“आम्ही सामने हरलो आहोत, हार मानलेली नाही”: कायरन पोलार्ड
वानखेडेवरची संध्याकाळ खरोखर निराशाजनक होती. आम्ही २४३ धावा केल्या आणि तरीही विजय मिळवू शकलो नाही, ही आमच्यासाठी कठीण गोष्ट आहे. 💔
फलंदाजी प्रशिक्षक, कायरन पोलार्डने सामन्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामन्याबाबत आणि आतापर्यंतच्या स्पर्धेबाबत चर्चा केली. “आम्ही एक टीम म्हणून परिपूर्ण क्रिकेट खेळू शकलेलो नाही,” तो म्हणाला. “आम्हाला अपेक्षा होती तेवढा सातत्यपूर्ण खेळ झाला नाही. त्यातून असे निकाल दिसत आहेत. अर्थात, त्यात लपवण्यासारखे काहीही नाही. एक टीम म्हणून आम्ही अद्याप छाप पाडू शकलेलो नाही.”
Close.. yet so far! pic.twitter.com/pFv7NpDEMZ
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2026
“आम्हाला एक टीम म्हणून अधिक चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. सध्या हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्यांना खेळाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगली कामगिरी करायला सांगू शकता. परंतु एक सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून संपूर्ण क्रिकेट उत्तमरित्या खेळण्याची गरज आहे. सध्या परिस्थिती कठीण होत चालली आहे. पण ड्रेसिंग रूममध्ये पोरांना लढा द्यायचा आहे.”
आठ सामन्यांमध्ये दोन विजय मिळाल्यानंतर मुंबी इंडियन्सची टीम आता प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे या परिस्थितीत आहे. आता जराही चूक चालणार नाही. पॉलीला ही भावना माहीत आहे. तो त्या परिस्थितीत होता. त्याने टीमला यातून बाहेर काढले आहे. एमआयची टीम तयारीत आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड उत्साह आहे असे त्याने आग्रहाने सांगितले.
“आम्ही सामने हरलो आहोत. पण आम्ही हार मानलेली नाही,” तो म्हणाला.
“मी हार म्हणतो तेव्हा मला मुंबई इंडियन्स पूर्णपणे पराभूत झाली असे म्हणायचे नाही. कारण आकडेवारी आणि गुणांच्या दृष्टीकोनातून आम्ही स्पर्धेत अद्याप आहोत. आम्ही पराभव स्वीकारले आहेत कारण आम्ही मागचे काही सामने हरलो आहोत. पण आम्ही हार मानलेली नाही कारण आम्ही स्पर्धेतून बाहेर गेलेलो नाही. आम्ही पुनरागमन करण्यासाठी काय करता येईल, तसेच स्पर्धेत कुठपर्यंत जाता येईल हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत.” 💙