
हॅप्पी बर्थडे, तात्या!
कायरन पोलार्ड. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक चाहत्यासाठी हे नाव म्हणजे एक आठवणींचा खजिना आहे! ✨ त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने #OneFamily फक्त एक क्रिकेटपटूचा गौरव करण्यासाठी नाही तर आपला प्रवास, आपले यश आणि वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या महान खेळाडूचा उत्सव साजरा करते आहे.
२०१० मध्ये २३ वर्षांचा पॉली एमआय कॅम्पमध्ये आल्यापासून त्याच्यात खऱ्या यशासाठी काहीतरी खास असल्याचे दिसले. 🙌 मागच्या अनेक वर्षांत तो ड्रेसिंग रूममध्ये एक खेळाडू म्हणून आणि तरूण खेळाडूंसाठी मार्गदर्शक म्हणून सर्वांचा लाडका बनला.
𝐊𝐢𝐞𝐫𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐥𝐚𝐫𝐝 for #MumbaiIndians. That’s it. That’s the post. 🫡🙇♂️💙#OneFamily @KieronPollard55 pic.twitter.com/BQ4Me3IMGo
— Mumbai Indians (@mipaltan) November 16, 2022
तो आपल्यासोबत प्रचंड ऊर्जा, कोणत्याही दबावाशिवाय पॉवर-हिटिंग घेऊन आला आणि एकट्याने सामना पालवण्याची क्षमताही आणली.🏏
पोलार्डचे योगदान फक्त आकडेवारीत नाहीये. तो बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये गेम चेंजर ठरला आहे. त्याने उत्तम कॅचेस घेतल्या आहेत आणि आम्हाला अशक्य वाटणारे सामनेही जिंकून दिले आहेत. 🫡 पण या महान खेळाडूला खऱ्या अर्थाने वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याने प्रेरित केलेला विश्वास - "मी जोपर्यंत खेळ संपवत नाही तोपर्यंत खेळ संपत नाही" ही त्याची मानसिकता.
पलटनला “मानला रे!” असा जल्लोष करायला भाग पाडणाऱ्या त्याच्या कामगिरीबाबत जाणून घेण्यासाठी 📝 TAP HERE TO READ.
आपल्या पाचही आयपीएल आणि दोन सीएलटी२० जेतेपदांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आपण विसरू शकत नाही. त्याने सर्वात महत्त्वाच्या वेळी कामगिरी केली - मग तो धमाकेदार कॅमिओ असो किंवा विजयी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण यश असो. सीएसकेविरुद्धचे ते जबरदस्त प्रदर्शन 😉 तर पलटन विसरूच शकत नाही!
त्यानंतर आला १५ नोव्हेंबर २०२२ हा दिवस. त्याने या दिवशी मुंबई इंडियन्ससोबतचा खेळाडू म्हणून दिमाखदार प्रवास थांबवला.
पॉली म्हणतो, “मी स्वतःला एमआयसोबत खेळताना पाहू शकत नसेन तर मी स्वतःला एमआयविरूद्धही खेळताना पाहू शकत नाही.” कायरनच्या शब्दांनी आमचे हृदय पूर्णपणे पाघळून गेले आहे!! 💙
तो कुठेच जाणार नव्हता आणि आम्हीही त्याला कुठेही जाऊ देणार नव्हतो! 🤝 पोलार्डला त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तात्या म्हटले जाते. त्याने एमआयचा बॅटिंग कोच म्हणून आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. आपल्या पोरांना या सर्वोत्तम खेळाडूकडून शिकायला खूप आवडते आणि त्याच्या शिकवण्याची पद्धत सर्वांचीच आवडती आहे.
Learn from the best, stand out from the rest 💪💥#MumbaiIndians #PlayLikeMumbai [Naman Dhir, Kieron Pollard] pic.twitter.com/Dk2WI6CgMW
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2025
पॉली तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎊 तू निर्माण केलेला वारसा एमआयच्या लोककथेत ब्लू अँड गोल्डमध्ये कोरला जाईल!!!