News

एमआय ज्युनियर: श्रीहन, सब्यसाची, लक्ष्य आणि इतरांची आपापल्या संघांसाठी चमकदार कामगिरी

By Paul I

श्रीहन हरिदास, सब्यसाची महापात्र, लक्ष्य वर्मा आणि इतरांनी बुधवारी एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आपापल्या संघांसाठी विजयी कामगिरी केली.

श्रीहन हरिदास (१०२ चेंडूंमध्ये ११५*) ने पराग इंग्लिश स्कूल (भांडुप)ला ज्युनियर राऊंड ऑफ ३२ च्या रोमांचक सामन्यात ४ विकेट्सनी विजय मिळवून देताना शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश (स्कूल)चा धुव्वा उडवला.

आधी फलंदाजीला उतरलेल्या शारदाश्रम शाळेने ओंकार भाईडेच्या अप्रतिम अर्धशतकामुळे (५७ चेंडूंमध्ये ६० धावा) २२१-८ ची उत्तम धावसंख्या उभारून दिली. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या संघाचा श्रीहन रचनाकार ठरला. अगदी शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात त्याने पराग इंग्लिश स्कूलला शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

दरम्यान सब्यसाची महापात्रच्या अप्रतिम अष्टपैलू खेळामुळे विबग्योर हाय (मालाड पूर्व) शाळेला १६ फेरीत पोहोचता आले.

सब्यसाचीने (५-२२) नवीन चेंडूने पार धुरळा उडवला. त्याने विबग्योर रूट्स अँड राइज (मालाड)च्या प्रतिस्पर्धी संघाला फक्त ९४ धावांमध्ये पराभव चाखवताना तब्बल ५ विकेट्स घेतल्या. सब्यसाचीने ४८ नाबाद धावा करून विबग्योर हायस्कूलला ७ विकेट्सनी विजय मिळवून दिला.

दुसरीकडे आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात डावखुरा जलदगती गोलंदाज लक्ष्य वर्माच्या (५-१०) सुंदर खेळामुळे व्हीपीएमएस विद्यामंदिर (दहिसर पूर्व)ला यशोधाम हायस्कूल (गोरेगाव)विरूद्ध १३६ धावांनी विजय मिळवणे शक्य झाले.

व्हीपीएमएस विद्यामंदिरचा संघ ४० ओव्हर्समध्ये फक्त १८३ धावांवर बांधला गेल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण होता. परंतु लक्ष्यने या प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम खेळ करत पाच विकेट्स घेतल्या आणि यशोधाम हायस्कूलला फक्त ४७ धावांवर गुंडाळून टाकले.

आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात आरव बदलानीने अष्टपैलू कामगिरी करत विबग्योर हायस्कूल आयसीएसई (गोरेगाव)ला बॉम्बे स्कॉटिश (माहीम)विरूद्ध ९५ धावांनी विजय मिळवून दिला.

आधी फलंदाजीला उतरलेल्या विबग्योर हायने आरवच्या ४१ चेंडूंमधील ५० धावांमुळे १९९ धावा केल्या.

आपल्या अर्धशतकामुळे प्रचंड आत्मविश्वास वाढलेल्या आरवने नवीन चेंडू हातात घेतला आणि तब्बल पाच विकेट्स घेऊन (५-३१) बॉम्बे स्कॉटिशच्या फलंदाजीचा पार धुव्वा उडवला. ऋष्यंत गालाने खेळ समाप्त करताना (४-१२) अशी कामगिरी केली.

लक्ष्य बाजपेयीच्या अप्रतिम पाच विकेट्समुळे (५-२२) मॉडर्न इंग्लिश स्कूल चेंबूरला आर. व्ही. नेरकर सेकंडरीविरूद्ध १० विकेट्सनी विजय मिळवता आला. आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात हा संघ फक्त ६५ धावांवर बाद झाला. लक्ष्यबरोबरच कणव सैनी (५१*) हा मॉडर्न इंग्लिश स्कूल टीमसाठीचा सर्वोच्च कामगिरी करणारा खेळाडू ठरला.

दैविक सावे (३-२३) आणि वेदांत निर्मल (३१*) यांच्या अप्रतिम खेळामुळे स्वामी विवेकानंतर इंटरनॅशनल स्कूल, बोरिवलीने सेंट पॉल हायस्कूल (दादर)ला १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात फक्त ६४ धावांवर सर्वबाद करून १० विकेट्सनी हरवले.

दरम्यान दुसऱ्या एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात स्वप्निक वाघधरेच्या आक्रमक अर्धशतकामुळे सानेगुरूजी इंग्लिश मीडियम स्कूल (दादर)ला पवार पब्लिक स्कूल (भांडुप)विरूद्ध १२६ धावांचे लक्ष्य अगदी सहजपणे साध्य ककरता आले. स्वप्निकच्या अर्धशतकापूर्वी आर्यन कदमच्या सुंदर ४-४ च्या खेळामुळे साने गुरूजी टीमच्या विजयाचा पाया रचला गेला.

वेदांत गोरेच्या अष्टपैलू खेळामुळे (२-२१ आणि १६) अंजुमन इस्लाम इंग्लिश स्कूल (सीएसटी)ला अल बरकत इंग्लिश स्कूल (कुर्ला)विरूद्ध तीन विकेट्सनी विजय मिळवता आला. हा संघ १०४ धावांमध्ये बाद झाला. गोरेबरोबरच झैद खान (३-१९)नेही अंजुमनच्या टीमसाठी उत्तम कामगिरी केली.

हर्ष नाडकरच्या सुंदर अष्टपैलू खेळामुळे (२-१७ आणि ५६) केसी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण)ने पोदार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई (पवई)चा आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात ८ विकेट्सनी पराभव केला. हर्षबरोबरच कल्पेश मिश्रानेही १५२ धावांच्या पाठलागामध्ये अप्रतिम अर्धशतक (६७*) झळकवले.  

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये यथार्थ यादवच्या सुंदर खेळामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)ला ११९ धावांमध्ये सर्वबाद झालेल्या वसंतविहार हायस्कूलविरूद्ध १२३ धावांनी विजय मिळवता आला.

थोडक्यात धावसंख्या:

१४ वर्षांखालील मुले (३२ ची फेरी)

आर. व्ही. नेरकर सेकंडरी २४.५ ओव्हर्समध्ये ६५ धावांवर सर्वबाद (लक्ष्य बाजपेयी ५-२२) चा मॉडर्न इंग्लिश स्कूल चेंबूरकडून ८.५ ओव्हर्समध्ये ६६/० धावांवर पराभव (कणव सैनी ५१*).

सामनापटूः लक्ष्य बाजपेयी

सेंट पॉल हायस्कूल (दादर) २६.२ ओव्हर्समध्ये ६४ धावांवर सर्वबाद (प्रेम सावंत २१; दैविक सावे ३-२३) चा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, बोरिवलीकडून ६ ओव्हर्समध्ये ६७/० धावांवर पराभव (वेदांत निर्मल ३१*).

सामनापटूः दैविक सावे

पवार पब्लिक स्कूल (भांडुप) २९.२ ओव्हर्समध्ये १२५ धावांवर सर्वबाद (वेदांत पेडणेकर ३५; आर्यन कदम ४-४) चा सानेगुरूजी इंग्लिश मीडियम स्कूलकडून (दादर) ७.५ ओव्हर्समध्ये १२६/१ धावा करून पराभव (स्वप्निक वाघधरे ७२).

सामनापटू- स्वप्निक वाघधरे

विबग्योर रूट्स अँड राइज (मालाड) २०.१ ओव्हर्समध्ये ९४ सर्वबाद (अरहम जैन ३३; सब्यसाची महापात्र ५-२२) चा विबग्योर हायकडून (मालाड पूर्व) १४.१ ओव्हर्समध्ये ९५/३ धावांवर पराभव (सब्यसाची महापात्र ४८*).

सामनापटूः सब्यसाची महापात्र

अल बरकत इंग्लिश स्कूल (कुर्ला) २५.४ ओव्हर्समध्ये १०४ दावांवर सर्वबाद (शौर्य पाटील २५; झैद खान ३-१९, वेदांत गोरे २-२१) चा अंजुमन इस्लाम इंग्लिश स्कूलकडून (सीएसटी) २३ ओव्हर्समध्ये १०५/७ धावांवर पराभव (लक्ष्मण विश्वकर्मा २७, वेदांत गोरे १६; सैफ खान ३-२२).

सामनापटूः वेदांत गोरे

विबग्योर हायस्कूल आयसीएसई (गोरेगाव) ३६ ओव्हर्समध्ये १९९ धावांवर सर्वबाद (आरब बदलानी ५०; अथांग खानोलकर ३-४०) कडून बॉम्बे स्कॉटिश (माहीम)चा २५.१ ओव्हर्समध्ये १०४ धावा सर्वबाद करून पराभव (अमोघ रेवणकर ३२; आरव बदलानी ५-३१, ऋषंत गाला ४-१२)

सामनापटू- आरव बदलानी.

शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश स्कूल (दादर) ३९ ओव्हर्समध्ये २२१/८ धावा (ओंकार भाईदे ६०; अर्जुन कदम २-१६) (११ पेनल्टी धावांसह) चा पराग इंग्लिश स्कूलकडून (भांडुप) ३९.३ ओव्हर्समध्ये २२२/६ धावांवर पराभव (श्रीहन हरिदास ११५*; मानस जाधव २-३०).

सामनापटू- श्रीहन हरिदास.

पोदार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई (पवई) ३५ ओव्हर्समध्ये १५१ धावांवर सर्वबाद (मोक्ष शाह ३२; हर्ष नाडकर २-१७) चा केसी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण)कडून २१.१ ओव्हर्समध्ये १५२/२ धावांवर पराभव (कल्पेश मिश्रा ६७*, हर्ष नाडकर ५६)

सामनापटू- हर्ष नाडकर

व्हीपीएमएस विद्यामंदिर (दहिसर पूर्व) ४० ओव्हर्समध्ये १८३/८ (जश नायक ३४*, दर्श ठेसिया ३१; दक्ष वाघमारे २-२७) कडून यशोधाम हायस्कूल (गोरेगाव) ११.३ ओव्हर्समध्ये ४७ धावांवर सर्वबाद करून पराभव (लक्ष्य वर्मा ५-१०)

सामनापटू- लक्ष्य वर्मा

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली) ३०.३ ओव्हर्समध्ये २४२ सर्वबाद (वेदांत पाटील ६८, यथार्थ यादव ६६; प्रथम पटेल ४-३८) कडून वसंत विहार हायस्कूलचा २६.२ ओव्हर्समध्ये सर्वबाद ११९ धावांवर पराभव (वेदांत चव्हाण ५२; अवधूत राऊळ ३-१७, यथार्थ यादव २-२०)

सामनापटूः यथार्थ यादव.