News

SLvIND पूर्वावलोकन: ओडीआय सुरू होतायत आणि आपला मुंबईचा राजा- रोहित शर्मा आलाय!

By Mumbai Indians

कर्णधार स्कायच्या नेतृत्वाखाली टी२०आय मालिका क्लीन- स्वीप ३-०. आता कॅप्टन रोची पाळी.

तुमचे सीटबेल्ट्स घट्ट बांधा! रोहित शर्मा आपल्या मोठे षटकार आणि क्लासी चौकारांसह आपले मनोरंजन करायला परत आलाय. शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या तीन ओडीआय सामन्यांची एक्शन आता कोलंबोतल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू होतेय.

बार्बाडोसमध्ये टी२० विश्वचषक जिंकून जगभरातील लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणल्यानंतर हिटमॅन आपल्या चाहत्यांना रोमांचित करण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीदेखील परत आला असून रो-को जोडी आपली जादू चालवायला सज्ज आहे.

भारताचे अप्रतिम ओडीआय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात नेतृत्व केल्यानंतर ओडीआयमध्ये परतलेला हिटमॅन आपला दणदणीत खेळ आणि बॅटसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय सटासट फलंदाजी सुरूच ठेवणार आहे. शुक्रवारचा सामना बॉक्स ऑफिस हिट असेल हे नक्की.

मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएल २०२४ मध्ये खेळू शकला नाही. तो ओडीआय विश्वचषकात पर्पल पॅचमधून पुढे येणार आहे. गंमतीचा भाग म्हणजे त्याची ५/८१ ची सर्वोत्तम कामगिरी भारताविरूद्धच झाली होती.

काय: श्रीलंका विरूद्ध भारत ओडीआय मालिका

कधी: शुक्रवार, २ ऑगस्ट ते बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४.

कुठे: आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो

काय अपेक्षा आहे: हिटमॅन गौतम गंभीरसोबत प्रथमच खेळणार असून. हे दोघे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी एक टीम तयार करण्यासाठी ड्रॉइंग बोर्डकडे आलेले आहेत. टीममध्ये तरूण आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा समावेश आहे. मेन इन ब्लूला आणखी एक चषक घरी आणताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!

श्रीलंका विरूद्ध भारत: आकडेवारी

ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी

श्रीलंका

संघ

भारत

168

सामने

168

57

जिंकले

99

99

हरले

57

1

बरोबरीत

1

11

अनिर्णित

11

 

श्रीलंका

संघ

भारत

सनथ जयसूर्या - 2899 धावा

सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर - 3113 धावा

मुथय्या मुरलीधरन - 74 विकेट्स

सर्वाधिक विकेट्स

झहीर खान - 66 विकेट्स

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेट कीपर), केएल राहुल (विकेट कीपर), रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव

श्रीलंका: चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेट कीपर), सदीरा समरविक्रम (विकेट कीपर), कामिंदू मेंडिस, जनित लियानगे, निशान मधुश्का (विकेट कीपर), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे, चमिका करूणारत्ने, महीश ठिकसना, अकिला धनंजय, दिलशान मधुशंका, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो