News

MI ची बॉलिंग युनिट – आम्हाला क्लीनबोल्ड केलंय!

By Mumbai Indians

पलटन, आपल्या गोलंदाजांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे कारण आयपीएल २०२५ मध्ये त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे! 💥

अगदी पहिल्या चेंडूपासून शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या पोरांनी प्रचंड लढा दिला, कसून मेहनत केली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना शब्दशः धडकी भरवली! 🥶 <अंहं... आम्ही हे नम्रतेनेच म्हणतोय …>

आपल्या जलदगती गोलंदाजांच्या भात्यातून निघालेले रॉकेट्स असो, त्यांना चकवणारे संथ चेंडू असोत किंवा स्पिनर्सची जादू असो. एमआयच्या गोलंदाजांनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. 👊

ट्रेंटच्या थंडरबोल्ट्सपासून ते बुमराहच्या स्टाइलपर्यंत. या खेळाडूंनी प्लेऑफ्सपर्यंत आपली गाडी तूफान वेगाने नेली!

खेळाडू

सामने

विकेट्स

ट्रेंट बोल्ट

१६

२२

जसप्रीत बुमराह

१२

१८

हार्दिक पांड्या

१५

१४

अश्वनी कुमार

११

दीपक चहर

१४

११

मिचेल सँटनर

१३

१०

कर्ण शर्मा

विघ्नेश पुथूर

विल जॅक्स

१३

मुजीब उर रेहमान

रिचर्ड ग्लीसन

व्हीएस राजू

कॉर्बिन बॉश

एकूण

१०९

परिस्थिती काहीही असो, कितीही तणाव असो. त्यांनी कायम आपली सर्वोत्तम कामगिरी केली. दबावाखाली आहात. आम्ही आहोत ना! डेथ ओव्हर्स? झालं काम. मोठ्या विकेट्स हव्यात? घेतल्या, अगदी #PlayLikeMumbai स्टाइलमध्ये.

याशिवाय या सर्वांनी फक्त विकेट्स घेतल्या नाहीत तर त्यांनी मानके स्थापित केलीत. एकामागून एका सामन्यात त्यांनी वेळोवेळी आपले जबरदस्त परफॉर्मन्स केले! 🔥

आपले बॉलिंगच्या महारथींना- तुम्ही कसला कड्डक परफॉर्मन्स केलात रे! तुम्हा सर्वांना पलटनकडून सलाम. आता हीच आग कायम राहूदेत. स्टंप्स उडून जात राहूदेत … 💙

आकडेवारी बघा ना काय सांगतेय. आयपीएल २०२५ मध्ये कोणत्याही टीमने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स! 💪

एका वाक्यात सांगायचे तर 👉 मुंबईचे गोलंदाज= फुल पैसा वसूल शो! 👌

*आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टीम्स

टीम

विकेट्स

एमआय

११६

पीबीकेएस

९७

आरसीबी

९४

एसआरएच

८८

जीटी

८८

सीएसके

८३

केकेआर

८१

एलएसजी

८०

डीसी

७५

आरआर

६८

*रनआऊट्ससह अंतिम संख्या