News

सूर्यकुमार यादव विराट कोहलीची चमकदार कामगिरी, भारत २-१ ने विजयी

By Mumbai Indians

तीन रोमांचक सामने आणि तीन उत्कंठावर्धक शेवट!

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली नेत्रदीपक अर्धशतके पूर्ण करून भारतीय संघाच्या विजयाचे रचनाकार ठरले. भारताने मालिका २-१ ने जिंकत ऑस्ट्रेलियावर शेवटच्या सामन्यात सहा विकेट्सनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने एक चांगली सुरूवात आणि शेवट करून कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड यांच्या अर्धशतकांमुळे १८६/७ ची धावसंख्या उभारून दिली.

सुदैवाने पावसाच्या अंदाजामुळे खेळावर प्रभाव पडला नाही आणि चाहत्यांना दुसऱ्या टी२०आयमध्ये प्रत्येकी आठ ओव्हरचा सामना पाहायला मिळाल्यानंतर या वेळी एक पूर्ण सामना पाहता आला.

भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियामध्ये नागपूरच्या सामन्यातून वगळण्यात आल्यानंतर भुवनेश्वर कुमारला ऋषभ पंतच्या जागेवर खेळवण्यात आले. पाठीच्या दुखण्यामुळे दीपक हूडा निवडीसाठी तयार नव्हता.

पाहुण्या संघात सीन एबॉटच्या जागी जोश इंग्लिस खेळायला आला.

कॅमेरॉन ग्रीनने एक सलामीचा फलंदाज म्हणून या मालिकेच नेत्रदीपक कामगिरी केली  आहे. त्याने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत फक्त तीनच ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला ४०/० वर नेले. या २३ वर्षीय खेळाडूने त्यातील ३७ धावा केल्या.

भारतीय संघाला आपली पहिली विकेट एरॉन फिंचच्या रूपाने मिळाली. अक्झर पटेलने त्याची विकेट चौथ्या ओव्हरमध्ये घेतली.

त्यानंतर लवकरच ओपनर कॅमेरॉन ग्रीनने फक्त १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या फलंदाजीवर तो बाद झाला.

पॉवरप्ले संपताना ऑस्ट्रेलियाचे दोन्ही ओपनर्स पॅव्हिलियनला परतलेले असतानाही त्यांचे वर्चस्व कायम होते. धावफलकावर ६६/२ अशी धावसंख्या दिसत होती.

त्यानंतरच्या ओव्हरमध्ये यजमान संघाने धोकादायक ठरू शकणाऱ्या स्टीव्ह स्मिथची विकेट घेण्याची संधी गमावली. अक्झर पटेलने बॅकवर्ड पॉइंटवर त्याची कॅच सोडली.

परंतु, अक्झर पटेलने हा चुकलेला कॅच भरून काढताना मैदानावर अप्रतिम कामगिरी केली. त्याने स्ट्रायकर एंडवर टाकलेल्या अप्रतिम चेंडूमुळे ग्लेन मॅक्सवेलला परतीचा रस्ता गाठावा लागला.

त्यानंतर स्टीव्ह स्मिथदेखील बाद झाला. यजमान संघाने सामन्यावरची पकड पुन्हा घेतली. पॉवरप्लेमध्ये ११ असलेला रन रेट त्यांनी १० ओव्हर्सच्या शेवटी ८.५ पर्यंत आणला.

अक्झर पटेलने पुन्हा एकदा चमत्कार दाखवत जोश इंग्लिस आणि फॉर्ममध्ये असलेल्या मॅथ्यू वेडची विकेट घेतली. त्याने १४ व्या ओव्हरमध्ये आपल्या अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले.

ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आला असताना टिम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्स या मुंबई इंडियन्सच्या जोडगोळीने ६८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि त्यांच्या संघाला १८६/७ पर्यंत नेले. टिम डेव्हिडने आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक फटकावले.

भारतीय संघाची १८७ धावांच्या पाठलागाची सुरूवात थोडी डळमळीत झाली. केएल राहुल पहिल्या ओव्हरमध्येच फक्त एक धाव काढून बाद झाला.

चौथ्या ओव्हरमध्ये १४ चेंडूंवर १७ धावा काढून रोहित शर्मा पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. कांगारूंनी भारतीय संघावर प्रचंड दबाव आणला.

सुरूवातीला थोडे धक्के बसल्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी स्थिर खेळ करून भारताला पॉवर प्लेच्या टप्प्यात ५०/२ वर आणून ठेवले.

या दोन्ही फलंदाजांनी खूप सुंदर फटके मारून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारताने १० ओव्हर्समध्ये ९१/२ पर्यंत पोहोचून रनरेट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने एडम झम्पाच्या १३ व्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या ५० धावा पूर्ण केल्या.

परंतु स्काय पुढील ओव्हरमध्ये ३६ चेंडूंवर ६९ धावा करून बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुटकेचा निःश्वास सोडला. त्याने विराट कोहलीसोबत १०४ धावांची भागीदारी करून भारताला एका आश्वासक जागी आणून ठेवले.

तीन ओव्हर्समध्ये ३२ धावांची गरज असताना सामन्याचे पारडे भारताच्या दिशेने कललेले होते.

विराट कोहली शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतरही भारताने विजयाचा हा टप्पा पूर्ण केला.

हार्दिक पंड्याने शेवटच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या अटीतटीच्या सामन्यात भारताला विजय मिळाला.

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलिया २० ओव्हर्समध्ये १८६/७ (टिम डेव्हिड ५४, अक्धर पटेल ३/३३) भारताकडून सहा विकेट्सनी पराभव- १८७/४ (सूर्यकुमार यादव ६९, डॅनियल सॅम्स २/३३)

विजयी वारूवर स्वार झालेला भारतीय संघ आता येत्या २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेसाठी यजमान होणार असून (प्रत्येकी तीन टी२०आय आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने) आणि त्यानंतर आयसीसी टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ दोन स्वतंत्र टी२०आय मालिकांद्वारे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसोबत या मेगा इव्हेंटसाठी तयारी करेल.