
PBKS vs MI: मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सकडून सात विकेट्सनी पराभव
आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या संघाला पंजाब किंग्जविरुद्ध सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पंजाब किंग्ज क्वालिफायर १ मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला.
पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एमआयने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स देऊन १८४ धावा केल्या. नंतर पीबीकेएसने १८.३ ओव्हर्समध्ये तीन विकेट्स देऊन १८७ धावा करून लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली आणि सलामीवीर रायन रिकेलटन आणि रोहित शर्मा यांनी डाव पुढे नेला. रायनने पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. रायनने २० चेंडूंत पाच चौकारांसह २७ धावा केल्या.
मुंबईने १० व्या ओव्हरमध्ये रोहितची विकेट गमावली. रोहितने २१ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा केल्या.
यानंतर सूर्यकुमार यादवने खेळ हातात घेतला. त्याने अर्धशतक केले परंतु त्यानंतर आपण तिलक वर्मा (१) आणि विल जॅक्स (१७) यांच्या विकेट्स गमावल्या.
एकीकडे मुंबईने आपल्या महत्त्वाच्या विकेट गमावल्या तर दुसरीकडे सूर्यकुमारने डाव हातात ठेवला.
१७ व्या ओव्हरमध्ये मार्को जॅन्सेनने कर्णधार हार्दिक पांड्याला बाद केले. हार्दिकने १५ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. नमन धीरने १२ चेंडूत २० धावा केल्या आणि दोन षटकारही मारले.
शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार ३९ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा काढून बाद झाला तर मिचेल सँटनर एक धाव काढून नाबाद राहिला.
अशा रितीने मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये सात विकेट्स देऊन १८४ धावा केल्या.
१८५ धावांचा पाठलाग करताना पंजाबने प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्या मदतीने उत्तम सुरुवात केली. पण पाचव्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली. जसप्रीतने प्रभसिमरनला बाद केले. प्रभसिमरनने १३ धावा केल्या.
यानंतर प्रियांश आणि जोश इंग्लिश यांनी डाव पुढे नेला आणि शानदार फलंदाजी करून संघाला विजयाच्या जवळ आणले. पण प्रियांश आणि जोश यांच्यातील भागीदारी १५ व्या ओव्हरमध्ये मिशेल सँटनरने मोडली. प्रियांशने ३५ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावा फटकावल्या.
आपल्या सँटनरने १७ व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या सँटनरला घरी पाठवले. त्याने ४२ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ७३ धावा केल्या.
श्रेयस अय्यर आणि नेहल वधेरा यांनी नाबाद खेळी करत पंजाब किंग्जला सात विकेट्सनी विजय मिळवून दिला. अय्यरने १६ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह २६ धावांचे योगदान दिले. वधेराने फक्त दोन धावा केल्या.
मुंबईकडून मिचेल सँटनरने दोन विकेट्स तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.
थोडक्यात धावसंख्या:
मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सकडून सात विकेट्सनी पराभव.
मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये १८४/७; सूर्यकुमार यादव ५७ (३९), अर्शदीप सिंह २/२८
पंजाब किंग्स: १८.३ ओव्हर्समध्ये १८७/३; जोश इंगलिश ७३ (४२), मिचेल सँटनर २/४१