News

आठवणींना उजाळा - रिकल्टन, बॉश, जॅक्स आंतरराष्ट्रीय कर्तव्यावर रवाना

By Mumbai Indians

कोणालाही गुडबाय करणं फार कठीण असतं पण लवकरच भेटू हे शब्द आपले नाते घट्ट करतात! 😃

पलटन, आपल्या स्टार्स- रायन रिकल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स यांना मोठ्य़ाने थँक्यू आणि गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे. ते आपापल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय कर्तव्यावर रवाना झाले आहेत. भावांनो, तुमच्यासोबत खूप मजा आली आम्हाला!

आम्ही तुला प्रेमाने रॉकेट रायन म्हणतो. तुझ्या फटकेबाजीचे आम्ही फॅन आहोत. दणदणीत शॉट्स मारायचे असतील किंवा तुझी स्टायलिश फलंदाजी असेल, तू आम्हाला खेळायला आलास तेव्हा दर वेळी आश्चर्यचकित केले आहेस.

जॅक्सी, तुझे मोठे फटके, तुझी अष्टपैलू कामगिरी आणि शांत डोके यांच्यामुळे आपली मधली फळी मस्त मजबूत झाली. १३ सामन्यांमध्ये तू केलेल्या २३३ धावा आणि सहा विकेट्स आपल्या प्लेऑफ्समध्ये केलेल्या एंट्रीसाठी अमूल्य ठरल्या. 💪

आणि हो बॉशी- तुझी एनर्जी जबरदस्त आहे भावा. अक्षरशः अद्भुत आहे. स्पर्धेच्या उर्वरित काळात आणि पुढील वर्षांमध्ये तुझा जल्लोष कायम लक्षात ठेवला जाईल.

🔊 मुंबई इंडियन्स ब्लू अँड गोल्ड... आणखी एक विजय मिळालाय हो... आपण कोण आहोत??? मुंबई इंडियन्स!!!!”

त्यांनी मैदानावर आपल्या जादूची कमाल दाखवलीच पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्यांनी धमाल केली. मजामस्तीपासून ते एक नंबर व्हाइब्सपर्यंत त्यांनी आपल्या खेळाला एक वेगळे रूप दिले. कायम सज्ज, कायम तयार आणि कायम आनंदी... हाच तर एमआयचा संघ आहे! 🥳

हे तिघेही काहीच दिवसांत मित्र मंडळ बनले आणि आता ते या सीझनपुरते जात असताना आपल्याला खूप प्रेम आणि अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. सांभाळून जा मुलांनो!

**********

आपल्या #OneFamily कडून आपले तीन नवीन खेळाडू जॉनी बेअरस्टो, चरिथ असालांका आणि रिचर्ड ग्लीसनचे स्वागत. ३० मे रोजी असलेल्या एलिमिनेटरपूर्वी ते निवडीसाठी पात्र आहेत. 🙌

चला तर मग तयारी करूया!