News

MIvRCB: एलिस पेरीच्या अष्टपैलू खेळामुळे आपल्याला थेट अंतिम फेरीत प्रवेश नाही

By Mumbai Indians

बरोबर, उद्याच्या निकालावर काही गोष्टी अवलंबून आहेत. पण आपल्याला याचा बदला घेण्यासाठी तीन दिवस आहेत. या सामन्यात बरेच काही पणाला लागले होते. आरसीबीला पात्रता फेरीत जायचे होते. मुंबई इंडियन्स सर्वोच्च स्थानासाठी प्रयत्नशील होती. दुर्दैवाने, आजचा दिवस आपला नव्हता. आपल्या फलंदाजांना फारशी कामगिरी करता आली नाही. आपली धावसंख्या कमी होती आणि चांगली गोलंदाजी करूनही तेवढे पुरेसे ठरले नाही. चला तर पाहूया...

एलिस पेरीने कमाल केली

ती या सामन्याची सर्टिफाइड दिग्गज आहे. दुर्दैवाने आपण आज तिच्यासमोर उभे होतो. तिने सहा विकेट्स घेतल्या आण पाठलागादरम्यान नाबाद ४० धावा केल्या. तिने चेंडूचा पट्टा चांगलाच घुमवताना ताज्या पिचचा पुरेपूर वापर करून घेतला. चेंडू थेट स्टंप्सवर येऊन आदळला. आपले चार फलंदाज बोल्ड झाले आणि दोन एलबीडब्ल्यू झाले.

चांगला पॉवरप्ले आणि मग धडाम धुडूम, पेरीची कृपा दुसरे काय!

हायली मॅथ्यूस आणि तिच्यासोबतची नवीन सलामी फलंदाज एस सजना, आजारी असलेल्या यस्तिका भाटियाऐवजी खेळायला आली. तिने एमआयला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून देताना ४३ धावा केल्या. त्यानंतर सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट पडली. त्यानंतर नॅट स्किव्हर ब्रंट आणि सजना या दोघींनी डाव सावरला. पण दुर्दैवाने २१ धावांवर सात विकेट्स पडल्या. त्यातल्या सहा विकेट्स पेरीच्या नावावर जमा झाल्या. बघता बघता इनिंगची गाडी रूळावरून घसरली. एमआयचा संघ १९ ओव्हर्समध्ये ११३ धावांवर बाद झाला.

लवकर विकेट्स पडल्यानंतर हातातला सामना घालवायला पेरीचे पुनरामगन

६.१ ओव्हर्समध्ये २२/१ ते २५/२ ते ३९/३. आपण सामन्यात खरोखर चांगल्या स्थितीत होतो. पण पुन्हा एकदा दुर्दैव पेरीच्या रूपाने आडवे आले. तिने रिको घोषच्या मदतीने ७६ धावांची भागीदारी करून आपल्या हातातून सामना हिसकावून घेतला. शिवाय आपणसुद्धा एक दोन कॅचेस सोडल्या ते सोडा.
हरकत नाही. लीगच्या टप्प्यातच असे सामने बाहेर निघून जाणे चांगले असते. आता पात्रता फेरीची स्थिती पाहूयाः सध्या तरी आपल्याला दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सच्या निकालाची वाट पाहायची आहे. डीसीचा १२० धावांनी किंवा ९० चेंडू शिल्लक असताना पराभव झाल्यास त्यांचा एनआरआर एमआयपेक्षा कमी होईल आणि आपल्याला थेट फायनल्समध्ये प्रवेश मिळेल. तरीही थेट फायनल किंवा एलिमिनेटरमधून फायनलमध्ये गेलो तरी आपल्याला जिंकावेच लागणार आहे. आपण एलिमिनेटरमधून गेलो तर एमआय विरूद्ध आरसीबीचा सामना पुन्हा होईल. याच परिस्थितीत एमआयची जिगर दिसते. आपण परत येऊ, पण यावेळी अत्यंत आक्रमक राहून.

पलटन, आम्हाला माहित्ये तुम्ही सोबत आहात. चला हार मानायची नाहीये!

थोडक्यात धावसंख्या: मुंबई इंडियन्स ११३ सर्व बाद (१९ ओव्हर्स) (एस सजना ३०, हायली मॅथ्यूस २६; एलिस पेरी ६/१५) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ विकेट्सनी पराभूत ११५/३ (१५ ओव्हर्स) (एलिस पेरी ४०, रिचा घोष ३६, हायली मॅथ्यूस १/११)