News

टिम डेव्हिडच्या शेवटच्या टप्प्यातील धडाक्याचा एमआयला एसआरएचविरूद्ध फायदा झाला नाही.

By Mumbai Indians

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्यादरम्यानची ५० धावांची भागीदारी आणि टिम डेव्हिडकडून शेवटच्या टप्प्यातल्या धडाकेबाज धावा पुरेशा ठरल्या नाहीत कारण आम्ही वानखेडे स्टेडियमवर एसआरएचविरूद्ध रोमांचक सामन्यात फक्त तीन धावांनी हरलो.

कर्णधार रोहितने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजय यादव एमआय आणि टाटा आयपीएलचा पहिला सामना खेळणार होता तर मयंक मार्कंडेनेही पहिल्या ११ खेळाडूंमध्ये आपले स्थान मिळवले. हे दोघे हृतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय सिंग यांच्याऐवजी खेळण्यासाठी आले.

डॅन सॅम्स आणि रायली मेरेडिथ यांनी नवीन बॉलसोबत चांगली सुरूवात केली. त्यांनी एसआरएचचे ओपनर्स अभिषेक शर्मा आणि प्रियम गर्ग यांना बाद करून सुरूवातीच्या टप्प्यात वातावरण गरम केले. सॅम्सने फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेकला बाद केले.

त्यानंतर खेळायला आलेल्या राहुल त्रिपाठी आणि गर्ग यांनी हल्ला केला. त्यांनी पॉवरप्लेचा फायदा उठवला आणि त्यानंतर मिळालेल्या वेगाचा उपयोग करून सात ओव्हर्समध्ये ७८ धावांची दमदार कामगिरी केली. संजय, बूम आणि मयंक सर्वतोपरी प्रयत्न करत होते.

त्यानंतर रोने रमणदीप सिंगला गोलंदाजी करण्यासाठी आणले. त्याने गर्गचा अत्यंत सुंदर लो रिटर्न कॅच घेऊन त्याला तात्काळ बाद केले. मधल्या फळीत त्रिपाठीसोबत खेळायला निकोलस पूरण आला आणि या दोघांनी धावांचा वेग कायम ठेवला.

त्या दोघांनी प्रत्येक ओव्हरमध्ये चेंडू सीमापार टोलवत सात ओव्हर्समध्ये ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रायलीने पूरणला फुलटॉस टाकला. त्याच्या चेंडूवर मयंकने डीप बॅकवर्ड स्क्वेअरवर अत्यंत रोमांचक कॅच पकडला.

या विकेटने एसआरएचच्या खेळीला खीळ बसली. रमणदीपने त्याच ओव्हरमध्ये त्रिपाठी आणि एडेन मार्क्रमला बाद केले. आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये एसआरएचला फक्त २० धावा दिल्या. त्यांनी आमच्यासमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना आमचे ओपनर्स रो आणि ईशान यांनी चांगली सुरूवात केली. एकदोन संथ ओव्हर्स गेल्यावर रोने भुवनेश्वरच्या चेंडूंवर एक जोरदार षटकार ठोकला. या दोघांनी त्यानंतर सातत्याने चेंडूला सीमापार रस्ता दाखवला. त्यातले एकदोन जोरदार फटके सिक्स लागले. त्यामुळे आम्ही पॉवर प्लेमध्ये ५१/० पर्यंत पोहोचलो.

त्यानंतर एक दोन ओव्हर्स खूप संथ गेले. त्यानंतर उमरान मलिकने दोन नो बॉल्स टाकले. त्याच्या ओव्हरमध्ये आम्ही १७ धावा कुटल्या. त्यामुळे आमच्या खेळाला एक गती मिळाली.

मधल्या टप्प्यात थोडासा आक्रमक झालेल्या रोहितने वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर पुल शॉट चुकीच्या पद्धतीने मारला. त्याची मिड विकेटवर विकेट घेतली गेली. त्यानंतर ईशान उमरान मलिकच्या पुढच्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याममुळे डॅन सॅम्स आणि तिलक वर्मा एकत्र मधल्या फळीत खेळायला आले.

या दोघांनी २० धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक उमरान मलिकच्या चेंडूवर टोलवण्याच्या प्रयत्नात वेगापुढे हार मानून बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये सॅम्सदेखील बाद झाला.

टिम डेव्हिड आल्यानंतर त्याने टी. नागराजनच्या चेंडूंवर दोन बाऊंड्री पार केल्या. सहाव्या क्रमांकावर आलेला ट्रिस्टन स्टब्स अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. डेव्हिडच्या ड्राइव्हवर चेंडू भूवीच्या हाताला लागला आणि त्यानंतर थेट स्टंप्सवर आदळला. त्यामुळे स्टब्स बाद झाला.

आम्ही काही विकेट्स गमावल्या आणि शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये ४५ धावा काढण्याचे कठीण ध्येय आमच्यासमोर उभे राहिले. पण १८ व्या ओव्हरमध्ये खेळ पालटला.

नटराजन त्याच्या शेवटच्या ओव्हरसाठी आला आण टिम डेव्हिडने त्याच्यावर थेट हल्ला केला. त्याने चार षटकार मारले. त्यात दोन षटकार ९८ मीटर आणि ११४ मीटरवर पोहोचले. त्यामुळे आमच्या मनात थोडी आशा निर्माण झाली.

परंतु टिमने त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न केला. नटराजनने त्याने फटकावलेला चेंडू थांबवून त्याला बाद केले.

त्यानंत भूवीने नव्याने खेळायला आलेल्या संजय यादवला बाद केले आणि १९ वी ओव्हर एकही धाव न देता टाकली. त्यामुळे आम्हाला अंतिम ओव्हरमध्ये १९ धावा कमी पडत होत्या.

रमणदीपने जोरदार फटके मारण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याला चेंडूचा अंदाज नीट लावता आला नाही. त्यामुळे एक चौकार आणि एक षटकार मारल्यानंतरही आम्हाला फक्त तीन धावांनी हार पत्करावी लागली.

टिम रनआऊट होईपर्यंत आमच्यासाठी जिंकण्याची संधी होती असे रोहित शर्माचेही मत होते.

“एकोणिसाव्या ओव्हरपर्यंत सामना आमच्या हातात आहे असे मला वाटत होते. टिम रनआऊट झाला हे फार दुर्दैवी आहे कारण आमच्या हातात सामना होता,” तो सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला.

एसआरएच सहजपणे २०० चा टप्पा पार करू शकेल असे वाटत असताना त्यांना २०० धावा पूर्ण करू न देण्यात यशस्वी झाल्याबद्दल गोलंदाजांचे कर्णधाराने खूप कौतुक केले.

“सुरूवात वाईट झाल्यानंतर आम्ही शेवटी ज्या पद्धतीने नाड्या आवळल्या हे पाहताना खूप छान वाटले,” तो म्हणाला.

टीममधल्या बदलांबद्दल रोने सांगितले की विशिष्ट परिस्थितीत नवीन खेळाडूंना आजमावून पाहणे खूप आवश्यक होते आणि पुढच्या सामन्यातही हे केले जाईल असे तो म्हणाला.

“आम्हाला सामन्याच्या काही विशिष्ट परिस्थितीत तणावाखाली काहीजणांना गोलंदाजी करू द्यायची होती. नवीन खेळाडूंना आजमावण्याची संधी असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला जास्तीत जास्त नवनवीन खेळाडूंना खेळवून सकारात्मक पद्धतीने टूर्नामेंट संपवायची आहे,” रोने सांगितले.

एक रोमहर्षक, अटीतटीचा सामना. या सामन्यात एका क्षणी निराशा आली आणि एका क्षणी आशा पल्लवित झाल्या. पण शेवटी खूप कमी धावांनी आम्ही हरलो. सीझनच्या आमच्या शेवटच्या सामन्यासाठी ही एक उत्तम सुरूवात म्हणता येईल.