News

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आपल्या यूएई इंटरनॅशनल लीग टी२० आणि क्रिकेट साऊथ आफ्रिका टी२० लीगसाठी ब्रँड्सची घोषणा

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमचे मालक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आज मुंबई इंडियन्सच्या #वनफॅमिली चा हिस्सा होणाऱ्या दोन फ्रँचायझींचे नाव निश्चित केले आहे. यूएईच्या इंटरनॅशनल लीग टी२० साठी ‘एमआय एमिरेट्स आणि क्रिकेट साऊथ आफ्रिका टी२०  लीगसाठी एमआय केपटाऊन हे ब्रँड्स निश्चित करण्यात आले आहेत. हे ब्रँड्स मुंबई इंडियन्सच्या प्रतिष्ठित निळ्या आणि गोल्ड रंगात रंगतील. 

एमआय एमिरेट्स आणिएमआय केपटाऊन’ – येथे चित्रफीत पाहा. 

एमआय एमिरेट्स आणि ‘एमआय केपटाऊन – ही नावे निवडण्यामागील मुखअय कारण म्हणजे या टीम्स ज्या प्रदेशाच्या आहेत तिथली ही ओळख आहे. ‘एमआय एमिरेट्स किंवा “माय एमिरेट्स” आणि माय केपटाऊन या टीम्स एमिरेट्स आणि केपटाऊनमधील चाहत्यांसाठी खास आहेत. हे नवीन ब्रँड्स प्रतिष्ठित मुंबई इंडियन्सची ओळख आहेत आणि स्थानिक रंगात रंगलेले आहेत. #वनफॅमिलीचा जागतिक विस्तार या लीग्समध्ये अशी मूल्ये आणि निष्ठा आणेल ज्यामुळे मुंबई इंडियन्सला फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सर्वाधिक आवडत्या टीम्सपैकी एक होण्याचा बहुमान मिळाला आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक सौ. नीता एम. अंबानी म्हणाल्या की, एमआय एमिरेट्सआणिएमआय केपटाऊन दोन नवीन ब्रँड्सचे आमच्या #वनफॅमिली मध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्यासाठी एमआय फक्त क्रिकेटपुरते मर्यादित नाही. स्वप्ने पाहणे, निडर राहून आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन आणणे या क्षमता हा ब्रँड आपल्यामध्ये रूजवतो. मला खात्री आहे की एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन हे दोन्ही ब्रँड्स हीच मूल्ये अंगीकारून एमआयचा जागतिक क्रिकेटचा वारसा अत्यंत उंचीवर नेऊन ठेवतील!”

रिलायन्स इंडस्ट्रीजने क्रिकेट फ्रँचायझीजची मालकी, भारतात फुटबॉल लीग, स्पोर्ट्स स्पॉन्सरशिप, समुपदेशन आणि एथलिट टॅलेंट मॅनेजमेंट तसेच उद्योगातील सर्वोत्तम कार्यपद्धती आणून क्रीडा वातावरणात उत्क्रांती आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

नवीन ब्रँडच्या घोषणेबरोबरच दोन्ही टीम्सचे सोशल मीडिया हँडल्सही लाइव्ह झाले आहेत. आम्हाला येथे फॉलो करा: 

एमआय एमिरेट्स

Facebook | Twitter | Instagram | YouTube 

एमआय केपटाऊन

Facebook | Twitter | Instagram | YouTube

प्रसारमाध्यमांसाठी छायाचित्रे आणि व्हिडिओ: MI Emirates and MI Cape Town