News

आयपीएल एलिमिनेटर | GTvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: #𝟔 चा लढा सुरू!

By Mumbai Indians

जिंकू किंवा मरू लढा आहे हा पलटन! 👊

आपल्याकडे पणाला लावण्यासारखं यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. हा एलिमिनेटर सामना आहे. जिंका किंवा तुमच्या बॅगा भरून घरी चला असा सामना आहे.

लीग टप्प्यामध्ये अक्षरशः चढउतार पाहताना, आपण या टप्प्यात सलग सहा सामने जिंकून विक्रमाची बरोबरी केली record-equalling six wins in a row त्यामुळे टीम पहिल्या पाच सामन्यांमध्ये एक विजय मिळवल्यानंतर ट्रॅकवर पुन्हा आली. आता ब्लू अँड गोल्डमधली पोरं आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहेत. 🔥

आता आपण आपल्याकडचे सर्व पणाला लावणार आहोत. एमआयने नेव्हर से डाय एटिट्यूड कायम ठेवला आहे आणि त्यातून आपला #PlayLikeMumbai दृष्टीकोन दिसतो. आपण तणावाच्या काळातही या टीमला पुढे येताना पाहिले आहे आणि आता उद्याचा सामना काही वेगळा नसेल. 💙

जीटी हा सोपा प्रतिस्पर्धी नसेल - पण पुन्हा एकदा, अडचणी डोंगराइतक्या तेव्हा आपण पहाडासारखे उभे असतो. मुल्लनपूरमध्ये आपल्या पोरांच्या पाठीशी उभे राहून पूर्ण ताकदीने उत्साह वाढवण्याची वेळ आली आहे.

तयार आहात, पलटन? सामन्यापूर्वी तुम्हाला गरजेची असलेली सर्व माहिती पाहा.

GT vs MI – आयपीएलमध्ये एकास एक आकडेवारी

जुने सर्व सोडून द्या. आपल्याकडे वर्तमानकाळ आहे ना! 💪

**********

नवीन पीसीए स्टेडियमवर पॉवरप्लेमधली धावसंख्या

मुल्लनपूरमधल्या या स्थानावर आतापर्यंत नऊ आयपीएल सामने खेळवले गेले आहेत. २०२४ मध्ये पाच तर २०२५ मध्ये चार.

२०२५ बद्दल बोलायचे झाल्यास पॉवरप्ले स्कोअरने एका इनिंग वगळता प्रत्येक इनिंगमध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही संघांची वरची फळी उत्तम फॉर्ममध्ये असल्याने यावेळीही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे! 💥

**********

बेअरस्टो 𝕩 मेन्डीसटी२०आय मध्ये वॅगन व्हील्स

या हंगामात उजव्या हाताचे हे दोन्ही फलंदाज आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. चला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्यांच्या आवडत्या स्कोअरिंग झोनवर एक नजर टाकूया!🙌

• जॉनी बेअरस्टो

• कुसल मेन्डीस

**********

नवीन पीसीएम स्टेडियमवर गोलंदाजांसाठी काय उपयुक्त ठरले आहे?

चांगली गोलंदाजी करा... आणि मग तुम्ही सज्ज आहात! 😉

**********

जस्सी 𝕩 प्रसिद्ध विकेट्सची संख्या

यश मिळवण्यासाठी संथ चेंडूंचा अधूनमधून वापर? त्याचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे या जलदगती खेळाडूंना माहीत आहे! 😏

**********

आकडेवारी आता संपली आहे. प्लॅन अमलात आणायची वेळ आलीय!

पलटन, चला, मोठ्या संख्येने येऊया आणि विक्रमी सहावे जेतेपद मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी मुलांचा उत्साह वाढवूया. आपली #OneFamily त्याची खूप आतुरतेने वाट पाहतेय!🤩