
‘विक्रमादित्य’ सूर्यादादा! ब्लू अँड गोल्डमध्ये सीझनमधल्या सर्वाधिक धावा आणि षट्कार
या क्षणी दि सूर्यकुमार यादव साध्य करू शकणार नाही असे काही आहे का??!! 🤩
या सीझनमध्ये सुरूवातीला आपल्या मि. ३६०° ने राजस्थान रॉयल्सविरूद्ध १०० धावांनी विजयानंतर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक २५ + धावांचा विक्रम 25+ scores in IPL history रचला.
त्याचा सध्याचा समोरच्यांच्या छातीत धडकी भरवणारा फॉर्म प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाबरवणारा ठरला. त्याने त्यानंतरच्या प्लेऑफ्सकडे जाणाऱ्या तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके पूर्ण केली आणि लीगमधल्या प्रत्येक सामन्यात त्याने २५ + धावा केल्या! 🤯
ही अशी सातत्यपूर्णता आयुष्यात असायला पाहिजे, नाही का पलटन!!
बरं हे इथेच थांबत नाही. 😉 आपल्या या जबरदस्त फलंदाजीने स्कायने एकाच आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक धावा आणि षट्कार ठोकणारा एमआयचा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला (२०१० मध्ये ६१८ धावा) आणि सनथ जयसूर्या (२००८ मध्ये ३१ षट्कार) यांना मागे टाकून स्वतःची जागा पटकावली आहे.
आता या टप्प्यावर आयपीएलच्या इतिहासातील प्रत्येक सीझनमधल्या टॉप फलंदाजांचा आढावा घेऊया.
सीझन |
सर्वाधिक धावा |
सर्वाधिक षट्कार |
२०२५* |
६४० (सूर्यकुमार यादव) |
३२ (सूर्यकुमार यादव) |
२०२४ |
४१७ |
२३ (रोहित शर्मा) |
२०२३ |
६०५ (सूर्यकुमार यादव) |
२८ (सूर्यकुमार यादव) |
२०२२ |
४१८ (ईशान किशन) |
१६ (तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड) |
२०२१ |
३८१ (रोहित शर्मा) |
१६ (कायरन पोलार्ड) |
२०२० |
५१६ (ईशान किशन) |
३० (ईशान किशन) |
२०१९ |
५२९ (क्विंटन डे कॉक) |
२९ (हार्दिक पांड्या) |
२०१८ |
५१२ (सूर्यकुमार यादव) |
२४ (एविन लेविस) |
२०१७ |
३९५ (पार्थिव पटेल) |
२२ (कायरन पोलार्ड) |
२०१६ |
४८९ (रोहित शर्मा) |
१६ (रोहित शर्मा, कायरन पोलार्ड) |
२०१५ |
५४० (लेंडिल सिमॉन्स) |
२८ (कायरन पोलार्ड) |
२०१४ |
३९४ (लेंडिल सिमॉन्स) |
१६ (रोहित शर्मा) |
२०१३ |
५३८ (रोहित शर्मा) |
२९ (कायरन पोलार्ड) |
२०१२ |
४३३ (रोहित शर्मा) |
१८ (रोहित शर्मा) |
२०११ |
५३३ (सचिन तेंडुलकर) |
१३ (रोहित शर्मा) |
२०१० |
६१८ (सचिन तेंडुलकर) |
१८ (सौरभ तिवारी) |
२००९ |
३७२ (जेपी दुमिने) |
११ (जेपी दुमिने) |
२००८ |
५१४ (सनथ जयसूर्या) |
३१ (सनथ जयसूर्या) |
*चालू सीझन