एमआयची टीम, एमआयचं काळीज... थँक्यू #BatchOf2026
प्रत्येक लढा, प्रत्येक प्रयत्नात मुंबई इंडियन्सच्या या २०२६ च्या बॅचने सर्व प्रयत्न केले, 💯
अत्यंत अभिमानाने ब्लू अँड गोल्ड परिधान करून आणि पलटनने त्यांच्या पाठीशी राहून, 💙
प्रत्येक लढाई, धाव, विकेट आणि गर्जनेसह या टीमने आपल्याला असे क्षण दिले जे आपण कायम लक्षात ठेवू, 🥰
कधीकधी धावफलक आपल्याला हवे ते दाखवणार नाही पण टीमने आपला लढा कायम ठेवला, 💪
ते एका उत्साहाने, अभिमानाने आणि जाज्वल्य भावनेने खेळले, एमआयचे नाव कायम ठेवले, 🔥
सीझन संपला आहे पण आठवणी नाहीत. हा प्रवास कायम आठवणीत राहील कारण ही टीम अशी आहे जिने सर्वांच्या काळजाला हात घातला आहे✨
पलटन, काही आयपीएल सीझन फक्त गुणतक्त्यासाठी लक्षात राहत नाहीत. तणाव, दुखापती, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्याचा ताण असतानाही या मुंबई इंडियन्स टीमने कायम प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आदर करणे गरजेचे आहे. या सीझनने आपल्याला असे क्षण दिले ज्यातून आपल्याला या खेळाच्या आपण प्रेमात का पडलो आणि पलटन आण ज्युनियर पलटनसाठी एमआय का महत्त्वाची आहे हे कळते. ✅
मागच्या सीझनमधल्या काही आठवणी आपल्यासाठी खूप खास ठरल्या आहेत. एसआरएचविरूद्ध रायन रिकल्टनचे तडफदार शतक १२३*(५५) ते तिलक वर्माच्या जीटीविरूद्ध नाबाद १०१ धावांपासून ते पीबीकेएसविरूद्ध क्विंटन डे कॉकच्या नाबाद ११२(६०) धावांचा जबरदस्त मास्टरक्लासपर्यंत. प्रत्येक सामना अविस्मरणीय होता.
४००० runs and counting in 𝑩𝒍𝒖𝒆 𝒂𝒏𝒅 𝑮𝒐𝒍𝒅, a new milestone unlocked for Surya Dada! 💙✨ pic.twitter.com/kWcrZT4PRe
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2026
मुंबईचा राजा रोहित शर्माने आपल्या ७८ आणि ८४ च्या कामगिरीद्वारे जुन्या काळाची आठवण करून दिली. त्याचा हा खेळ अद्भुत आणि अद्वितीय होता. कॉर्बिन बॉश आपल्या सुंदर खेळासोबत आणि विशेषतः केकेआर आणि आरसीबी यांच्याविरूद्ध ३/३० आणि ४/२६ ची कामगिरी करून सर्वांच्या मनावर राज्य करून गेला. शार्दुल ठाकूरने टीमला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा उत्तम खेळ केला. त्याने पीबीकेएसस आणि केकेआर या दोन्ही टीम्सविरूद्ध ४/३९ ची कामगिरी केली. नमन धीरनेही तीन अर्धशतके फटकावली तर सूर्यकुमार यादवने ईएसए दिवसाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध ४२ चेंडूंमध्ये ६० धावांची मेजवानी दिली. कर्णधार हार्दिक पांड्यानेही याच सामन्यात ३४(१५) धावा केल्या.
हे वर्ष धाडसाचे, चिकाटीचे, या शहराचा अभिमान कायम राखण्याचे आणि प्रत्येक सामन्याच्या दिवशी चेहऱ्यावर हसू घेऊन वावरण्याचे होते. बॅच ऑफ २०२६ ने उत्तमरित्या पार पाडले. सर्व खेळाडू, कोचेस आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केले आणि सामना जिंकल्यानंतर जल्लोष केला आणि रोलरकोस्टर सामन्यांमध्ये तुम्ही आम्हाला रोमांचपूर्ण क्षण दिलेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खेळामुळे वानखेडेवर उत्साह सळसळत राहिला. आम्हाला या सर्वांचा अभिमान वाटतो. पडद्याच्या मागे खूप काम होत असते. परंतु त्याकडे आमचे कायमच लक्ष असते. 🙏
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या टीमची हार्टबीट- आमच्या पलटनचे खूप खूप आभार. तुम्ही घरच्या खेळपट्टीवरचा प्रत्येक सामना निळ्या रंगाच्या महोत्सवात रूपांतरित केला. तुमचा जयघोष, तुमचे प्रेम आणि पाठिंबा यांच्यामुळे मुंबई इंडियन्स फक्त एक टीम नाही तर ते एक कुटुंब बनले आहे. २०२६ चा सीझन आपल्याला हवा तसा निश्चितच नव्हता परंतु तो अभिमानाने आणि गौरवाने परिपूर्ण होता हे निश्चित! 💙