“टीम लढाऊ बाण्याने मैदानात उतरेल. कोचला हेच तर हवे असते”: जयवर्धने

“टीम लढाऊ बाण्याने मैदानात उतरेल. कोचला हेच तर हवे असते”: जयवर्धने

By Mumbai Indians

सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही सर्टिफाइड चॅम्पियन्स आहेत. मागच्या अनेक सीझन्समध्ये ते आपल्याला संकटातून बाहेर काढणारे ठरले आहेत. आपल्याला हे माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या स्टँडर्डनुसार धावा आणि विकेट्स येत नाहीत तेव्हा ही गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करणारी ठरते. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध जिंकणे आवश्यक असलेल्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या दोघांसोबत केलेल्या चर्चेबाबत माहिती दिली. ✊

"हे दोघे सामना जिंकून देणारे आहेत आणि ते माणूस आहेत," तो म्हणाला. ते या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडतील. त्यामुळे आता आम्ही जे संवाद साधतोय त्यातून त्यांच्यावर खूप ताण दिला जात नाही कारण त्यांच्यावरही तो ताण आहेच. ते स्वतःहून उत्तम खेळ करू शकतील. त्यामुळे फक्त सांगणेच पुरेसे आहे. अशा गोष्टी घडत असतात. आपण प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे."

आठ सामन्यांमध्ये चार गुण मिळाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा सीझन अपेक्षित असा ठरला नाही. आता ६ सामने बाकी आहेत णइ १६ हुण मिळवण्याची संधी आहे. तसेच प्लेऑप्ससाठी पात्र ठरण्याची संधीही आहे. त्यामुळे महेला यांनी टीमची परिस्थिती बदलण्याची क्षमता आणि भूक यांच्याबाबत चर्चा केली.

"मला कल्पना आहे की ते स्वतःशी प्रामाणिक आहेत. ते कसून सराव करतात, मेहनत करतात आणि त्यांची कामाप्रति निष्ठा आहे," ते म्हणाले. "त्यामुळे आम्ही प्रयत्न करत राहू. मागच्या काही वर्षांत त्यांच्यासाठी काय उपयुक्त ठरले आहे, त्यातून त्यांना यश मिळाले आहे. कधीकधी त्यांना अपेक्षित निकाल मिळेलच असे नाही.

"आम्ही मधलेही काही सामने जिंकलो असतो तर आम्ही चांगल्या स्थितीत असतो आणि आमचा आत्मविश्वास भरपूर असता. त्यामुळे आता प्रत्येक सामना आमच्यासाठी प्लेऑफसारखाच असणार आहे. हे सगळे खेळाडू हे समजून घेण्यासाठी पुरेसे प्रोफेशनल आहेत. ते लढत राहतील आणि पुढे जाताना आमच्यासमोर काय संधी आहेत ते त्यांना माहीत आहे. ते आव्हानासाठी तयार आहेत आणि एक प्रशिक्षक म्हणून मला हेच हवे आहे."

पलटन, ठरलं तर मग. ब्लू अँड गोल्डचा उत्साह पुन्हा जागवायचा आहे. बि.लि.व्ह. 💙