News

खतरनाक!! पलटन, आपल्या विजयाचा वेग निव्वळ खतरनाक आहे... हो की नाही?

By Mumbai Indians

आपल्या पलटनला एखादी गोष्ट नक्की माहीत आहे. ती म्हणजे मुंबई इंडियन्स जेव्हा आघाडीवर येते तेव्हा त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. 🔥

#MIvGT या रोमांचक सामन्यात झालेल्या आपल्या पराभवामुळे सलग सहा सामन्यांतल्या आपल्या विजयी रथाला धक्का लागला. आपण हे यापूर्वीही एकदा पार पाडलेले आहे.

आपला संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढला. पण कधीकधी परिस्थिती आपल्या हातात नसते. परंतु, आपल्या संघाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये फक्त एका विजयानंतर परिस्थिती बदलण्यासाठी आपला खेळ एका वेगळ्याच उंचीवर नेला.💪

आता या टप्प्यावर आपण जरा मागे वळून पाहूया आणि आपल्याला विश्वास ठेवायला लावणाऱ्या अप्रतिम निकालांचा विचार करूया. 🤞 मग त्या चार सामन्यांमधल्या सलग विजयाचा असो, पाच सामने असोत किंवा सहा सामन्यांमधला अप्रतिम विजय असो. एमआयने हे सर्व साध्य केले आहे! मागच्या काही वर्षांत आपण प्रचंड वर्चस्व गाजवले आहे. एकामागून एक विजय मिळवून चाहत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ही कामगिरी फक्त गुणतक्त्यावर विजयाशी संबंधित नव्हती. ही एक अद्वितीय भावना होती. यात अविस्मरणीय क्षण होते, शेवटच्या ओव्हरमधली रोमांचक कामगिरी होती, अप्रतिम खेळ होता आणि नाचायला भाग पाडणारा जल्लोष होता! 💙

फक्त आपल्या पलटनसाठी या सुंदर आठवणींचे कलेक्शन!

वर्ष

सलग जिंकलेल्या सामन्यांची संख्या

सीझनचा एकूण निकाल

२००८

पाचवा

२०१०

उपविजेते

२०१३

विजेते

२०१४

4

चौथा

२०१५

5
(लीग टप्पा)

विजेते

4
(लीग टप्प्यातले शेवटचे दोन सामने + पात्रता १ + अंतिम)

२०१७

विजेते

२०१९


(लीग टप्प्यातले शेवटचे दोन सामने + पात्रता १ + अंतिम)

विजेते

२०२०

विजेते

२०२५*

टीबीडी

*चालू सीझन