News

“जिंकत राहा, आपण क्रिकेट असेच तर खेळतो”: रोमारिओ शेफर्ड

By Mumbai Indians

एमआय बॉइज आता आपल्या बालेकिल्ल्यावर म्हणजे वानखेडेवर परतले आहेत. आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली जागा असू शकत नाही. परिस्थिती नवीन नाहीये आणि आपण पुन्हा एकदा पटकथा लिहिण्यासाठी तयार आहोत. गोष्टी सुधारायची वेळ आली आहे. 

“आपल्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचे आहे. आपण क्रिकेट असेच तर खेळतो. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे आपण किती गुण मिळवतो हे महत्त्वाचे नाहीये,” रोमारिओ शेफर्डने मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी गुरूवारी (२ मे २०२४) पत्रकार परिषदेत सांगितले.

हा महान वेस्ट इंडियन अष्टपैलू खेळाडू वानखेडेवर परतला आहे. याच मैदानावर त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तडाखे दिले होते. हीच कामगिरी परत करण्याची त्याची अपेक्षा आहे का असे विचारल्यावर रोमारिओ म्हणाला की संधी रॉक अँड रोल करायची आहे.

“तुम्हाला माहित्ये का, एका ओव्हरमध्ये ३२ धावा करणे कठीण आहे. तुम्हाला प्रत्येक सामन्यात अशा ३२ धावा मिळतील याची खात्री नसते,” तो म्हणाला.

“अपेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे लोक अपेक्षा करतात की तुम्ही खेळ उंचवायला पाहिजे आणि प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार आणि षटकार मारले पाहिजेत. दुर्दैवाने क्रिकेटच्या खेळात असे घडत नाही. अनेकदा आपल्याला आहे ही परिस्थिती स्वीकारूनच पुढे जावे लागते,” तो म्हणाला.

त्याच्या फलंदाजीवरून तो आता एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हे दिसले असले तरी तो अद्याप गोलंदाज म्हणून उभरायचा आहे. तो सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आतुरदेखील आहे.

“आपण जिथे जातो तिथे शक्य तितक्या लवकर प्रयत्न करून जुळवून घेणे महत्त्वाचे असते. शिवाय तुमच्याकडे योजना असणेही गरजेचे असते,” असे त्याने कॅरेबियनमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करतो तसेच सपाट भारतीय पिचवरदेखील करेल का या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

“याच कारणामुळे आम्ही प्रत्येक गोलंदाजाला चेंडू कुठे टाकायचा हे ठरवण्यासाठी टीम मीटिंग्स आणि विश्लेषक असतात. इथे तुमचे अंमलबजावणीत चुकू शकता, नीट करू शकता आणि धावाही करू शकता. त्यामुळे धावांच्या दरावर आधारित राहून तुम्ही स्वतःला जज करू शकत नाही.

“तुम्हाला जे हवे होते तेच तुम्ही केले का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. त्या दिवशी फलंदाज चांगले खेळत होता की तुम्ही गोलंदाजी करत असाल तर चुकीच्या योजनेवर चुकीचे बॉल्स टाकत होतात. त्यामुळे मी शक्य तितक्या लवकर विचार करून योजना तयार करतो.”

आगामी सामन्यांमध्ये जास्त चांगली गोलंदाजी करण्यासाठी आपण नेट्समध्ये सराव करत असल्याचे शेफर्ड म्हणाला.

“आतापर्यंतच्या स्पर्धेत माझी गोलंदाजी अपेक्षेइतकी चांगली ठरली नाहीये. त्यामुळे जेव्हा कधी मला पुढची संधी मिळेल तेव्हा मी चांगली गोलंदाजी करू शकेन. कारण गोलंदाजी आमच्यासाठी कठीण ठरलीय आणि मी त्याला अपवाद नाहीये.”