News

एमआय ज्युनियरः स्वामी विवेकानंद, आयईएस व्हीएन सुळे, केसी गांधी यांचा मुलांच्या यू-१४ उपांत्य फेरीत प्रवेश

By Mumbai Indians

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (बोरिवली), आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर), केसी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण) आणि इतर संघ मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटासाठी उपांत्य फेरीत पोहोचले.

वेदांत निर्मल (१०९) आणि युग असोपा  (१०५) यांच्या अप्रतिम शतकांमुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (बोरिवली)ने १४ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

साने गुरूजी इंग्लिश मीडियम स्कूल (दादर)ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बोरिवलीच्या या शाळेने त्यांच्या ४० ओव्हर्समध्ये ३ विकेट्स देऊन २८८ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी दादरच्या संघाचा पराभव २६ ओव्हर्समध्ये फक्त ९४ धावांवर केला. मंथन मेस्त्री (७ धावा ३ विकेट्स) आणि अर्णव लाड (१५ धावा ३ विकेट्स) यांनी उत्तम कामगिरी केली. स्वप्निक वाघधरे एकटा लढवय्या ठरला. त्याने ५४ धावा केल्या.

आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या उपउपांत्य सामन्यात आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर)ने देखील दोन शतके फटकावून अंतिम ८ संघांमध्ये प्रवेश मिळवला. शॉन कोरगांवकर (नाबाद १४५) आणि वेद तेंडुलकर (नाबाद १३५) या दोघांनी हल्ला चढवल्यामुळे आयईएसला ४० ओव्हर्समध्ये २ विकेट्स देऊन ३०९ धावा करता आल्या.

प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या विबग्योर हायस्कूल आयसीएसई (गोरेगाव)ला फक्त २८ धावा करता आल्या. त्यांनी १७.४ ओव्हर्समध्ये आपल्या सर्व विकेट्स दिल्या. शौर्य रायने एकही धाव न देता चार विकेट्स घेतल्या.

सामन्याच्या पेनल्टीटाइम चेंडूपर्यंत पोहोचलेल्या रोमांचक उपउपांत्य सामन्यात केसी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण)ने आयईएस न्यू इंग्लिश स्कूल (वांद्रे) चा एका विकेटने पराभव केला.

गंधर्व भिके (६६), ओम मालकर (६३) आणि अद्वैत राऊत (८ वर ४) यांच्या सुंदर कामगिरीमुळे व्हीपीएमएस विद्यामंदिर दहिसर पूर्व शाळेने विबग्योर हायचा (मालाड पूर्व) आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात १९३ धावांनी पराभव केला. २३६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विबग्योर हायचा संघाला ४२ धावांवरच समाधान मानावे लागले.

आयुष शिंदेच्या सुंदर अर्धशतकामुळे (६४) अंजुमन ए इस्लाम अल्लाना इंग्लिश मीडियम स्कूलने १९९ धावा केल्या आणि त्यानंतर डॉन बॉस्को हायस्कूल (माटुंगा)चा ७९ धावांवर पराभव केला. युवान शर्माने (१३ वर ३) आणि झैद खानने (२१ वर ३) विकेट्स घेऊन सामना विजयी करणारी कामगिरी केली.

दरम्यान आर्य कारळे (८२), मार्लेश शिंदे (७५) आणि इयव्हान शॉ (७ वर ३) यांच्या दिमाखदार खेळामुळे आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड)ने ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवलीचा संघ ९३ धावांवर सर्वबाद करून १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

पराग इंग्लिश स्कूल (भांडुप)ने नीरज धुमाळ (८७) आणि समृद्ध भट्ट (५२) यांच्या अर्धशतकांमुळे ५ विकेट्स घालवून २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या सेंट मेरी हायस्कूल एसएससी (माझगाव)चा संघ ७१ वर सर्वबाद झाला. प्रवीण दळवीने शानदार पाच विकेट्स घेतल्या (१७ वर ५.)

आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात वेदांत पंडितच्या नाबाद अर्धशतकामुळे (६७ नाबाद) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)ला मॉडर्न इंग्लिश स्कूल (चेंबूर)वर ८ विकेट्सनी विजय मिळवता आला.  

वेदांत पंडित (१९ वर ३) आणि किशन यादव (३२ वर ३) यांनी मॉडर्न इंग्लिश स्कूलला १७० धावांवर बाद केले आणि त्यानंतर वेदांतने देखणी फलंदाजीदेखील केली.

थोडक्यात धावसंख्या१४ वर्षांखालील (उपांत्यपूर्व फेरी)

व्हीपीएमएस विद्यामंदिर दहिसर पूर्व ४० ओव्हर्समध्ये ४ विकेट्सवर २३५ धावा (गंधर्व भिके ६६, ओम मालकर ६३, स्पर्श मास्टर ५० वर ४) कडून विबग्योर हायचा (मालाड पूर्व) १८.२ ओव्हर्समध्ये ४२ धावांवर सर्वबाद करून पराभव (अद्वैत राऊत ८ वर ४ विकेट्स)

सामनापटू: गंधर्व भिके

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (बोरिवली) ४० ओव्हर्समध्ये ३ विकेट्सवर २८८ धावा (वेदांत निर्मल १०९, युग असोपा १०५) कडून साने गुरूजी इंग्लिश मीडियम स्कूल (दादर)चा २६ ओव्हर्समध्ये ९४ धावांवर सर्वबाद करून पराभव. (स्वप्निक वाघधरे ५४; मंथन मेस्त्री ७ वर ३, अर्णव लाड १५ वर ३)

सामनापटूः युग असोपा.

आयईएस न्यू इंग्लिश स्कूल (वांद्रे) २३.४ ओव्हर्समध्ये १०१ धावा सर्वबाद (गंधर्व कुवळेकर २९; हर्ष किरण नाडकर २३ वर ४, सोहम अहिरे ३० वर ४) चा केसी गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण)कडून ३९.५ ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन १०२ धावांवर पराभव (नील शिंदे ३३ नाबाद, कल्पेश मिश्रा २५)

सामनापटूः सोहम अहिरे.

आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर) ४०.० ओव्हर्समध्ये ३०९/२ (शोण कोरगावकर १४५ नाबाद, वेद तेंडुलकर १३५ नाबाद) कडून विबग्योर हायस्कूल आयसीएसईचा (गोरेगाव) १७.४ ओव्हर्समध्ये २८ सर्वबाद करून पराभव (शौर्य राय ० वर ४)

सामनापटूः शोण कोरगावकर.

अंजुमन ए इस्लाम अल्लाना इंग्लिश मीडियम स्कूल ४० ओव्हर्समध्ये १९९ धावा सर्वबाद (आयुष शिंदे ६४, वेदांत चिले २९ वर ३) कडून डॉन बॉस्को हायस्कूल (माटुंगा)चा २१.५ ओव्हर्समध्ये ७९ धावांवर सर्वबाद करून पराभव. (युवान शर्मा १३ वर ३, झैद खान २१ वर ३)

सामनापटूः झैद खान.

आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड) ४० ओव्हर्समध्ये ७ विकेट्सवर २०१ धावा (आर्य काळे ८२, मार्लेश शिंदे ७५; सिद्धांत जाधव २९ वर ३) कडून ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल कांदिवलीचा ३६.४ ओव्हर्समध्ये नाबाद ९३ धावांवर पराभव (इव्यान शॉ ७ वर ३)

सामनापटूः इव्यान शॉ

पराग इंग्लिश स्कूल (भांडुप) ४० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सवर २७६ (नीरज धुमाळ ८७, समृद्ध भट्ट ५२; शिवांग काळे २३ वर ३) कडून सेंट मेरीज हायस्कूल एसएससी (माझगाव) चा २० ओव्हर्समध्ये ७१ धावांवर सर्वबाद करून पराभव (अनिष शेट्टी ४२ नाबाद, परीन दळवी १७ वर ५)

सामनापटूः नीरज धुमाळ

मॉडर्न इंग्लिश स्कूल (चेंबूर) ३९.५ ओव्हर्समध्ये ९ विकेट्सवर १७० (कणव सैनी ४३; वेदांत पाटील (क.) १९ वर ३, किशन यादव ३२ वर ३) चा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)कडून ३६.२ ओव्हर्समध्ये ४ विकेट्स देऊन १७२ धावांवर पराभव (वेदांत पाटील ६७ नाबाद) 

सामनापटू) वेदांत पाटील