News

राष्ट्रीय खजिना? नाही, हा तर आशियाई खजिना आहे!

By Mumbai Indians

जसप्रीत बुमराह – आपला लाडका खेळाडू, एक चालतीबोली जादू आणि एक खरीखुरी हायलाइट रील!

भारताच्या आघाडीचा जलदगती गोलंदाज होण्यापासून ते सेना राष्ट्रांमध्ये कसोटी सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेणारा आशियाई गोलंदाज होण्यापर्यंत बुमराह आपल्या जादुई हातांनी इतिहास नव्याने लिहीत आहे. त्याने कोणाला मागे टाकले आहे माहीत आहे का? एक महान खेळाडू असलेल्या वसीम अक्रमला! 🙌

…आणि त्याने हे कसे साध्य केले? त्याने इंग्लंड दौरा २०२५ च्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाज बेन डकेटला बाद करून.

मागील काही वर्षांमध्ये बूमने आपला तूफानी अंदाज सुरू केला आहे. दुखापतींनी त्याचा वेग कमी करायचा प्रयत्न केला. परंतु तो अधिक शक्तिशाली, टोकदार आणि दमदार झालाय! 💥

इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजी करणे असो, ऑस्ट्रेलियात फलंदाजांना बाऊन्सर टाकून बाद करणे असो, दक्षिण आफ्रिकेत घोटा फोडणारे यॉर्कर्स असोत किंवा न्यूझीलंमध्ये किवीजचा समाचार घेणे असो- बुमराहने कसोटी सामन्यांना आपल्या गोलंदाजीच्या क्लिनिकमध्ये रूपांतरित केले आहे. 🤙

हे विक्रम फक्त आकडेवारीपुरते मर्यादित नाहीत. ते सातत्यपूर्णता, दर्जा आणि कडक परफॉर्मन्स दर्शवणारे आहेत. ♾️ आपल्या या खास सुपरस्टारने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे आणि आपल्याला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो.

अजून अनेक विक्रम करायचे आहेत पोरा! 💙 पलटनचा जल्लोष थांबणार नाहीये आणि संपूर्ण जग तुझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहते आहे!

सेनामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा आशियाई गोलंदाज

नाव

टीम

सामने

विकेट्स

*जसप्रीत बुमराह

भारत

३२

१४७^

वसीम अक्रम

पाकिस्तान

३२

१४६

अनि कुंबळे

भारत

३५

१४१

*इशांत शर्मा

भारत

४१

१३०

*मो. शामी

भारत

३४

१२३

मुथय्या मुरलीधरन

श्रीलंका

२२

१२०

झहीर खान

भारत

३०

११९

कपिल देव

भारत

३५

११७

वकार युनुस

पाकिस्तान

३०

११३

इम्रान खान

पाकिस्तान

२९

१०९

*कार्यरत खेळाडू
^
पहिला #ENGvIND कसोटी सामना २०२५ मध्ये दुसऱ्या दिवशी बेन डकेटची विकेट जाईपर्यंतची संख्या.