MIvRR रिपोर्ट: स्काय, एचपी यांचा लढा पण आयपीएल २०२६ मोहिमेचा कठीण शेवट

MIvRR रिपोर्ट: स्काय, एचपी यांचा लढा पण आयपीएल २०२६ मोहिमेचा कठीण शेवट

By Mumbai Indians

आमचा सीझन कठीण होता आणि कालची संध्याकाळही तितकीच कठीण होती. 😔. हा पूर्ण सामना चढउताराचा होता. या वेळी सुमारे २० हजार मुले वानखेडेवर स्टँड्समध्ये जल्लोष करत होती. मोठमोठे फटके मारले, जबरदस्त फील्डिंग केली आणि ही स्पर्धा अशीच शेवटच्या ओव्हरपर्यंत चालली. त्यांचे खूप मनोरंजन झाले. दुर्देवाने निकाल आपल्याला हवा तसा लागला नाही. विजयासाठी २०६ धावांचा पाठलाग करताना आपली सुरूवात चांगली झाली नाही. परंतु नंतर झालेला खेळ आणि जोरदार मुसंडी तडाखेबाज होती.

हार्दिकची लयलूट 👊

३४ धावा | १५ चेंडू | ३ चौकार | २ षट्कार.. त्याने आवश्यक असलेला धावदर १२ वर असताना ११.३ ओव्हर्समध्ये आपल्या संघाला १०१/५ वरून पहिल्याच चेंडूवर फटके मारायला सुरूवात केली. त्याने स्विंगवर हल्लाबोल केला. चेंडू पार स्टँड्समध्ये टोलवले आणि मुलांसाठी काही अविस्मरणीय आठवणी (आणि काही चेंडूसुद्धा) घरी नेण्यासाठी दिल्या. 💙💯

सुपला दादा आला रे 😁

सूर्यादादाचे स्टँडर्ड बघता त्याच्यासाठी हा सीझन खूप चांगला गेला नाही. परंतु आजच्या या घामेजलेल्या दुपारी त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी देण्याचा निर्णय घेतला. त्याने एकही चेंडू सोडला नाही. प्रत्येकावर फटके मारले आणि एमआयला ४२ चेंडूंमध्ये ६० धावा करून पॉवरप्लेममध्ये ३८/४ वर असलेल्या आपल्या टीमला संजीवनी दिली.

विल जॅक्स २०२५ मध्येही होता आणि २०२६ मध्येही 💙

विल जॅक्स आणि या ईएसए सामन्यांची एक खासियत आहे. तो २०२५ मध्ये स्टार होता आणि २०२६ मध्ये त्याने हार मानली नाही. त्याने धोकादायक यशस्वी जैस्वालला लवकरच बाद केले आणि नंतर स्कायसोबत १८ चेंडूंमध्ये ३३ धावा फटकावून एक मजबूत भागीदारी केली. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सीमारेषेजवळ केलेली फील्डिंग सर्वांच्या लक्षात राहील. त्याची ती जबरदस्त उडी आणि षट्कार थांबवताना बाऊंड्रीच्या मागून एका हाताने चेंडू बाहेर फेकणे हे कधीच विसरणार नाही. 🤯

एकूणात सर्व प्रयत्नांनंतरही हा दिवस आपला नव्हता. हा सीझनच आपला नव्हता. दोन अत्यंत कठीण महिन्यांनंतर सर्वांच्या मनात एक निराशा आहे की आपल्याला हवे ते आपण साध्य करू शकलो नाही. परंतु, काही हरकत नाही दोस्तांनो. आपल्या पोरांनी दाखवलेल्या लढ्याचा आपल्याला कायम अभिमान वाटतो. विशेषतः खास ईएसएस सामन्याच्या दिवशी आपली ज्युनियर पलटन म्हणजे २० हजार मुले हे स्वप्न काळजात घेऊन घरी परतली आहेत. 🥰