News

२००९ मध्ये शिखर, २०१९ मध्ये क्यूडीके, २०२४ मध्ये हार्दिकः आयपीएलच्या इतिहासात एमआयला विकण्यात आलेले १६ खेळाडू

By Mumbai Indians

एक आहे चमकदार गोल्ड आणि एक आहे चमकदार ब्लू आणि गोल्ड. अगदी अचूक सरप्राइज पॅकेज, आपल्या पझलमध्ये बसणारा अचूक तुकडा. मुंबई इंडियन्सकडे आयपीएलच्या इतिहासात लिलावापूर्वी #OneFamily व्यापार अस्तित्वात आणणारे अनेक स्टार खेळाडू होते. 

चला तर मग आपण अर्काइव्ह पाहून त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवूया. 

शिखर धवन

त्याचे गब्बर असे नामकरण होऊन वर्ल्ड क्रिकेटमधला सर्वाधिक घातक फलंदाज ठरण्यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (आता दिल्ली कॅपिटल्स) थेट खेळाडू देवाणघेवाणीत फॅ-एमआय-लीकडे आला. आशिष नेहरा त्याच्या बदल्यात तिकडे गेला.  

शिखरने ब्लू आणि गोल्डला दोन सीझन्समध्ये परिधान केले (२००९ आणि २०१०) आणि आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग टी२० मध्ये १९ सामन्यांपैकी ३४५ धावा केल्या. 

झहीर खान

आपल्या आघाडीच्या सीमरने थोड्याशा अपारंपरिक पद्धतीने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला- २००९ आयपीएल सीझनपूर्वी आरसीबीसोबत झालेल्या व्यवहारात तो आपल्याकडे आला आणि रोहित उत्थप्पा आपल्याकडून तिकडे गेला. झॅकने २००९ मध्ये सहा विकेट्स (२३.६६ सरासरी आणि ६.७६ इकॉनॉमी) घेतल्या आणि २०१० मध्ये १५ विकेट्स (२५.०६ सरासरी आणि ७.७७ इकॉनॉमी) घेतल्या. त्यामुळे एमआयला अंतिम फेरी गाठणे शक्य झाले. 

दिनेश कार्तिक आणि प्रज्ञान ओझा

मुंबई इंडियन्सला विकेट कीपिंग आणि स्पिनमध्ये काही स्पेशालिस्ट खेळाडूंची गरज होती. तेव्हा संघाने दिनेश कार्तिकला किंग्स ११ पंजाबसोबत (आता पंजाब किंग्स) खेळाडू अधिक रोख अशा व्यवहारात साइन केले. आर. सतीशला तिकडे पाठवले गेले. प्रज्ञान ओझा पुन्हा एकदा २०१२ सीझनच्या सुरूवातीला ब्लू अँड गोल्डमध्ये (डेक्कन चार्जर्सकडून) आपल्याकडे आला.  

त्यांनी तात्काळ उत्तम कामगिरी करून दाखवली. २०१३ चा सीझन जिंकणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये डीकेने ५१० धावा केल्या तर ओझाने तेवढ्याच सामन्यात १६ विकेट्स घेऊन ब्लू आणि गोल्डला टी२० मधला आपला पहिला चषक जिंकण्यात मदत केली.  

पार्थिव पटेल

२०१५ च्या सीझनमध्ये पार्थिवला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आणण्यात आले आणि त्याने अजिबात निराश केले नाही. त्याने एमआयला आयपीएलचा मुकुट घालण्यास मदत करण्यासाठी २०१५ मध्ये फलंदाजीत (३३९ धावा, १० विकेट्स- सात कॅच, तीन स्टंप्स) आणि २०१७ मध्ये (३९५ धावा, आठ विकेट्स- सहा कॅच, दोन स्टंप्स) दणदणीत कामगिरी करून दाखवली. 

क्विंटन डे कॉक

आरसीबीकडून व्यवहारात मुंबईकडे आलेला आणखी एक खेळाडू. २०१९ सीझनच्या सुरूवातीला त्याने ब्लू आणि गोल्डमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जे काही घडले त्याला इतिहास म्हणतात. त्याने १६ इनिंग्समध्य ५२९ धावा आणि १३२.९१ चा स्ट्राइक रेट. क्यूडीकेच्या या दणदणीत आगमनामुळे मुंबई इंडियन्सला आपला चौथा आयपीएल चषक जिंकता आला. तो थांबला नाही. त्याने २०२० मध्ये आणखी ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि आणखी एक चषक जिंकला. 

ट्रेंट बोल्ट

ट्रान्सफरचा थंडरबोल्ट. ट्रेंट बोल्ड एमआयकडे २०२० आयपीएलच्या सुरूवातीला दिल्ली कॅपिटल्सकडून आला. त्याने एमआयसाठी २९ आयपीएल सामन्यांमध्ये ३८ आयपीएल विकेट्स घेतल्या. त्याच्यासाठी चेंडूसोबत २०२० चा सीझन स्वप्नातला सीझन होता. त्याने या सीझनमध्य १५ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या. यात त्याची अविस्मरणीय ओव्हरसुद्धा होती. त्याने ४१ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ४/१८ अशी कामगिरी केली आणि एमआयने या सामन्यात १० विकेट्सनी विजय मिळवला. तो आणखी एक सीझन थांबला (२०२१- १३ विकेट्स) त्यानंतर मेगा लिलावात तो राजस्थान रॉयल्सकडे गेला. 

जेसन बेहरेनडॉर्फ

विजेच्या २०१९ आयपीएल टीमचा भाग असलेला जेसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या व्यापारी डीलमध्ये घरी परतला. त्याने आयपीएल २०२३ मध्ये ब्लू आणि गोल्डमध्ये प्रचंड मोठी कामगिरी केली. या ऑसी खेळाडूने १२ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आणि नवीन चेंडूचा स्पेशालिस्ट असल्याची आपली ख्याती सिद्ध केली. 

सीझन

खेळाडू

कोणाकडून आला

२००९

शिखर धवन

दिल्ली कॅपिटल्स

 

झहीर खान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

जयदेव शाङ

राजस्थान रॉयल्स

२०१२

दिनेश कार्तिक

किंग्स ११ पंजाब

 

प्रज्ञान ओझा

डेक्कन चार्जर्स

२०१५

उन्मुक्त चांद

राजस्थान रॉयल्स

 

विनय कुमार

कोलकाता नाइट रायडर्स

 

पार्थिव पटेल

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू

२०१९

क्विंटन डे कॉक

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू

 

जयंत यादव

दिल्ली कॅपिटल्स

२०२०

ट्रेंट बोल्ट

दिल्ली कॅपिटल्स

 

धवल कुलकर्णी

राजस्थान रॉयल्स

 

शेरफान रूदरफोर्ड

दिल्ली कॅपिटल्स

२०२३

जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू

२०२४

रोमारिओ शेफर्ड

लखनौ सुपर जायंट्स

 

हार्दिक पांड्या

गुजरात टायटन्स