
एमआय बोलके, खेलेंगे दिल खोल के” – मुंबई इंडियन्सच्या या अँथममधून मुंबई इंडियन्स आणि जनरेशन झेडच्या उत्साहाचा गौरव
“खेलेंगे दिल खोल के” कॅम्पेनचा भाग असलेली ही फिल्म मुंबई इंडियन्सच्या उत्साहाचा गौरव करते- आम्ही एक मोठा समूह आहोत- आमची टीम, आमचे प्रशिक्षक, आमचे सहाय्यक कर्मचारी आणि आमचे चाहते- आम्ही सर्व एकाच विश्वासाने एकत्र बांधले गेलो आहोत- आम्ही आयुष्याचा खेळ खेळू तेव्हा तो पूर्ण मनापासून खेळू.
मुंबई इंडियन्सने आज आपल्या अँथमची घोषणा केली - “एमआय एमआय बोलके, खेलेंगे दिल खोल के”. हा त्यांच्या आयपीएल २०२२ साठीच्या लोकांच्या पसंतीला पडलेल्या “खेलेंगे दिल खोलके” या कॅम्पेनचा पुढील भाग आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि जेन झेड यांचा मूड पकडण्यात आला आहे. तुमच्या आयुष्याचा खेळ मनापासून खेळा, अशक्याचे स्वप्न पाहा आणि त्याला सत्यात उतरवा, आशा कधीही सोडू नका आणि तुम्ही जे काही कराल त्यात तुमची सर्वोत्तम कामगिरी करा. त्यांच्यासाठी अपयश हा शिकण्याचा क्षण, स्वतःला वर उचलून आपल्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
म्युझिक व्हिडिओ येथे पाहता येईल.
या गाण्यात तरूण, उत्साही आणि कूल व्हाइब आहे. ती मुंबई इंडियन्स टीमच्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली जसप्रीत बुमरा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, नवीन तरूण खेळाडू आणि इतरांसह संपूर्ण संघाच्या दृश्याशी संबंधित आहे. या व्हिडिओत नृत्य आणि भावना एकत्र आणल्या गेल्या आहेत आणि भारताच्या रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. या फिल्ममध्ये क्रिकेट खेळण्याचे वेड, खेळाडू आणि दररोजची भावनांची रोलर कोस्टर राइड आपल्याला पाहायला मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दररोज हे सर्व मनापासून करत असता.
या कॅम्पेनच्या अँथमपाठोपाठ “वेलकम, खेलेंगे दिल खोलके” आहे. येथे मुंबई इंडियन्स संपूर्ण शहरभरात आपल्या सहकारी खेळाडूंच्या स्वागतासाठी होर्डिंग्स लावतात आणि “वन ड्रीम” हे मुंबई इंडियन्सच्या भारतीय क्रिकेटप्रति योगदानाचे प्रतीक आहे.
मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणतात की, “मुंबई इंडियन्सने कायमच अत्यंत उत्साहाने खेळ खेळला आहे- अगदी मनापासून आणि कधीही हार मानू नका या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन केले आहे. आमचे जगभरातील चाहते हा आमचा प्रमुख पाया आहे. हे अँथम तरूण आणि जेन झेड चाहत्यांचे प्रतिबिंब आहे ज्यांनी आम्ही जेव्हा जेव्हा मैदानात गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हाला पुढे नेले. आमची क्रिकेटची शैली, ब्रँडची मूल्ये आणि जे काही करतो ते सर्व त्यांच्या मूल्ये, निष्ठांशी सुसंगत आहे आणि ते त्यांना प्रेरित करते. ही गोष्ट मागील अनेक वर्षांत एमआय पलटन आर्मीच्या वाढीत प्रतिबिंबित झाली आहे.”
ओगिलवीचे व्यवस्थापकीय भागीदार अनुराग अग्निहोत्री म्हणाले की, “आयपीएल ही क्रिकेटेनमेंट आहे. क्रिकेट आणि मोठ्या प्रमाणावर मनोरंजन यात एकत्र आले आहे. आम्ही मागील कॅम्पेनमध्ये तरूण महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंची स्वप्ने पूर्ण झाल्याचे दाखवले होते. या वेळी आम्हाला थोडी मजा करायची होती. मागील फिल्म ही नवीन उगवत्या क्रिकेटपटूंसाठी होती. ही फिल्म चाहत्यांसाठी आहे. सर्वजण एकत्र गाताना बघणे आणि सोबत गाणे ही प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच आहे. चाहत्यांना आपले प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हा मंत्र आहे. आम्ही त्यांना त्यांच्या प्रेमासाठी काहीतरी देऊ इच्छित होतो. आम्ही या माध्यमातून त्यांना खरोखर त्यांना आवडेल असे काही देण्याचा प्रयत्न केला आहे.