
IRE vs IND: दुसऱ्या टी२०आय सामन्यात भारताकडून आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव. मालिकेवर शिक्कामोर्तब
भारत आणि आयर्लंडदरम्यान सुरू असलेल्या तीन टी२०आय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला आणि २-० ने मालिका आपल्या ताब्यात घेतली. हा सामना डबलिनच्या दि व्हिलेज स्टेडियमवर खेळवला गेला.
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टीमने आधी फलंदाजी करून निश्चित ओव्हर्समध्ये ५ विकेट्सवर आयर्लंडसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले.
भारताच्या खेळावर एक नजर
भारतीय संघाची सुरूवाच दमदार झाली. सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी वेगाने धावा पटकावल्या. भारताला पहिला झटका कॅरी यंगने यशस्वी जैस्वालच्या (१८) रूपाने दिला. यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या तिलक वर्मा (१) मैदानात पाय रोवता आले नाहीत. तो पाचव्या ओव्हरमध्ये बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर बाद झाला. संजू सॅम्सन आणि गायकवाड यांनी भारताच्या खेळाला सावरत जोरदार फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. सॅम्सनने चार चौकार आणि १ षटकार मारून २६ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या आणि तो बेंजामिन व्हाइटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर गायकवाडने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताला १६ व्या ओव्हरमध्ये बॅरी मॅकार्थीने गायकवाडच्या रूपाने फटका दिला. त्याने ४३ चेंडूंमध्ये ५८ धावा करताना ६ चौकार आणि एक षटकार मारला. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी खेळ पुढे नेला. भारताची पाचवी विकेट रिंकू सिंगच्या रूपाने पडली. रिंकूने २१ चेंडूंमध्ये ३८ धावांचा देखणा खेळ केला. भारताने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन १८५ धावा केल्या. शिवम मात्र १६ चेंडूंमध्ये २२ धावा करून नाबाद राहिला.
आरर्लंडच्या खेळाकडे एक नजर
आयर्लंडच्या इनिंगची सुरूवात थोडी डळमळीतच झाली. टीमने तिसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि लॉर्कन टकर शून्यावर पॅव्हेलियनला परतले. प्रसिद्ध कृष्णाने या दोघांचीही विकेट घेतली. अँड्र्यू बालबर्नी आणि हॅरी टेक्टरने फलंदाजीला सुरूवात केली. सहाव्या ओव्हरमध्ये रवी बिष्णोईने आयर्लंडची तिसरी विकेट घेतली. बालबर्नी आणि कर्टिस कॅम्फर यांनी पाय रोवून खेळायला सुरूवात केली आणि टीमसाठी चांगल्या धावाही केल्या. रवीने १० व्या ओव्हरमध्ये आपली दुसरी विकेट घेतली. त्याने कॅम्फरला (१८) शिवमच्या हातात कॅच देऊन बाद केले. जॉर्ज डॉकरेलदेखील नंतर फार काळ टिकू शकला नाही (१३). त्याला रवी बिष्णोईने रनआऊट केले. अर्शदीप सिंगने १६ व्या ओव्हरमध्ये बालबर्नीची महत्त्वाची विकेट घेतली. त्येन ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराने बॅरी मॅकार्थी (२) आणि मार्क अडायर (२३) ची विकेट घेतली. भारताने अशा प्रकारे सामना जिंकला. आयर्लंडच्या टीमला २० ओव्हर्समध्ये ८ विकेट देऊन फक्त १५२ धावा करता आल्या.
भारताच्या वतीने प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमरा आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
आता भारतीय संघाचा आयर्लंडविरूद्ध शेवटचा टी२०आय सामना २३ ऑगस्ट रोजी असेल.
थोडक्यात धावसंख्या
भारत (२० ओव्हर - १८५/५ ): ऋतुराज गायकवाड़ (५८), जसप्रीत बुमरा (२/१५)
आयर्लंड (२० ओव्हर - १५२/८): अँड्रयू बालबर्नी (७२), बॅरी मॅकार्थी (२/३६)