News

आपल्यातला बदल, वानखेडेवरील फलंदाजी आणि हार्दिक पांड्याबाबत बोलताना ईशान किशन

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या विजयाचे वर्णन एका शब्दात करायचे झाल्यास तो एक शब्द म्हणजे पूर्ण असा असेल. टीमने पूर्ण वर्चस्व गाजवले, पूर्ण टीमचे प्रयत्न होते, एमआय मेंटॅलिटीचे एक पूर्ण उदाहरण आणि एकूणच पूर्ण दुनिया हिला देंगे प्रदर्शन.

ईशान किशन हा या अत्यंत खास आणि मनोरंजक क्रिकेट प्रदर्शनातला आघाडीचा स्टेज परफॉर्मर होता. त्याने आपली स्टंप्समागील कामगिरी (दोन कॅच पकडून विकेट्स) आणि तडाखेबाज इनिंग (३४ चेंडूंमध्ये ६९ धावा) यांच्यामुळे एमआयच्या विजयाचा पाया रचला.

“मला कुणाला काही सिद्ध करायचे नव्हते. मला फक्त मैदानात जाऊन मनसोक्त खेळायचे होते कारण आपल्या हातात ज्या गोष्टी नसतात त्यांचा ताण घेऊन काहीही उपयोग नसतो हे मला कळले आहे. काही गोष्टी नियंत्रणात नसतात आणि कोणत्या गोष्टी नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपल्याला ओळखावे लागते,” असे त्याने मुंबई इंडियन्सने गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (१२ एप्रिल) सात विकेट्सनी मिळवलेल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

त्याने आपल्या खेळाकडे आणि क्रिकेटच्या ब्रँडकडे एका व्यापक दृष्टीकोनातून कसे पाहिले हे त्याने सांगितले.

“मी आधी फलंदाजी करत असतो, मी जुना ईशान किशन असतो आणि त्यांनी पहिल्या दोन ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली असती तर माझ्यावर प्रेशर आले असते. परंतु बदललेल्या परिस्थितीत मला हे समजले आहे की २० ओव्हर्सचा सामना खूप मोठा असतो. तुम्ही हा वेळ घेऊ शकता. शिवाय तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाऊ शकता,” तो म्हणाला.

ईशानच्या स्फोटक इनिंगनंतर आपला दादा सूर्याने कमान हातात घेतली आणि धावांची आतषबाजीच केली. एमआयच्या ड्रेसिंग रूममधल्या प्रत्येक सदस्याप्रमाणे ईशानने दोन वेळा आयसीसी मेन्स टी२०आय प्लेयर ऑफ दि इयर पुरस्कार मिळालेला फलंदाज कसा खेळतो हे पाहणे कशी मेजवानी आहे हे सांगितले.

“तो फलंदाजी करताना त्याला पाहणे ही अत्यंत मजा असते. तो सुपर प्लेयर हे. तो सगळ्या ओव्हर्समध्ये खेळू सकतो. तो कोणत्याही गोलंदाजावर तणाव आणू शकतो. त्यामुळे मला त्याची फलंदाजी पाहताना आनंद मिळतो. तो जेव्हा जेव्हा जोरदार धावा करतो तेव्हा तेव्हा आम्हा सर्वांना मजा येते,” ईशानने आनंदाने सांगितले.

वानखेडेवर तर कितीही धावा केल्या तरी कमीच पडतात.

“वानखेडेवर आपण खेळतो तेव्हा आणि विकेट चांगली असेल तर २०० पेक्षा जास्त धावा सहजपणे होतात. २२० धावा करणे ही कठीण गोष्ट नाही. आपली सुरूवात चांगली झाली तर आपण जास्तीत जास्त धावा करू शकतो. हीच तर खरी मजा आहे. तुम्ही आपल्या टीमसाठी किंवा स्वतःसाठी लक्ष्य निश्चित करू शकत नाही. तुम्हाला फलंदाजी करत राहावे लागते किंवा एकूण धावसंख्येचा विचार करत राहावे लागते. इतर गोलंदाज काय करतायत हेही पाहावे लागते. त्यामुळे कितीही नियोजन केले तरी ते कमी पडते.

“विकेट पडली तर नियोजन बदलते. आमची भागीदारी चांगली झाली तर नियोजन वेगळे असते. आम्ही ही गोष्ट कशा रितीने पार पाडतो हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. आमचा प्लॅन स्वतःसाठी एकूण धावसंख्या निश्चित करण्याचा नसतो. परिस्थिती पाहायची आणि आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करायचे.”

त्याने कर्णधार हार्दिक पांड्याचेही खूप कौतुक केले. त्याने शेवटच्या टप्प्यात धमाल शॉट्स मारले. आणि ते अक्षरशः हिट झाले!

“त्याला आव्हाने आवडतात,” ईशान म्हणाला.

“तो मैदानात येतो तेव्हा त्याच्या खेळाची मूल्ये खूप वेगळी असता. त्याला त्यात आनंद मिळतो. मी त्याला खूप चांगला ओळखतो. मी त्याच्यासोबत खूप वेळदेखील घालवला आहे.”

“लोक तुमची मेहनत, तुम्ही नेमके कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि तुम्ही तरीही टीमसाठी किती काम करत आहात हे पाहत असतात. तो चांगली कामगिरी करण्यावर, मधल्या फळीत खेळण्यावर, पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यावर भर देतो. त्याला माहीत आहे की परिस्थिती बदलू शकते. लोक प्रश्न विचारू शकतात. परंतु तो त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे.

अगदी बरोबर. ही एक खास टीम आहे. आता तर रविवार आहे आणि सीएसकेविरूद्ध सामना आपल्याच घरी, आपल्याच बालेकिल्ल्यात आहे. मग होऊद्या धुमाकूळ.