
सूर्यादादा म्हणजेच विक्रमादित्य!!
दणकेबाज फलंदाजी करायची असते तेव्हा फक्त एकच नाव समोर येतं. ते म्हणजे सूर्यकुमार यादव कारण सूर्य तळपायला लागला की कोणाचंच ऐकत नसतो आणि सूर्यादादा फलंदाजीला उतरला की तोही कोणाचंच ऐकत नसतो! 🌟
आपला लाडका मि. 360° ने आरआरविरूद्ध विजयी सामन्यात आपल्या २३ चेंडूंमध्ये ४८ धावांच्या कामगिरीदरम्यान एक मस्त विक्रम केला! 💥
48* (23) - Ab सूर्या नमस्कार toh pakka hai 👏#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #RRvMI pic.twitter.com/5dREhmVeV6
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
सातत्यपूर्णता? होय. ✅
स्टाइल? <read out-of-the-book shots> हो नक्कीच. ✅✅
तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सलग 25+ धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने २०१४ मधल्या रॉबिन उत्थप्पाच्या १० धावांचा विक्रमाला मागे टाकले आहे.
…आणि खरं सांगतोय, त्याने पॉइंट्स टेबलमध्ये आपल्या पहिल्या क्रमांकावर मारलेल्या मुसंडीत अप्रतिम फॉर्ममुळे खूप महत्त्वाची भूमिका बजावलीय!
𝐓𝐡𝐞 𝐜𝐥𝐢𝐦𝐛 𝐢𝐬 𝐨𝐧! 📈 pic.twitter.com/mhqnupdXiP
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2025
मधल्या फळीत सूर्यादादा आल्यामुळे मैदानात नाट्यमयतेची कमतरता उरलेली नाहीये. तो आत येतो, स्पॉटलाइट नावावर करतो आणि एकामागून एक ब्लॉकबस्टर इनिंग्स मारतो.
आपण कठीण परिस्थितीतून बाहेर येत असो किंवा सावरत असो, मिशनला अत्यंत चांगल्या स्थितीत आणून ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी तो आपल्या ट्रेडमार्क स्वीप-ला शॉट्सचा पुरेपूर वापर करतो.
तर, आपल्या विश्वासू सूर्यादादाला सलाम. तो आपल्या मधल्या फळीचा राजा आहे. २०२५ च्या सीझनमध्ये त्याची नोंद इतिहासात करणाऱ्या शॉट्सची उजळणी करूया.
तारीख |
प्रतिस्पर्धी |
धावसंख्या (चेंडू) |
२३ मार्च |
सीएसके |
२९ (२६) |
२९ मार्च |
जीटी |
४८ (२९) |
३१ मार्च |
केकेआर |
२७* (९) |
४ एप्रिल |
एलएसजी |
६७ (४३) |
७ एप्रिल |
आरसीबी |
२८ (२६) |
१३ एप्रिल |
डीसी |
४० (२८) |
१७ एप्रिल |
एसआरएच |
२६ (१५) |
२० एप्रिल |
सीएसके |
६८* (३०) |
२३ एप्रिल |
एसआरएच |
४०* (१९) |
२७ एप्रिल |
एलएसजी |
५४ (२८) |
१ मे |
आरआर |
४८* (२३) |
चालूदेत सूर्यादादा... तुमचे विक्रम सुरूच राहूदेत… 🥳