News

कर्णधार रोहित हिरो ठरला पण बांग्लादेशने ओडीआय मालिका जिंकली

By Mumbai Indians

शेवटच्या ओव्हरमध्ये २० धावांची गरज होती. मुस्ताफिझूर गोलंदाज होता. दुखापतग्रस्त रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर खेळायला गेला. त्याने २२ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या होत्या. शेवटच्या टप्प्यापर्यंत एकटाच लढत होता. पहिला चेंडू शून्यावर गेला. त्यानंतर दोन चौकार. मग चौथा चेंडू पुन्हा एकदा शून्यावर होता.

१२ धावा | २ चेंडू आणि रोहितने एक जोरदार षटकार ठोकला. ६ धावा | १ चेंडू. पण शेवटी एक यॉर्कर पडला. शेवटची आशाही संपली. आपल्या हिटमॅनची दैदिप्यमान खेळी पुरेशी ठरली नाही.

दुर्दैवाने सामना निसटला

बांग्लादेशने शेर-ए-बांग्ला स्टेडियमवरील भारताविरूद्ध दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना पाच धावांनी जिंकला. पुन्हा एकदा सामना हातातून निसटला आणि टायगर्सनी ही सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका २-०ने खिशात टाकली.

लिट्टन दासने आधी नाणेफेक जिंकली आणि आधी फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मेहदी हसन मिराझच्या ८३ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा, त्यापाठोपाठ महमुदुल्लाच्या ९६ चेंडूंमध्ये ७७ धावा यांच्यामुळे त्यांना एका टप्प्यावर ६९/६ वर असताना २७१/७ पर्यंत जाणे शक्य झाले.

लवकर विकेट्स पडल्यानंतरही भारताचे आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रेयस अय्यरने अक्झर पटेलसोबत खूप मेहनत केली. कर्णधार रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर खेळायला आहे. त्याच्या अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही त्याने फलंदाजी केली आणि संघाला विजयाकडे खेचत नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

गोलंदाजांनी यजमानांच्या फलंदाजीला उधळून लावले.

मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी बांग्लादेशच्या पहिल्या फळीकडून होणारे हल्ले मोडून काढले. त्यांचा प्रचंड वेग आणि स्विंग बांग्लादेशच्या फलंदाजांना हाताळण्यासाठी खूप कठीण होता. त्यामुळे संघ बघता बघता ५२/३ वर येऊन पोहोचला.

त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरदेखील सोबत आला आणि त्याने मधल्या फळीचा धुव्वा उडवला. शकीब अल हसन आणि मुश्फिकार रहीम यांना आपल्या वेगाने चकवल्यानंतर त्याने एका चुकीच्या चेंडूवर अफीफ हुसेनचा पत्ता साफ केला. पाहुणा संघ ६९/६ वर आल्यामुळे सामना पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाले.

पुन्हा एकदा मेहदी हसन मिराज!

पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात १० व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केल्यानंतर मेहदी हसन मिराझ पुन्हा एकदा बांग्लादेशचा एमव्हीपी ठरला. त्याने महमुदुल्लाच्या जोडीने सातव्या विकेटसाठी जोरदार १४८ धावांची भागीदारी केली. हससने आपले पहिले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आणि महमुदुल्लाने ९६ चेंडूंमध्ये ७७ धावा केल्या. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला २५० धावांचा टप्पा गाठता आला.

शेवटच्या टप्प्यावर नसूम अहमदने जोरदार फटकेबाजी केली आणि टायगर्सनी ५० ओव्हर्समध्ये २१७/७ धावा केल्या.

पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गेल्या

एक इनिंग आराम केल्यानंतर विराट कोहली सलामीसाठी उतरला कारण कर्णधार रोहित शर्मा पहिल्या इनिंगमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. परंतु इबादत हुसेनने त्याचा खेळ आटोपला तर मुस्ताफिझूर रहमानने अत्यंत सहजपणे शिखर धवनला तंबूत पाठवले.

बुडत्याला अय्यरचा आधार

भारत २० ओव्हर्सच्या शेवटी ८०/४ वर होता. अक्झर पटेल (५६ चेंडूंमध्ये ५६ धावा) आणि श्रेयस अय्यर (१०२ चेंडूंमध्ये ८२ धावा) मधल्या फळीत खेळत होते. जहाज बुडताना दिसू लागले होते. परंतु श्रेयस अय्यरने आपल्या प्रचंड वेगवान पाठलागाने जहाजाला आधार दिला. या दोघांनी सावधगिरी आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घालून भारताला लक्ष्याजवळ आणून ठेवले.

त्यांनी पाचव्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या. त्यानंतर अय्यर डीप मिड विकेटवर बाद झाला. त्यानंतर अक्झर पटेलही बाद झाला आणि बांग्लादेशसाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला.

“ओह कॅप्टन, माझा कॅप्टन!”

रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने आपल्या कृतीने आपण काय आहोत हे सिद्ध केले.

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ४० धावांची गरज असताना रोहितने महमुदुल्लाच्या ४९ व्या ओव्हरमध्ये २० धावा अक्षरशः कुटल्या. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये मुस्ताफिझुर रेहमानच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. अत्यंत विस्मयकारक लढ्यात कर्णधार २८ चेंडूंवर ५१ धावा करून नाबाद राहिला. परंतु भारताला पाच धावा कमीच पडल्या.

विक्रमाची नोंद: पाचशे षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला दुसरा फलंदाज ठरला आहे! (जोरदार, शानदार, धमाकेदार!)

थोडक्यात धावसंख्या: बांग्लादेश ५० ओव्हर्समध्ये २७१/७ (मेहदी हसन मिराझ १००*, महमुदुल्ला ७७, वॉशिंग्टन सुंदर ३/३७) भारत ५० ओव्हर्समध्ये २६६/९ (श्रेयस अय्यर ८२, अक्झर पटेल ५६, इबादत हुसैन ३/४५) भारताचा पाच धावांनी पराभव.