
MI vs GT: मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून तीन विकेट्सनी पराभव
आयपीएल २०२५ मध्ये मंगळवारी आपल्या संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध तीन विकेटने पराभव पत्करावा लागला. पावसामुळे डीएलएसच्या आधारावर जीटीला १९ ओव्हर्समध्ये १४७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या टीमने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स देऊन १५५ धावा केल्या.
याला उत्तर देताना जीटीने १९ ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावून १४७ धावा केल्या आणि डीएलएस नियमांतर्गत हा सामना नावावर केला.
MIvsGT सामन्यात आपल्या टीमची सुरूवात चांगली झाली नाही. एमआयने पहिल्या ओव्हरमध्ये सलामी फलंदाज रायन रिकल्टनची महत्त्वाची विकेट गमावली. तो दोन धावा करून मोहम्मद सिराजकडून बाद झाला.
यानंतर, रोहित शर्मा आणि विल जॅक्स यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण आपण चौथ्या ओव्हरमध्ये रोहितची विकेट गमावली. रोहितला फक्त सात धावा करता आल्या.
जॅकला सूर्यकुमार यादवने साथ दिली आणि डाव सावरला. विल आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी करत महत्त्वपूर्ण धावा केल्या. सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. ११ व्या ओव्हरमध्ये मुंबईने तिसरी विकेट गमावली. सूर्यकुमारने ५ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ३५ धावा केल्या.
एमआयने १२ व्या ओव्हरमध्ये विलची विकेट गमावली. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांचे योगदान दिले. यानंतर मुंबईचा एकही खेळाडू मैदानात जास्त टिकू शकला नाही.
हार्दिक पांड्या फक्त १ तर तिलक वर्मा ७ आणि नमन धीर ७ धावा करू शकले. कॉर्बिन बॉशने २२ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी केली. याशिवाय दीपक चहर ८ धावांवर नाबाद राहिला आणि कर्ण शर्माने १ धधाव काढली. अशा रितीने एमआयने निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ विकेट देऊन गमावून जीटीसाठी १५५ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. ट्रेंट बोल्टने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने दुसऱ्याच षटकात साई सुदर्शनला (५) बाद केले.
यानंतर शुभमन गिलने जोश बटलरसह डाव पुढे नेला. १२ व्या षटकात अश्विनी कुमारने बटलरला बाद केले. त्याने २७ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या.
१४ व्या ओव्हरमध्ये जीटीने दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आणि पावसामुळे सामना थोडावेळ थांबवला गेला. पावसानंतर मुंबई इंडियन्सने सामन्यात पुनरागमन करत सातत्याने विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराहने १५ व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलला बाद करून मुंबईला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. गिलने ४६ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
१६ व्या ओव्हरमध्ये १५ चेंडूत २८ धावा काढून शेरफेन रुदरफोर्ड पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, मुंबईच्या गोलंदाजांसमोर जीटी फलंदाजांना मैदानावर आपली पकड राखता आली नाही आणि एकामागून एक विकेट पडत गेल्या.
शाहरुख खान ६ धावा काढून बाद झाला आणि रशीद खान २ धावा काढून बाद झाला. पण पुन्हा एकदा पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला.
काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला आणि डीएलएस नियमानुसार एक षटक कमी करण्यात आले आणि जीटीला १९ ओव्हर्समध्ये १४७ धावांचे लक्ष्य मिळाले. ते जीटीने साध्य केले आणि सामना जिंकला. राहुल तेवतिया ११ धावांवर नाबाद राहिला आणि जेराल्ड कोएत्झे १२ धावा काढल्या.
अशा रितीने गुजरात टायटन्समध्ये १९ ओव्हर्समध्ये ७ विकेट्स देऊन १४७ धावा केल्या.
ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर दीपक चहरने एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रविवारी दिनांक ११ मे रोजी पंजाब किंग्सविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या
मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये १५५/८; विल जॅक्स ५३(३५), साई किशोर २/३४
गुजरात टायटन्स: १९ ओव्हर्समध्ये १४७/७; शुभमन गिल, ४३ (४६), जसप्रीत बुमराह २/१९