News

माझ्या आयुष्याचे दोन आधारः माझी पत्नी देविशा आणि मुंबई इंडियन्स- स्काय

By Mumbai Indians

माहितीसाठी सांगतोय, जवळपास दोन आठवडे पूर्ण झालेत आणि आपण स्कायवर अजूनही एकही लेख लिहिलेला नाही. तो भारतीय संघात खेळत नसतानाही त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ८० चेंडूंमध्ये ९० धावा करून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ उडवली होती. आपल्या सूर्यादादाचे हे वर्ष असेच होते. २०२२ हे वर्ष संपत असताना तो टी२०आयचा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होण्याबाबत चर्चा सुरू आहे, तणावाचा सामना करतोय, आपल्या कसोटी स्वप्नांचा पाठपुरावा करतोय, मिस्टर ३६० होण्याबाबत आणि मुंबई इंडियन्स हे तर विसरताच येणार नाही. त्याने या सगळ्या गोष्टींबद्दल पीटीआयशी मुलाखतीत चर्चा केली.

उतारे

तुम्हाला एक वर्षापूर्वी सांगितले असते की तुम्ही टी२० स्वरूपात जगातले पहिल्या क्रमांकाचे फलंदाज व्हाल तर तुम्ही विश्वास ठेवला असता का?

मला अजूनही हे स्वप्नवत वाटते आहे. मला एक वर्षापूर्वी कोणी सांगितले असते की जगातला पहिल्या क्रमांकाचा टी२० फलंदाज होईन असे सांगितले असते तर मी विश्वासच ठेवू शकलो नसतो. मी या स्वरूपात खेळायला सुरूवात केली तेव्हा मला सर्वोत्तम ठरायचे होते आणि त्यासाठी मी खूप मेहनत केली.

२०२३ मधील प्राधान्य एकदिवसीय विश्वचषक असेल आणि याचाच अर्थ असा की तुम्ही ५० ओव्हरच्या स्वरूपासाठी तुमचा खेळ बदलणार आहात?

मी कोणत्याही स्वरूपात खेळत असताना त्याबद्दल फार विचार करायला फार आवडत नाही. मला हा खेळ आवडतो. त्यामुळे मी फलंदाजी करायला उतरतो तेव्हा बस्स मनापासून खेळतो. मी जेव्हा जेव्हा खेळायला उतरतो तेव्हा मी गेम-चेंजर असेन असे स्वप्न मी कायम पाहतो. मला कायमच फलंदाजी करायला आवडते आहे. मग ते टी२०आय असो, ओडीआय असो किंवा रणजी ट्रॉफी असो. माझ्या टीमला मी ४०-५० चेंडूंमध्ये जे करायला हवे आहे ते मी करू शकत असेन तर मग १०० चेंडूंवर फलंदाजी का करावी?

भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघात तुम्हाला स्थान मिळेल असे वाटते का?

मी राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ वयोगटात लाल चेंडूने खेळायला सुरूवात केली. त्यामुळे उत्तर त्यातच आहे. पाच दिवसांत आपल्यासमोर अत्यंत चकवणाऱ्या आणि तरीही मजेशीर परिस्थिती उद्भवू शकतात आणि मला तरी ते आव्हान स्वीकारायला आवडते. हो, त्यांना (भारतीय टीम व्यवस्थापनाला) माझी गरज असेल तर मी त्यासाठी तयार आहे.

फलंदाजीची कौशल्ये आपण शिकू शकतो. परंतु सर्वोच्च पातळीवरील तणावाशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वतःला कसे प्रशिक्षण दिले पाहिजे?

माझ्या मते हे अशक्य नव्हते. परंतु ते नक्कीच कठीण होते. त्यासाठी एक स्मार्ट दृष्टीकोन अंगीकारणे गरजेचे होते. मी खूप जास्त प्रमाणात सराव करण्याऐवजी दर्जेदार सराव करण्यावर भर दिला. मी आणि माझ्या कुटुंबाने खूप त्याग केले आहेत. मी प्रथमच भारतीय संघात खेळायला सुरूवात केली त्यापूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेट १० वर्षे खेळलो होतो. पहिल्या स्तरावर खेळत असतानना तुम्हाला खूप गोष्टींचा सराव करावा लागतो. त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचता आणि वेगवेगळ्या गोलंदाजांविरूद्ध खेळता तेव्हा तुम्हाला फक्त स्वतःला व्यक्त करता येणे गरजेचे आहे.

परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही भारतात देशांतर्गत सामने खेळला असाल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असता आणि तुम्ही त्या स्तरावर खेळायला सुरूवात करता तेव्हा तुमच्या मनावर त्याचा भार नसतो. फक्त देशांतर्गत पातळीवर आपण जे काही शिकलो त्यावर अंमलबजावणी करायची असते.

तुम्ही साधारण एक दशकापूर्वी भारताचे उगवते (यू-२३) कर्णधार होतात. मागील काही वर्षांत तुम्ही देशांतर्गत आणि आयपीएल पातळीवर खेळत असताना राष्ट्रीय पातळीची संधी तुम्हाला मिळाली नाही त्याबद्दल तुम्ही कधी नाराज किंवा दुःखी झालात का?

मी असं म्हणणार नाही की मी वैतागलो. परंतु पुढच्या पातळीवर पोहोचण्यासाठी मी आणखी काय वेगळे करू शकतो याचा विचार करत होतो. त्यामुळे मी मेहनत करत राहिलो आणि सामन्याचा आनंद घेणेही महत्त्वाचे असतेच.

त्याचमुळे तुम्ही क्रिकेट खेळायला सुरूवात केली. मग हे साधे प्रशिक्षण सत्र असो किंवा सकस असलेले अन्न असो. मला आधी ते फारसे आवडत नव्हते. पण आता मला ते आवडू लागले आहे. मला माहीत होते की मी परिणामांबाबत विचार न करता प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले तर मी कधी ना कधी नक्कीच पुढे येईन.

तुमचा मित्र सूफियान शेख म्हणाला की कधीकधी तुम्ही सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करत असताना मांडीला पॅड्ससुद्धा घालत नाही. हे खरे आहे का आणि त्याचे कारण काय आहे?

ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड टी२०मध्ये मी मांडीचे पॅड्स घातले होते कारण मी तेव्हा प्रथमच त्या देशात दौऱ्यावर खेळत होतो आणि वेग आणि चेंडू उसळणाऱ्या त्या ट्रॅक्सवर ते न घालणे धोक्याचे ठरू शकले असते. परंतु भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडू कमी उसळतो. त्यामुळे मांडीचे पॅड्स वापरल्यानंतर माझ्या आवडीचे शॉट्स मारताना मला अडचण येईल असे वाटत असले तर मी ते घालणारही नाही.

तुझ्या ३६० अंशातील तंत्राबाबत तू आम्हाला काही सांगू शकतोस का?

ही एक गंमतीशीर गोष्ट आहे. माझ्या शाळेत आणि कॉलेजच्या दिवसांमध्ये मी खूप रबर बॉल क्रिकेट खेळलो. कठीण सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर आणि पावसाळ्याच्या दिवसांत बॉल १५ यार्ड अंतरावरून येत होते आणि त्यातले अनेक चेंडू खूप जोरात आणि लांब जात होते. आता १५ यार्ड अंतरावरून रबरी चेंडू १४० पेक्षा अधिक वेगाने येततो आणि लेग साइडची सीमारेषा ९५ यार्ड्वर असेल तर ऑफसाइड फक्त २५-३० यार्ड्सवर असेल.

त्यामुळे ऑफसाइड सीमारेषा टाळण्यासाठी त्यांच्यापैकी अनेक लोक माझ्या अंगावर गोलंदाजी करत जेणेकरून मला ते ऑफसाइडवर सहज चेंडू सीमारेषेपलीकडे टोलवण्यापासून थांबवू शकतील. माझे मनगट फिरवणे, ते पिक अप पुल्स आणि अप्पर कट्स हे सगळे त्या सामन्यांमधून आलेले आहे.

मी त्यांचा सराव कधीही नेट्समध्ये करत नाही. नेट्समध्ये मला सामान्य सराव करायला आणि बॅटने चेंडू मारल्याचा आवाज ऐकायला आवडते. मला चांगले वाटले तर मी बाहेर येऊन खेळतो.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत तुमचे नाते कसे आहे?

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये मी असतो. त्यामुळे मी खूप सुदैवी ठरलो आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले महान खेळाडू आहेत. त्यांनी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्या मी कधी साध्य करू शकेन की नाही हे मला माहीत नाही.

अलीकडच्या काळात मी विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी केली आहे आणि मला त्याच्यासोबत फलंदाजी करताना खूप आनंद मिळाला आहे. रोहित हा मोठ्या भावासारखा आहे आणि तो माझा श्रोताही आहे. मला शंका असते तेव्हा मी त्याला माझ्या खेळाबद्दल प्रश्न विचारतो. मी २०१८ मध्ये एमआयसोबत खेळायला सुरूवात केली तेव्हापासून तो एक चांगला मार्गदर्शक ठरला आहे.

तुम्ही मुंबई इंडियन्स आणि पत्नी देविशा यांच्या तुमच्या करियरमधल्या योगदानाबाबत काय सांगाल?

माझ्या आयुष्यात आणि या क्रिकेटच्या प्रवासात ते माझे मुख्य पाठबळ आहेत- मुंबई इंडियन्स आणि माझी पत्नी देविशा.

मी आधी एमआयच्या योगदानाबाबत सांगू इच्छितो. मी २०१८ मध्ये केकेआरमधून परतलो तेव्हा वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी शोधत होतो आणि मी विचारण्यापूर्वीच व्यवस्थापनाने माझ्यावर ती जबाबदारी सोपवली. मी ती संधी घेतली, खेळत राहिलो आणि पुन्हा कधीही वळून पाहिले नाही. एमआयने मला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व त्या सुविधा दिल्या आहेत.

२०१६ मध्ये मी देविशाशी विवाह केला आणि एमआयमध्ये २०१८ मध्ये आलो तेव्हा आम्ही (मी आणि देविशा) एक टीम म्हणून विचार करायला लागलो की आणखी पुढे जाण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे. आम्ही दोघांनी पाहिलेले हे स्वप्न होते आणि मला तिची गरज होती तेव्हा ती कायम माझ्यासोबत राहिली आहे. तिला प्रवास करायचा नसला तरी मी तिला सोबत घेऊन जातो.

एक खेळाडू म्हणून मला आवश्यक असलेले संतुलन ती मला देते. ती मला चांगला दिवस गेल्यावर गर्विष्ठ होऊ देत नाही आणि त्याचवेळी खेळ खराब झाल्यानंतर ती मला दुःखी होऊ देत नाही.