
RR vs MI: मुंबई इंडियन्सकडून राजस्थान रॉयल्सचा पराभव, पॉइंट्स टेबलवर पहिले स्थान पटकावले
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव करून या स्पर्धेतला आपला साता विजय नोंदवला. RR vs MI हा सामना गुरूवारी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला गेला.
या विजयासह ब्लू अँड गोल्ड टीम १४ गुणांसह गुण तक्त्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. हा एमआयचा सलग सहावा विजय आहे.
मुंबई इंडियन्सने टॉस हरल्यावर राजस्थान रॉयल्सविरूद्ध प्रथम गोलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये २ विकेट्स गमावल्या आणि २१७ धावांचा मोठा स्कोअर उभा केला. रायन रिकल्टनच्या ६१ धावांच्या जबरदस्त खेळामुळे आणि रोहित शर्माच्या ५३ धावांनी मुंबईला एक चांगली सुरूवात दिली.
राजस्थानकडून महेश तीक्ष्णा आणि रायन पराग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. परंतु त्यांना मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात यश आले नाही.
आपल्या सलामी फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सविरूद्ध सुरूवातीपासूनच दणकेबाज खेळाचे प्रदर्शन केले.
रेयान रिकल्टन आक्रमकपणे फलंदाजी करत ३८ चेंडूंमध्ये ६१ धावा करून तीक्ष्णाच्या चेंडूवर बाद झाला. त्याच्यासोबत रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
रोहितने ३६ चेंडूंमध्ये ५३ धावांचा उपयुक्त खेळ केला. अंतिमतः कर्णधार हार्दिक पांड्या (२३ चेंडूंमध्ये ४८ धावा) आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव (२३ चेंडूंमध्ये ४८ धावा) यांनी जबरदस्त कामगिरी करत धावसंख्या २१७ वर नेली.
विजयासाठी २१८ धावांचे लक्ष्य समोर असलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरूवात खूप वाईट झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरने वैभव सूर्यवंशीला पॅव्हिलियनला परत पाठवले. त्याला आपले खातेही उघडता आले नाही.
दुसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने यशस्वी जैस्वालला (१३ धावा) बाद करून राजस्थानला दुसरा झटका दिला. नितीश राणा (९ धावा), कर्णधार रायन पराग (१६ धावा), शिमरन हेटमायर (० धावा) आणि शुभम दुबे (१५ धावा) खूप लवकर बाद झाले. त्यामुळे राजस्थानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.
दुसरीकडे आरआरकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक म्हणजे ३० धावा केल्या. अशा रितीने आरआरचा पूर्ण संघ फक्त १६.१ ओव्हर्समध्ये ११७ धावांवर सर्वबाद झाला आणि मुंबी इंडियन्सने १०० धावांनी हा सामना आपल्या खात्यावर जमा केला.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्या आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स टीमचा पुढचा सामना ६ मे रोजी गुजरात टायटन्सविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या
मुंबई इंडियन्सकडून राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव.
मुंबई इंडियन्स: (२० ओव्हर्समध्ये २१७/२); रेयान रिकल्टन ६१, रियान पराग १/१२
राजस्थान रॉयल्स: (१६.१ ओव्हर्समध्ये ११७/१०); जोफ्रा आर्चर ३०, कर्ण शर्मा ३/२३