस असणार आहेतच कारण क्रिकेट हा टीमचा खेळ आहे. हाच माणूस सहा आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपण त्याला चिअर अप करून त्याने चांगला खेळ करावा म्हणून उत्सुक असणार आहोत. त्यामुळे आपण त्याला आता न टोचता त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 

“आपल्या भोवतीच्या अनेक खेळाडूंमधून सर्वोत्तम ते निवडून आपण भारतासाठी एक उत्तम टीम तयार करू शकतो. तो फलंदाजी आणि गोलंदाजी, तो फिल्डिंग करू शकतो आणि तो उत्साहाने सळसळत असतो. तुम्हाला माहित्ये का, माझ्या मनात जराही शंका नाहीये की तो जेव्हा टॉपला येईल तेव्हा सर्वचजण त्याचे प्रचंड कौतुक करत असतील आणि मी ते बघत असेन.”

सीएसके इनिंगच्या त्या शेवटच्या इनिंगबाबत बोलताना पोलार्डने हा एक अनुभव धडा म्हणून स्वीकारणे आणि पुढील सामन्यात जास्त चांगली कामगिरी करण्यासाठी वापरणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

“कोणताही खेळाडू असो मग तो एमएस धोनी असेल, विराट कोहली असेल, रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या असेल. तुम्ही त्यांना कशा प्रकारे गोलंदाजी कराल याच्या योजना तयार कराव्या लागतात. त्या योजना कशा अंमलात आणल्या गेल्या हेही आपल्याला पाहावे लागते,” लॉर्ड म्हणाला.

“अर्थातच एमएस मागच्या अनेक वर्षांमध्ये जागतिक दर्जाचा खेळ करतो आहे. आम्हाला त्याला क्रिकेट मैदानात आणि स्टेडियम्सवर पाहताना मजा येते. त्याने जे काही साध्य केले आहे त्याबद्दल सगळेच अवाक् आहेत. पण तरीही त्याने केलेल्या या २० धावा फार वेगळ्या आहेत. क्रिकेट आपल्याला दिसते त्यापेक्षा खूप वेगळे असते. त्याबाबत आपण माहिती करून घेणे आवश्यक असते. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि २० धावा केल्या. परंतु आधीच्या ओव्हरमध्येदेखील दुसऱ्या कुणीही २० धावा केल्या असत्या. त्यामुळे आमच्या मते हे दिसते त्यापेक्षा जास्त सखोल आहे,” तो म्हणाला.

“आम्ही संपूर्ण स्पर्धेत या चर्चा केल्या आहेत आणि याही वेळी त्या करू. आमचा होमवर्क करू आणि एक जास्त चांगली टीम म्हणून परतायचा प्रयत्न करू.”,

आता प्रशिक्षक झालेल्या या महान एमआय खेळाडूने खेळासोबत खेळाडूंनीही स्वतःत बदल करणे कसे महत्त्वाचे आहे याबाबत सांगितले.

“माझ्या मते हार्दिक आणि इतर कोणताही खेळाडू यांना एक व्यक्ती म्हणून बदलत राहावे लागते. तुम्ही तरूण असता तेव्हा तारूण्याचा जोश असतो. तेव्हा तुमची काम करण्याची पद्धत वेगळी असते,” तो म्हणाला.

“परंतु तुमचे वय वाढत जाते तसे टीमप्रति जास्त जबाबदारी आणि उत्तरदायित्व येते. मी या बदलत्या तरूणाकडे पाहतो आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हाला काही गोष्टी पाहायच्या असतात. परंतु कधीकधी सामन्याला काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतात. ते पुढे जात असताना चुका करतात, आपणही अनेकदा केलेल्या आहेत. परंतु मला हा माणूस मेहनत करताना दिसतोय. मेहनतीचे फळ त्याला नक्कीच मिळेल. कधी ना कधीतरी नक्कीच मिळेल आणि अशी वेळ येईल तेव्हा आपण त्याचे गुणगान करत असू.”

चेन्नई सुपर किंग्सने आपल्यासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. आज एमआयच्या गोलंदाजांनी आपल्या योजनेवर आज काम केले नाही की वानखेडेवरच्या परिस्थितीमुळे आपण त्यांना जास्त धावा सोडल्या?

वानखेडेवर गोलंदाजी करणे हे जगभरातील आणि भारतातील कोणत्याही गोलंदाजासाठी कठीण काम आहे.”

“जसप्रीत आमच्यासाठी उत्तम कामगिरी करतोय. तो इतरांपेक्षा एक पाऊल पुढे नक्कीच आहे. शिवाय आम्हाला एक गोलंदाजी ग्रुप म्हणून शिकत राहणे आणि जास्तीत जास्त चांगले काम करणे महत्त्वाचे आहे. एक व्यक्ती म्हणून आपण हे करूच शकतो.”

“पुन्हा एकदा सांगतो. स्पर्धा अजून बरीच मोठी आहे. तुम्ही आमच्या हल्ल्याकडे पाहाल तर काही लोक आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नवीन आहे. सातत्यपूर्ण सराव आणि प्रक्रिया पार पाडल्यानंतर आम्ही काम करून गोलंदाजी टीम म्हणून जास्त चांगली छाप पाडू शकू,” तो म्हणाला.

कायरन पोलार्डला शेवटी माजी टीममेट आणि प्रतिस्पर्धी ड्वायने ब्रावोशी असलेल्या मैत्रीतून महत्वाच्या गोलंदाजी टिप्स कशा मिळाल्या असे विचारण्यात आले.

“तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की आम्ही आयपीएलमध्ये आणि संपूर्ण जगभरात कुठेही वेगवेगळ्या टीममध्ये खेळत असलो तरी आम्ही एकमेकांशी क्रिकेटबद्दल चर्चा करतो,” असे पॉलीने सीएसके गोलंदाजी प्रशिक्षकाशी असलेल्या नात्याबद्दल सांगितले.

“आम्हा सर्वांना शिकून, सुधारणा करायची आहे आणि आमच्या संबंधित टीम्सना मदत करायची आहे. ब्रावोने एक खेळाडू म्हणून चांगलीच कामगिरी केली आहे. तो एक प्रशिक्षक म्हणूनदेखील उत्तम काम करतोय. त्यामुळे परिस्थिती आणि वेळ कसलीही असली तरी क्रिकेटबद्दल चर्चा करून नवनवीन गोष्टी आम्ही शिकत असतो.”

“अंतिमतः वारसा पुढे नेणे महत्त्वाचे आहे. आज मुलांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे त्यांचे कौतुक आहे. परंतु काही दिवशी तुम्ही गोलंदाजीही चांगली करता आणि फलंदाजीही चांगली करता. त्यामुळे मी सांगितले तसे आमचे नाते खूप चांगले आहे. आम्ही फक्त कॅरेबियनमध्ये नाही तर संपूर्ण जगभरात आमच्या ज्ञानाची देवाणघेवाण करून तरूण खेळाडूंना मदत करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते आमचा वारसा पुढे नेऊ शकतील,” तो पुढे म्हणाला.

पलटन, आपण एक पाऊल मागे आलो आहोत परंतु ट्रॉफी क्र. ६ चा प्रवास सुरूच आहे. मुम-बॉइज आता १८ एप्रिल रोजी पंजाब किंग्सचा सामना करतील. हा चारपैकी पहिला सामना आहे. स्पर्धा अजून थांबली नाहीये. पॉली म्हणाला तसे आपल्याला सुधारणे करणे, शिकत राहणे आणि बदल करत राहणे आवश्यक आहे.  ही टीम कशी आहे हे तुम्हाला माहीत आहेच. आम्ही पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहोत.

तर वाट पाहा. ब्लू अँड गोल्डला सपोर्ट करत राहा. मुंबई इंडियन्सचा झेंडा उंचावत राहील हे पाहा आणि पुढच्या सामन्यात आमच्यासोबत राहा.