
खूप खूप आभार आणि प्रेम #TeamOf2025!
अभी ना जाओ छोडकर… 🥹
Not a goodbye but a see you soon ✨
— Mumbai Indians (@mipaltan) June 2, 2025
Mrs. Nita Ambani looked back on a memorable season and wished the team all the luck for the future. 💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/6Wf2mKYdLF
पहिल्या पाच सामन्यांमध्ये एका विजयापासून ते प्लेऑफ्समध्ये मुसंडी मारेपर्यंत... एक जबरदस्त धमाल राइड होती ती. 🤩 हा सीझन सिनेमातल्या मनोरंजनासारखा होता. यात काय नव्हते... नाट्यमयता, कमबॅक्स आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काळीज! 💙 आणि आम्ही आमच्या संघाचे प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहोत.
प्रत्येक वेळी ते मैदानावर उतरायचे तेव्हा अगदी प्राणपणाने खेळायचे... मग कमी धावसंख्येचा बचाव असो, दबावाखाली धावांचा पाठलाग असो किंवा हवेतल्या हवेत कॅच करणे असो, तुम्ही सर्वांनी कधीही कोणतीही कसर सोडली नाही.😎
… आणि संघातील नाते? बोले तो एकदम झकास! 🤟 तरुण खेळाडूंपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत - प्रत्येकजण एकमेकांच्या इतका जवळ आला की कोणतीही शक्ती त्यांना कधीही वेगळे करू शकली नाही! ड्रेसिंग रूम नेहमीच हास्य, विनोद आणि त्या अविरत जल्लोषाने गुंजत असे. आमचा आवडता भाग? हा पाहा ⬇️
𝗔𝗟𝗟 𝗥𝗢𝗨𝗡𝗗𝗘𝗥𝗦. 𝗔𝗟𝗟 𝗘𝗡𝗘𝗥𝗚𝗬. 𝗔𝗟𝗟 𝗩𝗜𝗕𝗘𝗦. 🔊💥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/0C0M7ChsIK
— Mumbai Indians (@mipaltan) May 22, 2025
आपले प्रशिक्षक दल? तुम्हाला सलाम आहे! 💪 कायम विचार विनिमय, नियोजन आणि तयारी. त्यांनी बसलेला प्रत्येक फटका परतावून लावला. त्यांनी फक्त खेळाडूंनाच प्रशिक्षण दिले नाही तर एक टीम उभी केली. एक असे कुटुंब जे एकत्र लढले, एकत्र राहिले आणि मजबुतीने उभे राहिले.
या टीमने फक्त क्रिकेट खेळले नाही तर त्यांनी एकमेकांशी बंधुभाव ठेवला. आमच्यावर विश्वास नाही का? हा बघा पुरावा🤗
𝗕𝗛𝗔𝗜𝗖𝗛𝗔𝗥𝗔 𝗢𝗡 𝗧𝗢𝗣, bas thoda late 😂😎#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/20Ut1mDlGl
— Mumbai Indians (@mipaltan) May 23, 2025
थोडक्यात सांगायचे तर तुम्ही पलटनला अभिमानाची भावना दिलीत. 👏 निष्ठा आणि चिकाटी काय करू शकते हे तुम्ही दाखवलेत. २०२४ मध्ये अगदी शेवटच्या क्रमांकापासून ते २०२५ मध्ये लढाऊ फिनिशपर्यंत. तुम्ही दाखवलेली लेव्हल जबरदस्त आहे!
हा सीझन संपला आहे. पण आठवणी काळजावर कोरल्या गेल्यात. दसविदानिया फॅम!