IPL Match 9 | CSKvMI पूर्वावलोकन: प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे...
पलटन, आत्तापर्यंतचा सीझन खूप कठीण होता. आपण आठ सामन्यांमधले दोन विजयी झाले आहोत. इथून पुढचा मार्ग सोपा आणि स्पष्ट आहे. आपल्याला पुढचे सहाही सामने जिंकून १६ गुण मिळवणे गरजेचे आहे. इथून पुढचा प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहिलेच पाहिजे. इथून पुढे स्क्रिप्ट बदलू शकेल अशी एखादी टीम असेल तर ती आहे मुंबई इंडियन्स. 💙.
आपला पुढचा सामना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध त्यांच्या घरच्या खेळपट्टीवर आहे. आपल्यासाठी प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असेल, चौकार आणि षट्कारांवर जल्लोष केला जाईल आणि प्रत्येक विकेट आपल्याला सुटकेचा निःश्वास देणारी असेल. ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक व्यक्ती या खेळाबद्दलच चर्चा करेल. विजय सहज मिळत नाही. तो मिळतो मेहनत करून, अथक परिश्रम करूनच. मुंबई इंडियन्सबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कठीण परिस्थितीत टाकले की आपण उजळून लख्ख चकाकतो. 💯
हा असा ग्रुप आहे ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, आपण परिस्थिती समजून घेतो आणि ती कशी बदलायची हेही आपल्याला माहीत आहे. मधल्या फळीत असलेला प्रत्येक क्रिकेटपटू फक्त आपली भूमिका निभावणार नाही तर विश्वास निर्माण करेल आणि मागील अनेक वर्षांत हा बॅच आणि जर्सी काय करू शकली आहे हे दाखवून देईल. एक विजय सगळे बदलू शकतो. टीमला लय सापडते तेव्हा ती उत्तम कामगिरी करते. बाहेरच्या कोणत्याही आवाजाने फरक पडत नाही. फक्त तयारी, नियोजनावर आणि एकमेकांवर ठेवलेला विश्वास आपल्याला पुढे घेऊन जाईल.. 💪
कधी: २ मे २०२६ | सायंकाळी ७.३० वाजता
कुठे: एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
काय अपेक्षा आहे: चेपॉक आपल्या मनःस्थितीची परीक्षा घेईल. एमआयच्या फलंदाजांना संथ खेळपट्टीवर, विशेषतः स्पिनबाबत सावध राहावे लागेल. पॉवर प्लेमधला दृष्टीकोन महत्त्वाचा असेल आणि त्यातून आपले भविष्य आणि निकाल दिसून येईल. डेथ ओव्हर्समध्ये संयम ठेवणे आणि गरज असेल तेव्हा वेग वाढवणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. मोजमाप करून धोके आणि आक्रमकता ठेवणे, गोलंदाजीतील स्मार्ट बदल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिंकण्याचे ध्येय महत्वाचे ठरेल. 💙
आकडेवारी
|
खेळलेले सामने (एकूण) |
४० |
|
एमआयने जिंकले |
२१ |
|
सीएसकेने जिंकले |
१९ |
|
खेळलेले सामने (चेपॉकवर) |
९ |
|
एमआयने जिंकले |
५ |
|
सीएसकेने जिंकले |
४ |
|
एमआय |
आकडेवारी |
सीएसके |
|
रोहित शर्मा (८८१ धावा) |
सर्वाधिक धावा |
सुरेश रैना (७१० धावा) |
|
लसिथ मलिंगा (३१ विकेट्स) |
सर्वाधिक विकेट्स |
ड्वायने ब्रावो (३० विकेट्स) |