
२००८ मध्ये #OnThisDay – सचिनचा पहिला सामना, जयसूर्या स्पेशल... आठवणी, नॉस्टॅल्जिया, अभिमान!
पलटन, घड्याळाचे काटे उलटे फिरवूया... १४ मे २००८ आठवतो का हा दिवस?
मुंबई इंडियन्सचे जे चाहते अगदी पहिल्या दिवसापासून आहेत त्यांना ही जादुई संध्याकाळ नक्कीच आठवत असेल... तेही चेहऱ्यावर मोठ्ठा आनंद घेऊन... 😁 आपले प्रतिस्पर्धी? तेच ते नेहमीचे, चेन्नई सुपर किंग्स. स्थान? आपला बालेकिल्ला वानखेडे. उत्साह? बोले तो एक नंबर!
अगदी त्याच दिवशी सनथ जयसूर्याने आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये धमाल केली होती. त्याने मुंबई इंडियन्सचे पहिले शतक फटकावले होते. हा सामना किती धमाल होता! आपल्या श्रीलंकन महान खेळाडूने आपला ‘बीस्ट मोड’ ऑन केला होता. त्याने सीएसकेच्या गोलंदाजांना आपल्या गल्लीतल्या क्रिकेटप्रमाणे अख्ख्या मैदानात घुमवले होते.
त्याने फक्त ४८ चेंडूंमध्ये नाबाद ११४ धावा केल्या. त्यात नऊ चौकार आणि ११ षट्कारांचा समावेश होता. एक दर्जा आणि स्टाइल त्यात होती. षट्कार स्टँड्समध्ये उडून जात होते. पलटन तर जाग्यावर बसलेलीच नव्हती. एमआयच्या इतिहासातला एक नवीन धडा लिहिला जात होता... त्या आठवणी आपल्याला अजूनही लक्षात आहेत…
पण एक मिनिट. १४ मे २००८ साठी ही एकमेव महत्त्वाची गोष्ट नाहीये...
आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा पहिला सामना होता.
आपला महान खेळाडू, आपला अभिमान कर्णधाराची टोपी घालून पहिल्याच वेळी ब्लू अँड गोल्डमध्ये आपल्या हक्काच्या मैदानात सीएसकेविरूद्ध खेळायला उतरला. यापेक्षा जास्त महत्त्वाचे दुसरे काहीच असू शकत नाही. तो मैदानात उतरला तेव्हा गर्दीतून होणारा भला मोठा जल्लोष आणि सचिन... सचिनssss चा जयघोष हा अक्षरशः मनावर कोरला गेलेला क्षण होता. 🙌
… आणि अशा रितीने आपला आयपीएलच्या इतिहासात सीएसकेवर पहिला विजय नोंदवला गेला. या दोन्ही संघांमधली स्पर्धा मागील अनेक वर्षांत एब्सोल्यूट सिनेमा हा शब्द अस्तित्वात नसतानाही इतकीच नाट्यमय ठरली आहे! 🏏